शोभा मित्रा
शोभा मित्रा (जन्म - १४ डिसेंबर १९३३, मृत्यू -३१ जुलै २०१९) [१] संगीतकार, नृत्यांगना, श्रीअरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन मधील संगीत विभाग-प्रमुख. ऑरोविलमधील लास्ट स्कूल मध्ये संगीत शिक्षिका. [२]
जीवन व कार्य
[संपादन]शोभा या अमरेंद्रनाथ आणि आशालता मित्रा यांची कन्या. १९४२ साली त्यांना श्रीमाताजींच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला. [३]
१५ जून १९५१ या दिवशी आईसोबत त्या श्रीअरविंद आश्रमात दाखल झाल्या. पृथ्वी सिंग नहार यांच्या हाताखाली प्रकाशन विभागात त्या कार्यरत झाल्या. अवघ्या एक वर्षात त्या कायमस्वरूपी आश्रमवासी झाल्या. श्रीमाताजी यांच्या सांगण्यावरून त्या श्रीअरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन येथे इंग्लिश, फ्रेंच, तत्त्वज्ञान आणि श्रीअरविंद यांच्या साहित्याचे अध्ययन करू लागल्या. त्याचबरोबर त्या दिलीप कुमार रॉय आणि सहाना देवी यांच्याकडे संगीताचे धडे गिरवू लागल्या. शोभा मित्रा पियानो व ऑर्गन वादन करत असत. त्या गिटार, सतार, सरोद, बासरी देखील वाजवत असत. [४]
१९५७ पासून त्या श्रीअरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन येथे फ्रेंच शिकवू लागल्या. आश्रमामध्ये त्यांनी अनु बेन पुराणी यांच्याकडे नृत्यकलेचे शिक्षण घेतले.[५] त्या नृत्यकलेमध्येही निपुण होत्या. १९६४ साली त्यांनी श्रीअरविंद लिखित 'द आवर ऑफ गॉड'वर नृत्यप्रयोग बसविला होता. १९६७ मध्ये त्यांनी 'द रिदम इटर्नल' यावर आधारित नृत्य-नाटिकेची रचना केली. [२]
१९६५ साली श्री माताजींच्या प्रेरणेने श्रीअरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन मध्ये संगीत विभागायची स्थापना केली. [२]
१९७२ साली श्रीअरविंद जन्म शाताब्दी निमित्त त्यांच्या संगीतरचनांचा संग्रह - लविंग होमेज श्रीअरविंद सोसायटी यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आला. [६]
बिरेंद्र किशोर रे चौधरी, तारा घोषाल, ज्योत्ना भोळे, चंद्रलेखा आणि पंकज कुमार मुलिक या सारख्या कलाकारांच्या संगीत कार्यक्रमांचे आश्रमात आयोजन करण्यात शोभा मित्रा यांचा सहभाग होता. [२]
प्रकाशित साहित्य
[संपादन]मूळ लेखन बंगालीमध्ये - श्रीमायेर दिब्या सानिध्ये (२०१२), त्याचा इंग्रजी अनुवाद मॉरिस शुक्ला यांनी केला आहे. लिविंग इन द प्रेझेन्स (२०१३) [१] ISBN 978-81-86413-57-9 [७]
पुरस्कार व सन्मान
[संपादन]- २०१३ - श्रीअरविंद भवन कोलकोता यांच्यातर्फे श्रीअरविंद पुरस्कार
- २०१४ - ओव्हरमॅन फौंडेशन तर्फे ऑरोरत्न पुरस्कार [१]
पूरक
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ a b c "Shobha Mitra : The Story of a Dedicated Soul by Anurag Banerjee – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2019-08-17. 2025-02-27 रोजी पाहिले.
- ^ a b c d "Shobha Mitra". AuroMaa (इंग्रजी भाषेत). 2025-02-27 रोजी पाहिले.
- ^ "Mitra, Shobha". Auromere (इंग्रजी भाषेत). 2025-02-27 रोजी पाहिले.
- ^ "Shobha Mitra - Auroville Wiki". wiki.auroville.org.in. 2025-02-27 रोजी पाहिले.
- ^ "Living in The Presence - Book by Shobha Mitra : Read online". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-02-27 रोजी पाहिले.
- ^ "A Lesson in Humility and Dissolving the Egoism of the Doer - Shobha Mitra" (इंग्रजी भाषेत). 2022-11-21. 2025-02-27 रोजी पाहिले.
- ^ "Living in The Presence - Book by Shobha Mitra : Read online". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-02-27 रोजी पाहिले.