श्यामसुंदर मिरजकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.
श्यामसुंदर मिरजकर
शिक्षण एम.ए., पीएच.डी. (मराठी)

श्यामसुंदर मिरजकर (२६ एप्रिल, इ.स. १९७३- हयात) हे मराठीतील एक लेखक, कवी व प्राध्यापक आहेत.

कारकीर्द[संपादन]

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातल्या मायणी येथे कला, वाणिज्य महाविद्यालयात ते मराठी विषयाचे विभागप्रमुख आहेत. मायणी येथे गेली बारा वर्षे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका संपादक मंडळ सदस्य.

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • अस्वस्थ शहराच्या कविता, (इ.स. २००१) रुपवेध प्रकाशन,परभणी
 • समतावादी आरक्षण, (दुसरी आवृत्ती इ.स. २००६) नाग-नालंदा प्रकाशन,इस्लामपूर
 • शिवचरित्र: मिथक आणि वास्तव, (पाचवी आवृत्ती इ.स. २०१५) नाग-नालंदा प्रकाशन,इस्लामपूर
 • आई एक साठवण (ललित) (बारावी आवृत्ती इ.स. २०१९) नाग-नालंदा प्रकाशन,इस्लामपूर
 • मराठा समाज आणि आरक्षणाचा प्रश्न, (वैचारिक)(दुसरी आवृत्ती इ.स. २००८) नाग-नालंदा प्रकाशन,इस्लामपूर
 • सूत्रसंचालन:एक प्रयत्नसाध्य कला (पाचवी आवृत्ती इ.स. २०१४) नाग-नालंदा प्रकाशन,इस्लामपूर
 • संत नामदेव : समाजशास्त्रीय अभ्यास( समीक्षा) प्रथमावृत्ती २०१६ नाग-नालांदा प्रकाशन इस्लामपूर
 • संत नामदेव:डोळस श्रद्धेची मांडणी-प्रथमावृत्ती २०१६ नाग-नालंदा प्रकाशन,इस्लामपूर.
 • वारकरी क्रांतीचे प्रणेते:संत नामदेव प्रथमावृत्ती २०२०
 • म.फुले यांचे चरित्र (संपादन) (दुसरी आवृत्ती इ.स. २०१२) नाग-नालंदा प्रकाशन,इस्लामपूर
 • माध्यमिक शिक्षणः नवी दिशा (संपादन) प्रकाशनः मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ, मायणी (इ.स. २००९)
 • प्रबोधनाची निवडक पत्रे(संपादन)प्रथमावृत्ती २०१५ नाग-नालंदा प्रकाशन इस्लामपूर.
 • मराठी ग्रामीण साहित्य आणि स्त्रीवाद(संपादन) २०१६
 • मराठी विश्वकोशात नागी, जनाबाई, विसोबा खेचर, गोरा कुंभार यावर लेखन केले आहे.
 • विविध नियतकालिकातून ३९ तर पुस्तकातून २० संशोधनपर लेख प्रकाशित. याशिवाय कथा, एकांकिका, पथनाट्य, पुस्तक परीक्षण, चित्र नाट्य परीक्षण विविध अंकातून प्रकाशित.

पुरस्कार[संपादन]

 • विशाखा पुरस्कार (द्वितीय),यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (२५/११/२००२, "अस्वस्थ शहराच्या कविता"साठी )
 • उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार ,दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद, कोल्हापूर. (२३/१२/२००२, "अस्वस्थ शहराच्या कविता"साठी )
 • यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार ,महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई. (२५/११/२००३, "अस्वस्थ शहराच्या कविता"साठी )
 • श्री पंडित आवळीकर काव्यश्री पुरस्कार, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर २००३
 • दीनमित्रकार मुकुंदराव पाटील वाड्मय पुरस्कार अहमदनगर २००३
 • रा. तु. पाटील साहित्य पुरस्कार, मराठी साहित्य परिषद, कडेगाव २००७
 • शिविम उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, कोल्हापूर २०१७
 • समीक्षा पुरस्कार वाङमय चर्चा मंडळ बेळगाव २०१७
 • साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार, टेंभुर्णी, सोलापूर २००८.
 • आदर्श शिक्षक पुरस्कार, श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी, मायणी २०१६.