श्यामला कुमारी
Indian temple painter | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| नागरिकत्व | |||||
|---|---|---|---|---|---|
| निवासस्थान | |||||
| व्यवसाय |
| ||||
| पुरस्कार | |||||
| |||||
के. श्यामलाकुमारी उर्फ श्यामला कुमारी ह्या एक भारतीय मंदिरात चित्र काढणारी महिला चित्रकार आहेत. पूर्वापार परंपरेनुसार हा व्यवसाय पुरुष मंडळी करत असत. श्यामला कुमारी यांनी केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरात देखील चित्रकारिता केली आहे. या कामाची दखल घेऊन कुमारी यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जीवन
[संपादन]केरळमधील मंदिरांमध्ये भित्तिचित्र चित्रकार म्हणून काम करणारी पहिली महिला असल्याचा मान श्यामला कुमारी यांना मिळाला.[१] सहस्रकाच्या सुरुवातीला श्यामला यांना भित्तीचित्रांमध्ये रस निर्माण झाला.[२] त्यांनी केवळ मंदिरांतच रंगकाम केले नाही तर केरळमधील मंदिरांच्या भिंतींवर असलेल्या पारंपारिक भित्तीचित्रांचे पुनर्संचयित आणि जतन करण्यास देखील मदत केली आहे. श्यामलकुमारी यांनी एक माहितीपट तयार केला आहे.[३] श्यामला कुमारी यांनी नवरात्र मंडपम आणि पद्मनाभस्वामी मंदिरात त्यांचे पती जी. अझीकोडे यांच्या मदतीने चित्रे तयार केली आहेत.[२]

श्यामला कुमारी यांनी मंदिरांमधील कामाच्या व्यतिरिक्त चित्रे काढून विकले आहेत. ज्या लोकांना श्यामला कुमारी यांची भित्तिचित्रे हवी आहेत ते विषय आणि आकार याची माहिती देऊन आपले काम सांगतात. उंची आणि रुंदी लक्षात घेता, श्यामलाकुमारी प्रथम डिझाइनचे रेखाटन करतात आणि नंतर रंगरंगोटी हळूहळू पूर्ण करत भित्तीचित्र तयार करतात. या कामात त्यांचा मुलगा देखील सहभागी असतो. भित्तीचित्रांव्यतिरिक्त श्यामला कुमारी मातीकाम आणि बांबूवर तयार केलेली कलाकृती विकत असतात.[२]
२०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी श्यामला कुमारी यांना नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला.[४] केरळमधील इतर पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ लिझिमोल फिलिपोस आणि प्राणीशास्त्रज्ञ एमएस सुनील देखील होते.[५] पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्या उपस्थितीत भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या दिवशी सुमारे ३० लोक आणि नऊ संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना पुरस्कार आणि १,००,००० रु बक्षीस मिळाले.[६]
संदर्भ
[संपादन]- ↑ "International Women's Day: President Kovind honours 39 achievers with 'Nari Shakti Puraskar'". The New Indian Express. 2021-01-18 रोजी पाहिले.
- 1 2 3 Staff Reporter (2012-08-21). "A fair that holds a surprise". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-01-18 रोजी पाहिले.
- ↑ "Nari Shatki Puraskar citation". Indian Gov on Twitter. 8 March 2018. 18 January 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2021-01-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-01-16 रोजी पाहिले.
- ↑ "Scientist, social worker and mural artist: Meet Nari Shakti winners from Kerala". The News Minute (इंग्रजी भाषेत). 2018-03-08. 2021-01-18 रोजी पाहिले.
- ↑ "On International Women's Day, the President conferred the prestigious Nari Shakti Puraskars to 30 eminent women and 9 distinguished Institutions for the year 2017". pib.gov.in. 2021-01-14 रोजी पाहिले.