Jump to content

शुभेंदु अधिकारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शुभेंदु अधिकारी

विद्यमान
पदग्रहण
९ मे २०२६
मागील ममता बॅनर्जी

विद्यमान
पदग्रहण
२५ मे २०१६
मागील ममता बॅनर्जी
मतदारसंघ नंदीग्राम

पश्चिम बंगाल विधानसभा विरोधी पक्षनेते
कार्यकाळ
१३ मे २०२१  ९ मे २०२६

कार्यकाळ
१६ मे २००९  २० मे २०१६
मागील लक्ष्मणचंद्र शेठ
पुढील दिब्येंदु अधिकारी
मतदारसंघ तामलुक

जन्म १५ डिसेंबर, १९७० (1970-12-15) (वय: ५५)
पूर्व मेदिनीपूर जिल्हा, पश्चिम बंगाल
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष (२०२० - )
तृणमूल काँग्रेस (२००० - २०२०)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९९५ - २०००)
वडील शिशिरकुमार अधिकारी
नाते दिब्येंदू अधिकारी (भाऊ)
सौमेंदू अधिकारी (भाऊ)

शुभेंदु अधिकारी (बांग्ला: শুভেন্দু অধিকারী; जन्म: १५ डिसेंबर १९७०) हे एक भारतीय राजकारणी व पश्चिम बंगाल राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत. २०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये शुभेंदु अधिकारी ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने २०८ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत संपादन केले. ९ मे २०२६ रोजी अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले.

१९९५ सालापासून राजकारणामध्ये सक्रिय असलेले अधिकारी २००० ते २०२० दरम्यान तृणमूल काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते होते. २००९ ते २०१६ दरम्यान ते तामलुक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. २०२० साली अधिकारी ह्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला व पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सामर्थ्य वाढवण्याचे कार्य हाती घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ७७ जागांवर विजय मिळवला.

संदर्भ

[संपादन]