Jump to content

शेफ दामू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेफ दामू
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख३ सप्टेंबर 1954 संपादन
जन्मस्थानचेन्नई संपादन
मृत्यू तारीख२५ ऑक्टोबर 2026 संपादन
मृत्यूस्थानचेन्नई संपादन
व्यवसायआचारी, celebrity chef संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाचेन्नै विद्यापीठ संपादन
पुरस्कारपद्मश्री पुरस्कार संपादन

दामोदरन कोदंडरामन किंवा शेफ दामू (३ सप्टेंबर, १९५४ – २५ ऑक्टोबर, २०२६) हे एक भारतीय प्रसिद्ध शेफ होते. ते अनेक पाककलेविषयी (कुकिंग) कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्यासाठी तसेच स्टार विजय वरील लोकप्रिय तमिळ टीव्ही मालिका कुकू विथ कोमाली चे परीक्षक म्हणून विशेष प्रसिद्ध होते. त्यांच्या नावावर तीन गिनीज बुकाचे जागतिक विक्रम नोंदवले गेलेले आहेत. ज्यामध्ये, एका व्यक्तीद्वारे सर्वाधिक वेळ सलग स्वयंपाक करणे (कुकिंग मॅरेथॉन), सर्वात लांब डोसा बनवणे आणि सर्वात जास्त प्रमाणात रस्सा (करी) बनवण्याचा विक्रम समाविष्ट आहे.[१] पाककलेतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना २०२५ मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देऊन गौरविण्यात आले होते.[२]

हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी मिळवणारे शेफ दामू हे पहिले भारतीय शेफ होते. त्यांना ही पदवी २००४ मध्ये मद्रास विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आली होती.[३] पाकशास्त्र आणि कलेतील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारतर्फे २०२५ मध्ये शेफ दामू यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[४][५][६]

कारकीर्द

[संपादन]

डिसेंबर २०१० मध्ये, शेफ दामू यांनी २४ तास, ३० मिनिटे आणि १२ सेकंदांच्या सलग स्वयंपाक सत्रात एकूण १९० किलोग्रॅम वजनाचे ६१७ पदार्थ बनवले होते.[७]

पारंपारिक दक्षिण भारतीय पाककलेला प्रोत्साहन देण्यासाठी शेफ दामू यांनी अनेक पाककृती पुस्तके (कूकबुक्स) लिहिली आणि स्वयंपाकविषयक कार्यशाळा आयोजित केल्या. त्यांनी 'द हिंदू' तर्फे तमिळनाडूतील विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अवर स्टेट अवर टेस्ट या खाद्यस्पर्धेत परीक्षक म्हणूनही काम पाहिले.[८] नंतर त्यांनी २०१९ ते २०२२ दरम्यान विजय टीव्हीद्वारे निर्मित 'कुकू विथ कोमाली' या नवोदित कलाकारांच्या स्वयंपाक स्पर्धेत शेफ व्यंकटेश भट यांच्यासोबत मुख्य परीक्षक म्हणून भूमिका बजावली.

निधन

[संपादन]

२५ ऑक्टोबर २०२६ रोजी चेन्नई येथे वयाच्या ७२ व्या वर्षी शेफ दामू यांचे निधन झाले.[९]

चित्रपट आणि दूरचित्रवाहिनीावरील कामे

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
  • कल्लाप्पदम (२०१५)
  • उळकुथु (२०१७)[१०]
  • ओरु पक्क कधै (२०२०)
  • मिसेस अँड मिस्टर (२०२५)
  • सर्व्हर सुंदरम (प्रदर्शित होणार असलेला चित्रपट)

वेब मालिका

[संपादन]
  • कल्याणम कंडिशन्स अप्लाईड (२०१८)

दूरदर्शन (टेलिव्हिजन)

[संपादन]
  • अरुसुवै नेरम – जया टीव्ही
  • ध्ये शेफ – मळविळ मनोरमा - मल्याळम कार्यक्रम
  • अधु इधु एधु – पाहुणे कलाकार (कॅमिओ)[११]
  • चॉकलेट – पाहुणे कलाकार (कॅमिओ)
  • कुकू विथ कोमाली – सीझन १ ते ७ [१२][१३]
  • कलर्स किचन
  • कॉमेडी कुक्स – एशियानेट - मळयाळम कार्यक्रम (महाअंतिम फेरीचे परीक्षक)

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Gandhi, Swati (2026-10-25). "RIP Chef Damu: From dishwasher to respected name of culinary world - Top facts about Cooku with Comali judge Damordaran | Today News". mint (इंग्रजी भाषेत). 2026-10-27 रोजी पाहिले.
  2. ↑ "Meet Chef Damodharan: Tamil Nadu's culinary maestro who was felicitated with Padma Shri by President Droupadi Murmu". Times Now News. 27 January 2025. 28 May 2025 रोजी पाहिले.
  3. ↑ Umachandran, Shalini (11 July 2009). "Chef Damu's Recipe For Success" (PDF). The Times of India. 12 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 1 August 2020 रोजी पाहिले – cookatease.com द्वारे.
  4. ↑ "Padma Awards 2025: 139 Distinguished Personalities Conferred Prestigious Awards, 7 Padma Vibhushan, 19 Padma Bhushan And 113 Padma Shri; See Full List". The Times of India. 25 January 2025.
  5. ↑ "Padma Awards 2025 announced". PIB India.
  6. ↑ "Padma Award Winners 2025 Full List". Bru Times. 2025-02-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2026-11-02 रोजी पाहिले.
  7. ↑ Vijayakumar, Chithira (22 December 2010). "Damu's day-long dhamaka!". The Hindu. 20 February 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 February 2020 रोजी पाहिले.
  8. ↑ Kannadasan, Akila (31 August 2019). "How chef Damu went around Tamil Nadu in 60 days". The Hindu. 20 February 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 February 2020 रोजी पाहिले.
  9. ↑ "Cooku with Comali judge chef Damodharan passes away at 72". The Times of India. 25 October 2026. 25 October 2026 रोजी पाहिले.
  10. ↑ "Chef Dhamu to make his Kollywood debut?". The Times of India. 10 August 2015.
  11. ↑ "Chef Dhamu on Adhu Idhu Yedhu". The Times of India. 28 November 2015.
  12. ↑ "Cook with Comali Season 6 set to premiere soon; here's all you need to know about the show". The Times of India. 25 May 2025. 28 May 2025 रोजी पाहिले.
  13. ↑ "Cooku with Comali Season 5 Grand Finale: Priyanka Deshpande lifts the trophy, wins cash reward Rs 5 lakh". The Times of India. 11 February 2024. 28 May 2025 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]