Jump to content

शिवस्वरोदयशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिव पार्वतीसमवेत

स्वरोदय तंत्र म्हणजे स्वरांच्या (श्वासांच्या) पासून निर्माण होणारे तंत्र आहे. या तंत्रास श्वासोच्छवासाशी जोडण्यात आले आहे. या तंत्राचा उद्गाता भगवान शिव आहे. त्यांनी हे तंत्र पार्वतीस सांगीतले. ते जनतेच्या कल्याणासाठी निर्माण करण्यात आलेले आहे असे शिव म्हणतात.श्वास व उ-श्वास या मानवाच्या शरीरात निरंतर चालणाऱ्या क्रिया आहेत.या दोन्हीवर योग्य नियंत्रण केल्यास शरीर रोगमुक्त राहु शकते असा दावा करण्यात येतो.

यात असे निवेदन केल्या गेले आहे कि ज्या वेळेस याचे संतुलन बिघडते, त्यावेळेस शरीर रोगयुक्त होते. साधारणतः,दर तासात हा क्रम बदलत राहतो.याचे नाते शरीरातील ईडापिंगला या मुख्य नाड्यांशी जोडण्यात आले आहे.डाव्या नाकपुडीतुन चालणाऱ्या स्वरास (श्वासास) 'चंद्रस्वर' तर उजव्या नाकपुडीतुन चालणाऱ्या स्वरास 'सूर्यस्वर' असे म्हणतात.हा चंद्रस्वर एक-एका तासाच्या अंतराने सुरू राहिल्यास शरीरातील थंडावा तसेच आरोग्य योग्य रितीने राखल्या जाते.तर सूर्य स्वराद्वारे शरीरातील उष्णतेचे नियंत्रण होते.दोन्ही स्वर एकाचवेळी सुरू राहिल्यास त्यास सुषुम्णा स्वर असे नाव आहे.तो स्वर सुषुम्णा नाडीचा आहे.हा फारच कमी वेळ सुरू असतो.

चंद्रभेदी प्राणायाम,सूर्यभेदी प्राणायामअनुलोम-विलोम प्राणायाम याच स्वरांवर अवलंबून आहेत.वेगवेगळ्या तिथींना सुर्योदयाचे वेळेस वेगवेगळा स्वर सुरू राहतो.शिवाच्या या शास्त्रानुसार असे सांगीतल्या गेले आहे कि,एक मनुष्य २४ तासात,२१६०० वेळा श्वासोच्छवास करतो.असे सांगण्यात येते कि श्वासाची गती जितकी कमी होईल तितके आयुष्य वाढते.या स्वरतंत्राद्वारे निरामय आयुष्य जगता येते.[]

हेही पाहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]