शिवदास घोडके
Appearance
शिवदास घोडके हे एक ज्येष्ठ रंगकर्मी होते.
जीवन व कारकीर्द
[संपादन]इसवी सन १९८१ मध्ये त्यांनी नेशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली येथे पदवी मिळवली.
- इसवी सन १९८२ मध्ये त्यांनी त्याच्या संस्थेतून फेलोशिप (अडवान्स कोर्स इन अँक्टिंग) पास केला.
- नंतर त्यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक गजानन जागीरदार यांनी तयार केलेला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथील स्क्रीन अँडप्टेशन कोर्स पास केला.
- शिवदास यांनी २०० हून अधिक नाटके व एकांकिका दिग्दर्शित केल्या.
- विशेष मुलांना घेऊन सुद्धा दिग्दर्शन केले.
- त्यांचे रंगभूमीवर महाभोजन तेराव्याचे हे पहिले नाटक होते.
- आमदार सौभाग्यवती हे नाटक मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ रंगकर्मी शिवदास घोडके यांनी दिग्दर्शन केले होते. या नाटकात ज्योती चांदेकर यांची भूमिका होती.हे दोघेही हयात नाहीत.
- त्यांनी दिग्दर्शन केलेले शेवटचे नाटक मुंबई कोणाची? हे होते. हे नाटक साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी लिहिले आहे.
- त्यांनी खालील चित्रपटात भूमिका केल्या.
दूरी (राजदत्त),तेरे शहर में (सागर सरहद्दी),दाज्जू (मदन बवरिया),गभरा (राजीव खंडागळे),रंगपटंगा (नाम जोशी).
त्यांनी खालील चित्रपटात कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले.ते सर्व चित्रपट जब्बार पटेल यांनी दिग्दर्शन केलेले होते.
डॉ. आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, वीर सावरकर.
खालील नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले.
महाभोजन, घोडा, कोंडी, राजदर्शन, संसारगाथा, पोलिसनामा, शेवंत जिती हाय, बळी, सती, मय्यत, लाईफ पार्टनर, जंगीराम की हवेली, अंधेर नगरी, मधुचक्र, आमदार सौभाग्यवती.
मृत्यू
[संपादन]रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांचे बेलापूर येथील रुग्णालयात निधन झाले.[२]