Jump to content

शिवरायांचा छावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिवरायांचा छावा
चलचित्र
प्रकाशन तारीख१६ फेब्रुवारी 2024 संपादन
मूळ देशभारत संपादन
दिग्दर्शकDigpal Lanjekar संपादन
पटकथाDigpal Lanjekar संपादन
प्रमुख कलाकारमृणाल देव, चिन्मय मांडलेकर संपादन
Distributed byए ए फिल्म्स संपादन

शिवरायांचा छावा हा २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील ऐतिहासिक नाट्य चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. तर निर्मिती मल्हार पिक्चर कंपनीची आहे. श्री शिवराज अष्टक या चित्रपट शृंखलेतील हा सहावा चित्रपट आहे. तर, फर्जंद (२०१८), फत्तेशिकस्त (२०१९), पावनखिंड (२०२२), शेर शिवराज (२०२२) आणि सुभेदार (२०२३) हे या शृंखलेतील पूर्वीचे चित्रपट आहेत.

या चित्रपटात भूषण पाटील, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, आयशा मधुकर, समीर धर्माधिकारी आणि राहुल देव यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट शिवाजी महाराजांचे पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्याभोवती फिरतो.[] या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४ कोटी रुपये कमावले आणि २०२४-२५ सालातील पाचवा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला.[]

कथानक

[संपादन]

मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज, अर्थात शंभूराजे यांच्यावर या चित्रपटाचे कथानक आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आपला ज्येष्ठ पुत्र म्हणून नियुक्त केले होते.

कलाकार

[संपादन]

निर्मिती

[संपादन]

या चित्रपटाची निर्मिती जून २०२३ मध्ये पूर्ण झाली आणि त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली.[][]

प्रदर्शन

[संपादन]

हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२४ रोजी ४०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये आणि १२०० हून अधिक शोमध्ये प्रदर्शित झाला.[]

३ ऑक्टोबर २०२३ रोजी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहिले मोशन पोस्टर अनावरण झाले.[]

कमाई

[संपादन]

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १.०२ कोटी (US$२,२६,४४०) कमावले.[] तर शेवटी एकूण १४ कोटी (US$३.११ दशलक्ष) पेक्षा जास्त कमाई केली.[]   या चित्रपटातील गाण्याचे संगीत देवदत्त मनीषा बाजी यांनी दिले आहे आणि पार्श्वसंगीत अमर मोहिले यांनी दिले आहे, तर गीते दिग्पाल लांजेकर यांनी लिहिली आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "'Shivarayancha Chhava': Digpal Lanjekar wraps up shooting of his upcoming historical epic; team celebrates with cake cutting on set". द टाइम्स ऑफ इंडिया. 2023-06-12. ISSN 0971-8257. 2024-02-21 रोजी पाहिले.
  2. 1 2 "The Ormax Box Office Report: 2024" (PDF). Ormax Media. 2025-01-15 रोजी पाहिले.
  3. "शिवरायांनंतर दिग्पाल लांजेकरांच्या 'छावा' ची घोषणा; कोण करणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका?". महाराष्ट्र टाइम्स. 2024-02-21 रोजी पाहिले.
  4. 1 2 3 Pokharkar, Manjiri (2024-02-17). "जय शिवराय! 'शिवरायांचा छावा'ने रिलीजच्या पहिल्या दिवशीच जमवला कोट्यवधींचा गल्ला; 400 पेक्षा जास्त थिएटर्स अन् 1200 पेक्षा अधिक शोज". ABP Majha. 2024-02-21 रोजी पाहिले.
  5. "Maharashtra CM Eknath Shinde unveils motion poster of 'Shivrayancha Chhava' by Digpal Lanjekar". Pune Mirror (इंग्रजी भाषेत). 2023-10-04. 2024-02-21 रोजी पाहिले.