शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर सोलापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.श्री सिद्धरामेश्वर
विकिस्रोत लोगो सिध्देश्वर यांचे, अथवा यांच्या बद्दलचे साहित्य मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.:
निर्वाण फाल्गुन कृ.२ , शके १५७१,
महाराष्ट्र
भाषा मराठी
साहित्यरचना पाच हजारांवर वचने
कार्य समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक
व्यवसाय वाणी

जन्म[संपादन]

बालपण[संपादन]

सद्गुरूंचा शोध[संपादन]

अभ्यास[संपादन]

कार्य[संपादन]

गड्डा यात्रा[संपादन]

चित्रपट[संपादन]

स्मारके[संपादन]

भारत हा एकच देश जगाच्या पाठीवर सदाचार- संस्कृतीप्रधान देश आहे. येथील संस्कार अन्य कोठेही मिळणारे नाहींत. याच आधारे असे सांगता येईल की, १२ व्या शतकात फार मोठे शिवशरण होऊन गेले. जीव शिवशरण झाला नाही, तर त्याला पूर्णत्व प्राप्त होणार नाही. मानवी जीवन शिवशरण झाले तरच चिरकृतार्थ होऊ शकते याचे गमक याच काळी उदयाला आले. शिवशरणाच्या प्रभावाने अनेक जीव या काळी शिवशरण झाले. याच समयी कर्नाटकातच नव्हे, तर उभ्या भारताने ज्यांना शिरी घेऊन वंदावे; स्तवावे व पूजावे असे श्रेष्ठ संत बसवेश्वर होऊन गेले. त्यांनी केवळ अध्यात्मिकच क्रांती केली असे नव्हे, तर आत्मिक परिवर्तनासाठी आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय क्रांतीही केली.
नामे अनेक असली तरी देव मात्र एक हे अनादि तत्त्व सर्वांना स्वजीवनात आचरण करून पटवून दिले. 'विशेष आचरावे लागे संती |' सर्वच क्षेत्रात त्यांनी समानत्व आणले. स्पृश्यास्पृश्य भेदांना मूठमाती दिली. स्त्रियांनासुद्धा अध्यात्माचा अधिकार आहे असे गर्जून सांगितले.
याच वेळी सोलापूर येथे श्री सिद्धरामेश्वर महाराज उदयास आले. त्यांनी सार्वजनिक कल्याणाप्रीत्यर्थ देवालये, धर्मशाळा, तलावादी बांधकामे केली. त्यांच्या या लोकोपयोगी कार्याचा खूप बोलबाला झाला. त्या वेळी श्रेष्ठ साधू श्री अल्लम प्रभू हे सोलापुरी आले. त्यांची व श्री सिद्धरामेश्वरांची भेट झाली. अध्यात्मावर थोडा वाद- विवादही झाला.
त्या वेळी श्री अल्लमप्रभूंनी सिद्धेश्वरांना सांगितले, केवळ कर्मयोगाचरणाने माणूस परिपूर्ण होत नाही, अंतःकरण्याच्या शुद्धीला बहिरंग शुद्धीचीही आवश्यकता आहे. अशासंबंधी मोठी क्रांती सध्या बसवकल्याण येथे चालू आहे. या क्रांतीचे विचारी व आचारी अध्वर्यूपद श्री बसवेश्वर यांना लाभले आहे. तेंव्हा आपण त्यांना भेटावे. अल्लमप्रभूंसह श्रीसिद्धेश्वर बसवकल्याणला आले.
बसवेश्वरांची भेट झाली. आत्म व परकल्याणकारी अध्यात्माची आत्मिक चर्चा झाली. परमार्थाचे इंगित आणि महत्त्व श्री सिद्धेश्वरांना उमजले. ही सर्व मंडळी प्रत्यही अनुभव मंडपाच्या चर्चेत भाग घेत. परमार्थ हा परिश्रमवादी असावा. उदरभरणासाठी कोणावर अवलंबून असता कामा नये, या न्यायाने परिश्रम करून धन मिळवणे ही अट सर्वांनाच होती. या मंडपांत जातपातधर्म हा भेदभाव बाळगला जात नसे. त्यानंतर काही काळ या मंडपाचे अध्यक्षपदही श्री सिद्धरामेश्वरांना प्राप्त झाले होते.

लिंगायत धर्म संस्कार[संपादन]

इष्टलिंग धारण करणे हा मुख्य नियम आहे हे जाणून घेतले. पण ते इष्टलिंग प्रत्येक व्यक्तीने गुरूकडून मंत्रोपदेशासह स्वीकार करावयास हवे. आपले आपण शरीरावर लिंग धारण करणारा तो सामाजिक अर्थाने लिंगायत होऊ शकतो. पण धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपात लिंगायत होण्यास गुरूकडूनच इष्टलिंग ध्यावे लागते. ’नेणत्या मानवाला जाणाता शरण’ होण्यास त्यास संस्काराची आवश्यकता आहे. धर्म जन्माने येत नाहीं तर संस्काराने येतो. म. बसवेशांचे भाचे चन्नबसव म्हण्तात


असा वीराचार दृढ केल्याशिवाय
वीरवंशात जन्म घेतला म्हणून वीरशैव होणे नाही

कूडल चन्नसंगमदेवा (च.ब.व. ११५)

वैद्यकीय परीक्षा देऊन पास झाल्याशिवाय केवल वैद्याचा मुलगा म्हणून त्या मुलास वैद्य म्हणणे जसे हास्यास्पद ठरते तद्वत संस्काराशिवाय नुसते जन्माने लिंगायत होणे हास्यास्पद होय म्हणून चन्नबसव म्हणतात भक्ताच्या पोटी जन्म घेणारा तो भक्त होणे नाहीं

गुरूच्या कृपेने लिंगधारण केल्याशिवाय भक्त होणे नाही

त्यांना भक्त म्हणून वागविल्यास, म्हणावे लागेल भक्तिहीन

कुंडल चन्नसंगम देवाचे हेच बचन (च.ब.व. ४२४)

म्हणून जन्मत: सर्व मानव या धर्मात भवी (?) असतात, नंतर गुरूंच्या कृपेने तो भक्त शरण बनतो.

लिंग संस्कारात दोन प्रकार आहेत. प्रथम लिंगधरणा, नंतर लिंगदीक्षा, स्त्री गर्भवती असताना सातव्या अगर आठव्या महिन्यातच गर्भातील बाळाकरिता मंत्रोपदेश देणे आवश्यक आहे. मातेच्या आहार विहाराचा परिणाम बाळावर होत असल्याकारणाने अध्यात्मिक संस्काराचा परिणाम त्या बाळावर होत असतो. हा संस्कार स्त्री गरोदर असताना झाला नाही तर बाळंतपण झाल्याबरोबर बाळाला लिंगधारणा करावी.
जन्मलेल्या शिशूस लिंगधारणा न करता
मातेचे स्तनपान, दुग्ध न देणे हाच विसावा आचार
असे चन्नबसवेशांचे दुसरे वचन आहे ( च. ब. व. ११२)
शिवभक्ताचे शिशु भूमीवर पडल्याबरोबर
विभूती लावून गळ्यात लिंगधारणा करून,
पादोदकाने स्थान घालून, प्रसादाचे दूध, लोणी याने न्हाऊ घालून
पोषण करणे, हाच आचार. दुसरी भूत शांती करणे नाही (च.ब.व. ३९९)

मूल जन्मल्याबरोबर संस्कार करणे झाले नाही तर अकराव्या दिवशी तरी हा संस्कार व्हावयास हवा.
दुसरा संस्कार म्हाणजे लिंगदीक्षा. मुलगी असो वा मुलगा कोणताही भेदभाव न करता त्याला गुरूकडून अनुग्रह द्यावा. बालकास समजू लागल्यावर तो स्वत: पूजा करण्यासाठी त्याचे वय बारा तेरा वर्षाचे तरी व्हावयास हवे.
या वयात त्याला लिंगदीक्षा करवावी. दीक्षेशिवाय मोक्ष नही (च.ब.व.४६,११५) दीक्षा घेणे हे आद्यकर्तव्य होय लिंगधारणा हा ’वाङ्‌निश्चय’ कार्याप्रमाणे तर 'लिंगदीक्षा' हे लग्नकार्याप्रमाणे आहे. केवळ वधुवर ठरविणे हे कार्य म्हणजे ’वाङ्‌निश्चय’ होय.

पण त्यांना सामाजिकरीत्या जोडीने राहण्यास परवानगी नसते. याचप्रमाणे हा लिंगदीक्षेमुळे ही व्यक्ती याच धर्माचा अनुयायी म्हणून ओळखला जातो. आपण स्वत: लिंगपूजा करून त्याचा आनंद मिळविण्यास लिंगदीक्षा घेणे जरूरीचे आहे. निश्चय कार्याच्या वेळी (मुलामुलीचे) आईवडील आपल्या मुलामुलीला दिल्या देण्याचे ठरवितात पण लग्रात स्वत: वधूवरच समोरासमोरच येऊन वैवाहिक जीवनात एकरूप होतात. तसेच लिंगधारणेच्य वेळी आईवडील मुलाच्या वतीने प्रतिज्ञा करतात. तर लिंगदीक्षेच्या वेळी स्वत: परिपक्वता साधलेली व्यक्तीच प्रतिज्ञाबद्ध होते. ती व्यक्ती लिंगदीक्षेच्या वेळी आपला विश्वास व आचरण व्यक्तिश: व सामाईकरीत्या घोषित करते.

"दीयते लिंग संबंध: क्षीयतेच मलत्रया! दीयते क्षीयते यस्मात् सा दीक्षेति निगधते!!" मग्गेय मायीदेव-(शिवानुभव परिच्छेद-१५-२८)

रुथूल, सूक्ष्म, कारण या तनुत्रयात असलेला कार्मिक, माया, अणव या मलत्रयांचा नाश करून इष्ट, प्राण,भाव लिंगत्रयांचा, क्रिया, मंत्र, वेधदीक्षात्रय घेऊन लिंगांग हा सामरस्याच्या मार्गावर चालण्यास लावणारा धार्मिक संस्कार म्हणजेच दीक्षा होया. अशी दीक्षा धेतल्यावरच आपण परमात्म्याच्या मार्गाकडे वळलो अशी भावना त्या व्यक्तीत स्थिर होते. धर्मगुरूंची तत्त्वे आपाल्या आचरणात आणण्याची कबुली दिल्याप्रमाणे होते. आपण एक विशिष्ट आचार, विचार असणात्या समाजाचे एक अंग, एक घटक असल्याचे दाखविल्यासारखे होते.

सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिराला श्रावण महिन्यात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येते. तर मंदिरातील योग समाधीला श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी ७०० ते ८०० किलो फुलांनी सजवण्यात येते.

सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाच्या पूजेने यात्रेची सुरुवात होते. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या यात्रेला तब्बल ९०० वर्षांची (कुठपासून?) परंपरा आहे.

लिंगायत धर्म सहिंता - वचन साहित्य[संपादन]

प्रत्येक धर्माला आधारभूत असे साहित्य असावयास हवे. त्या तत्वाच्या अनुयायींच्या मध्ये फूट पडून अस्तव्यस्त न होता संघटीत होऊन राहण्यास सर्वाना एकासूत्तात बांधणारे साहित्य असावे. ख्रिश्चन लोकांना बायबल, इस्लामीयांना कुरान असल्याप्रमाणे लिंगायत धर्मास बचन साहित्य हेच आधार साहित्य होय. बसवेश्वरांनी लिहिलेल्या षटस्यल बचनांत लिंगायत धर्माचे संपूर्ण सार सर्वस्व आहे.
बसवेश्वर आणि त्यांचे सहकारी शरणांची बचने आपल्याला अचार-विचाराबदृल मार्गदर्शन करणारे साहित्य म्हणून प्रत्येक लिंगायताने मानले पाहिजे. नंतर आलेले तोंटद सिध्दलिंगेश्वर षण्मुख स्वामी म्ग्गेय मायीदेव इत्यादींचे बचने बसवादि शरणाच्या वचनावर तात्विक सुत्रवार भाष्य, टीका लिहल्याप्रमाणे आहेत. त्यानंतर निजगुण शिवयोगी, मुप्पिन षडक्षरी, सर्पभूषण शिव्योगी बाल्लीला महंत योगी इ. प्रत्येक शिवयोगींचे साहित्य लिंगायत परंपरेत आहे. याशिवाय बसवादि प्रमथापासुन त्यानंतर होऊन गेलेल्या प्रत्येक शरणांच्या जीवनावर रचलेली पुराणे व काव्य साहित्य आहेत. या सर्व साहित्याचा अभ्यास केल्यावर असे वाटू लागते की बसवादि शिवशरणांचे बचन साहित्य हे लिंगायत धर्माच्या पाठ्य पुस्तकाप्रमाणे आहे. श्री. सिध्दलिंगेश्वर षणमुख स्वामी,मग्गेय मायीदेव इ वचन साहित्याला प्रथम क्रमांकात प्रमाण ग्रंथ असे म्हणता येईल निजगुण श्विवयोगी, मुप्पीनार्थ, शिवायोगि शिवाचार्य इत्यादिंचे साहित्य व्दीतीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ, हरीहर, राघवंक, चामरस इ.चे पुराण साहित्य तृतीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ आहेत असे म्हणावे लागेल.
या प्रकारे शरणांच्या वचनांच्या आधारे आचरण आणि विचार करणारेच खरे लिंगायत आहेत असे शिवयोगी सिध्दरामेश्वरांनी आपल्या वचनात म्हटले आहे.
आमच्या आचरणास आमच्या पूर्व पुरातनांचे सांगणेच इष्ट आहे.

स्मृती समुद्रात जाऊ घा, श्रुती वैकुंठात राहू घा

पुराण अग्नीत जाऊ घा, आगम वायूत जाऊ घा

आमुच्या शरणांचे वचन कपिलसिध्दमल्लिकार्जुन

महालिंगाच्या हृदयात ग्रंथित होऊ घा


आमच्या एका वचनाच्या पारायणास

व्यत्साचे एक पुराण पारायण होई न सम

आमचे एकशे आठ वचनांच्या अध्ययनास

शत रूद्रादि असे न सम

सोलापूरचे सिध्दरामेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे लिंगायतांज्या आचार व विचाराला शरणांचे वचनेच आधार शास्त्र होय. लिंगायत धर्मानुयायांनी वचनांचे पारायण आणि अध्ययन करावयास हवे. असे अध्ययन केल्यास त्याचे फळ म्हणून स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. सत्यार्थ निर्णय घेताना शास्त्र प्रमाणापेक्षा स्वानुभव प्रमाणाच श्रेष्ठ मानून लिंगायतांनी विश्वास ठेवावा. या कारणे मुढ संप्रदत्यापेक्षा सत्य हेच श्रेष्ठ समजून स्वतंत्रपणे विचार करणाराच खरा लिंगायत होय.

आमुच्या एक हजार वचनांच्या पारायणास

गायत्रीचे एक लक्ष जप न होई समान

कपिलसिद्ध मल्लिकार्जुन (शिवयोगी सिध्दरामेश्वर व. ८५९)

योग समाधी[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. कबीर और बसवेश्वर तुलनात्मक अध्ययन (हिंदी, लेखक - डॉ. शंकरराव कप्पीकेरी)
 2. बसवबोध (बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान, मूळ कानडी, मराठी अनुवाद डॉ. इरेश सदाशिव स्वामी)
 3. महात्मा बसवेश्वर - कार्य आणि कर्तृत्व (मराठी, लेखक - सुभाष देशपांडे)
 4. महात्मा बसवेश्वर आणि शरणकार्य (लेखक - डॉ. अशोक प्रभाकर कामत)
 5. बसवेश्वर - काव्यशक्ति और सामाजिक शक्ति (हिंदी, लेखक - काशीनाथ अंबलगे)
 6. बसवेश्वर (इंग्रजी, लेखक - अनंत पै)
 7. वीरशैव तत्त्वज्ञान (मराठी, लेखक - सुधाकर देशमुख)

सिद्धरामेश्वरील पुस्तके[संपादन]

 • १) श्री सिद्धरामेश्वर आरती संग्रह (श्री. सिद्रामप्पा कल्लप्पा हुलसुरे, सोलापूर )
 • २) श्री सिद्धरामेश्वरानी स्थापन केलेले सोलापुरातील अष्टविनायक ( श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी, सोलापूर)
 • ३) शिवकुंजातील सिद्धफुले -( मराठी, लेखक - श्री. शि. श. माशाळ )
 • ४) शिवयोगी सिद्धरामेश्वर - (मराठी, लेखक - श्री. दा. का. थावरे)
 • ५) कथा श्रीसिध्दरामांच्या - (मराठी, लेखक - शांता मरगूर )
 • ६) शरण जीवन दर्शन (मराठी, लेखक - श्री. राजू ब. जुंबरे )
 • ७) सोलापूर जिल्याहयाचा इतिहास मराठा कालखंड - (मराठी, लेखक - श्री. गोपाळ देशमुख)

बसवेश्वरांवरील पुस्तके[संपादन]

 • कबीर और बसवेश्वर तुलनात्मक अध्ययन (हिंदी, लेखक - डॉ. शंकरराव कप्पीकेरी)
 • बसवबोध (बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान, मूळ कानडी, मराठी अनुवाद डॉ. इरेश सदाशिव स्वामी)
 • महात्मा बसवेश्वर - कार्य आणि कर्तृत्व (मराठी, लेखक - सुभाष देशपांडे)
 • महात्मा बसवेश्वर आणि शरणकार्य (लेखक - डॉ. अशोक प्रभाकर कामत)
 • बसवेश्वर - काव्यशक्ति और सामाजिक शक्ति (हिंदी, लेखक - काशीनाथ अंबलगे)
 • बसवेश्वर (इंग्रजी, लेखक - अनंत पै)
 • वीरशैव तत्त्वज्ञान (मराठी, लेखक - सुधाकर देशमुख)


बाह्य दुवे[संपादन]