शीला गौतम
Appearance
| शीला गौतम | |
लोकसभा सदस्य | |
| कार्यकाळ जून १९९१ – मे २००४ | |
| मागील | उषाराणी टोमर |
|---|---|
| पुढील | बिजेंद्र सिंह |
| मतदारसंघ | अलीगढ |
| जन्म | १५ नोव्हेंबर, १९३१ अलीगढ |
| मृत्यू | ८ जून, २००९ (वय ७७) नवी दिल्ली |
| राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
| वडील | पंडीत मोहनलाल गौतम |
शीला गौतम ह्या एक भारतीय उद्योगपती, राजकारणी व लोकसभा सदस्य होत्या.[१] त्या भारतीय जनता पक्षातर्फे १९९१, १९९६, १९९८ व १९९९ ह्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या अलीगढ मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.
गौतम या शीला फोम लिमिटेड या कंपनीच्या स्थापिका आणि मालक होत्या. ही कंपनी स्लीपवेल नावाखाली गाद्या आणि इतर वस्तू विकते.[२][३] त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा राहुल गौतम ही कंपनी चालवतो.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Sleepwell founder, ex-MP Sheela Gautam dead at 88". Business Standard. 15 January 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Sheela Gautam". Forbes.com (इंग्रजी भाषेत). March 6, 2018. 2018-08-22 रोजी पाहिले.
- ↑ "Sheela Foam Limited: Private Company Information". Bloomberg.com. 2018-08-22 रोजी पाहिले.