Jump to content

शिवराम बाबुराव भोजे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिवराम बाबुराव भोजे हे एक ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ होते.

जीवन व कारकीर्द

[संपादन]

डॉ. शिवराम यांचा जन्म कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे झाला. ते चाळीस वर्षे वेगवान ब्रीडर अणुभट्टी तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत होते.अणुभट्टी आरेखन, बांधकाम, ऑपरेशन, संशोधन व विकास क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे प्रशिक्षण भाभा अणुसंशोधन केंद्र येथे झाले होते. तुर्भे येथे बीएआरसी येथे त्यांनी वैज्ञानिक अधिकारी म्हणून मोलाची कामगिरी केली होती.एक मेगावॉटच्या वेगवान ब्रीडर टेस्ट अणुभट्टी आरेखन टीमचे ते सदस्य होते.त्यावेळी ते फ्रान्स देशात एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीवर होते. ते इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे ते संचालक होते. नंतरच्या काळात ते कोल्हापूर येथे स्थायिक झाले होते.

पुरस्कार

[संपादन]

डॉ. शिवराम यांना भारत सरकारने इसवी सन २००३ मध्ये त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरव केला होता.

निधन

[संपादन]

शिवराम बाबूराव भोजे यांचे मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी निधन झाले.त्यांच्यामागे पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. []

संदर्भ व सूची

[संपादन]

साचा:संदर्भ सूची

  1. महाराष्ट्र टाईम्स, बुधवार,१७ सप्टेंबर २०२६