Jump to content

श्याम कुमारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्याम कुमारी (जन्म: १९ डिसेंबर १९३४, मुज्जफर नगर, उत्तरप्रदेश, मृत्यू - १४ फेब्रुवारी २०२३) [] श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन मधील शिक्षिका, इंग्रजी व हिंदी भाषेत विपुल लेखन करणाऱ्या लेखिका म्हणून श्याम कुमारी ओळखल्या जातात. त्यांना २०२२ साली 'ऑरो रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. []

जीवन

[संपादन]

श्याम कुमारी यांनी लखनौ विद्यापीठातून एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले.

१९६९ साली त्या श्रीअरविंद आश्रमात दाखल झाल्या [] आणि श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन मध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाल्या.

कार्य

[संपादन]
  • त्यांची इंग्रजी व हिंदी या भाषांमध्ये मिळून सत्तरहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या कविता, गीते, लेख, नाटके, कथा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रकाशित झालेल्या आहेत.
  • १९९८ साली त्यांनी 'स्वर्णहंस' नावाचे हिंदी त्रैमासिक सुरू केले. आणि ते एकहाती लेखक, संपादक आणि प्रकाशक या नात्याने वीस वर्षे चालविले.
  • १९९८ मध्ये त्यांनी 'व्रज ट्रस्ट'ची स्थापना केली.
  • २००१ साली त्यांनी पुडुचेरी येथे 'श्रीअरविंद संस्कृत विद्यालया'ची स्थापना केली. या विद्यालयाद्वारे आबालवृद्धांना मोफत संस्कृतचे शिक्षण दिले जाते. []

प्रकाशित ग्रंथसंपदा

[संपादन]

निवडक इंग्रजी पुस्तके

[संपादन]
  • हाऊ दे केम टृू श्रीअरविंद अँड द मदर (दोन खंड)
  • विग्नेटस ऑफ श्रीअरविंद अँड द मदर (तीन खंड)
  • मोअर विग्नेटस ऑफ श्रीअरविंद अँड द मदर

निवडक हिंदी पुस्तके

[संपादन]
  • भारत, विश्व और मानवता का भविष्य
  • भगवान की ओर (दोन खंड)
  • श्रीअरविंद और श्रीमा की दिव्य लीला (दोन खंड)
  • गुलाब की पंखुरिया (२१ कथांचा संग्रह)
  • अपराजिता (२१ कथांचा संग्रह आणि २ नाटके)
  • प्रेम दिवानी (३५ कथांचा संग्रह आणि २ नाटके)
  • जीवन की कला (दोन खंड)
  • अनुपम कहानिया (चार खंड)
  • मधुर कहानिया (दोन खंड)
  • शिशु रंगतरंग
  • नव बाल तरंग (दोन खंड)
  • नव राग अनुराग


त्यांच्या अनेक पुस्तकांचे ओरिया, मराठी, तमिळ, बंगाली, गुजराथी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.

पुरस्कार

[संपादन]

त्यांना २०२२ साली 'ऑरो रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पूरक

[संपादन]

श्याम कुमारी यांच्या मुलाखती

संदर्भ

[संपादन]
  1. ^ says, Makarand V. Khubalkar (2016-01-19). "Auro Ratna Award – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2025-03-01 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Shyam Kumari awarded the 'Auro Ratna Award' for the year 2022 – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2022-11-26. 2025-02-13 रोजी पाहिले.
  3. ^ "Shyamkumari". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-02-13 रोजी पाहिले.