शेंदरी (वनस्पती)
species of South American plant | |||||||||||||||||
माध्यमे अपभारण करा | |||||||||||||||||
![]() ![]() | |||||||||||||||||
प्रकार | टॅक्सॉन, material | ||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
वापर |
| ||||||||||||||||
IUCN conservation status | |||||||||||||||||
| |||||||||||||||||
![]() |
शेंदरी किंवा केसरी, (जीवशास्त्रीय नाव :बिक्सा ओरेलाना) ही मध्य अमेरिकेतील एक झुडूपवर्गीय वनस्पती आहे.[१][२] ही वनस्पती जगभरातील अनेक देशांमध्ये आढळून येते.[१]
या वनस्पती पासून नारिंगी-लाल नैसर्गिक मसाला ॲनाट्टो मिळवला जातो. हा रंग बिया झाकणाऱ्या मेणासारख्या कंदांपासून प्राप्त केला जातो.[१][२] मध्य आणि दक्षिण अमेरिका, मेक्सिको आणि कॅरिबियनमध्ये पारंपारिक पदार्थांमध्ये, जसे की कोचिनीटा पिबिल, चिकन, इत्यादींमध्ये या बियांच्या भुकटीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तसेच लोणी, चीझ, मार्जरीन, आईस्क्रीम, मांस आणि मसाल्यासारख्या अनेक उत्पादनांमध्ये पिवळा किंवा नारिंगी रंग म्हणून ॲनाट्टो आणि त्याचे अर्क औद्योगिक अन्न रंग म्हणून देखील वापरले जातात.[१] उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील काही स्थानिक लोक मूळतः लाल रंग आणि लिपस्टिक तसेच मसाला बनवण्यासाठी याच्या बियांचा वापर करत असत.[२] या कारणास्तव, या वनस्पतीला लिपस्टिक ट्री असे देखील म्हणतात.[१][२]
भारतात या वनस्पतीला कुमकुम ट्री किंवा कमील ट्री असेही म्हणतात. संस्कृतमध्ये या वनस्पतीचे नाव रक्तपुष्प असे आहे. सिंदूरच्या बियांपासून प्राप्त होणारा लाल-नारिंगी रंग भारतातील हिंदू विवाहित स्त्रिया आपल्या भांगात सिंदूर म्हणून लावतात.[३]
भारतात या वनस्पतीची लागवड हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमधील काही भागांमध्ये केली जाते.
वर्णन
[संपादन]

सुमारे २–१० मी. उंचीच्या या लहान सदापर्णी वृक्षाचे मूलस्थान मध्य अमेरिका असून भारतात (विशेषतः दक्षिणेत) सर्वत्र लावलेला आढळतो. कोवळ्या भागांवर तांबूस लव असते. पाने लांब देठाची, साधी, एकाआड एक, हृदयाकृती (१०–३० सेंमी. लांब) फुले मोठी, पांढरी किंवा फिकट लालसर जांभळी असून फांद्यांच्या टोकास ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये परिमंजरीत येतात.

बोंडे गोलसर, टोकदार, तांबूस भुरी, मऊ व काटेरी असून बियांभोवती लालसर शेंदरी अध्यावरण (बीजाच्या देठापासून किंवा त्यावरील सूक्ष्म छिद्राच्या जवळील भागापासून तयार झालेली वाढ) असते. फळ तडकल्यावर दोन शकले होतात.

याचे फळ स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारे) व रेचक असून मुळांची साल पाळीच्या तापावर देतात. बिया बलवर्धक, स्तंभक, पौष्टिक व ज्वरनाशी असून परम्यावरही गुणकारी असतात. पाने काविळीवर वापरतात. बियांच्या अध्यावरणात बिक्सिन (C25H30O4) हे लाल रंगद्रव्य असते ते बाजारात ‘ॲनाटो’ किंवा ‘ओरेलीन’ या नावाने विकतात. त्याचा उपयोग सामान्यतः सूत, रेशीम, तूप, लोणी, चीज, मेवामिठाई, चॉकोलेट, मार्गारीन, केसाची तेले, बूट पॉलिश, रोगण, लोकर, पिसे, साबण, औषधी मलमे इ. रंगविण्यास करतात. सालीपासून वाख व दोऱ्या बनवितात. नवीन लागवड कलमे लावून किंवा बियांपासून करतात.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d e "Bixa orellana (annatto)". Center for Agriculture and Biosciences International (CABI). 27 September 2018. 10 October 2018 रोजी पाहिले.
- ^ a b c d Morton, Julia F. (1960). "Can Annatto (Bixa orellana, L.), an old source of food color, meet new needs for safe dye?". Proceedings of the Florida State Horticultural Society. 73: 301–309. 11 October 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 October 2018 रोजी पाहिले.
- ^ "'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली". दैनिक लोकमत. १४ जून २०२५ रोजी पाहिले.
- ^ "केसरी". मराठी विश्वकोश. १४ जून २०२५ रोजी पाहिले.