शाश्वत विकास उद्दिष्टे-२०१५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सप्टेंबर २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने एकूण १७ उद्दिष्टे असणारा २०३० साठीचा शाश्वत विकास अजेंडा स्वीकारला. ही १७ उद्दिष्टे व त्याअंतर्गत असणारी १६९ छोटी ध्येये सदस्य राष्ट्रांनी २०१६ ते २०३० या कालावधीत साध्य करायची आहेत.

१७ ध्येये[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

१. सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.[१] २. भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.[१]

३. आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे.[१]

४. सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे.[१]

५. लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.[१]

६. पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.[१]

७. सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.[१]

८. शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे.[१]

९.पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे.[१]

१०. विविध देशांमधील असमानता दूर करणे.[१]

११. शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे.[१]

१२. उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे.[१]

१३. हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.[१]

१४. महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे.[१]

१५.परिस्थितिकीय व्यवस्थांचा (Ecosystem) शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे.[१]

१६. शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे.[१]

१७. चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे.[१]

संदर्भ  [संपादन]

  1. ^ a b c d e f g h i j k l m n o p q http://spardhapariksha.org/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A5%A8/