Jump to content

शिवांबू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिवांबू किंवा मूत्र चिकित्सा ही स्वतःचे मूत्र प्राशन करण्याची व इतर बाह्य उपचारांकरिता वापरण्याची एक उपचार पद्धत आहे. स्वमूत्राचे नियमित सेवन करण्याने सर्व प्रकारचे रोग बरे होतात व दीर्घायुष्य प्राप्त होते असा शिवांबू चिकित्सेच्या समर्थकांचा दावा आहे. परंतु ह्याला शास्त्रीय आधार नाही.

साठवून ठेवलेले शिवांबू त्वचेवर चोळले असता बाह्य जखमा व त्वचारोग बरे होतात असाही उल्लेख सापडतो.

भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान मोरारजी देसाई हे शिवांबूचे उपासक होते व त्यांनी आपल्या ९९ वर्षाच्या निरोगी आयुष्याचे श्रेय शिवांबू चिकित्सेला देले आहे.