शाहू,भवानीबाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
          *छञपती शाहू महाराज*              

छत्रपती शाहु महाराज हे स्वराज्याचे पाचवे छत्रपती होते. ते छञपती संभाजी महाराज व महाराणी येसुबाई यांचे पुञ होते. संभाजी महाराज यांची सततची धावपळ तसेच शत्रूवर चालून जाने यामुळे त्यांना फार कमी काळ वडीलांचा सहवास लाभला.परंतू ते आपल्या वडिलांसारखेच शूर व पराक्रमी होते. शाहु महाराज हे रणधुरंधर व बुध्दीमान होते. वडील संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्यांना व त्यांच्या मातोश्री येसुबाई यांना कैद केले.पुढील सर्व शिक्षण येसुबाई यांनी त्यांना कैदेत असतानाच दिले. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुढल्या मुघल बादशहाने त्यांची कैदेतून सुटका केली.मुघल कैदेतून स्वराज्यात आल्यावर त्यांना महाराणी ताराबाई यांनी विरोध केला त्यामूळे त्यांच्यात लढाई झाली त्या लढाईमधे शाहु विजयी झाले.त्यानंतर त्यांनी ताराबाई यांना कोल्हापुर हे संस्थान भेट दिले.शाहु महाराज यांच्या काळातच मराठ्यांची राजधानी गड-कोट यांवरुन जमिनिवर सपाटिला आली.शाहु महाराज यांनी पेशवा बाजीराव यांसारख्या रणझुंझार व पराक्रमी योध्याना सोबत घेऊन स्वराज्याचा विस्तार चहू दिशांना पसरवला.