शांताराम बापुराव जानोरकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शांताराम बापूराव जानोरकारांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात महान या छोट्याश्या गावी १५ जुलै, १९३९ रोजी झाला. त्यांचे वडील बापूराव उत्तमराव जानोरकार महान येथे वैद्यकीय व्यवसाय करत असत आणि कालांतराने त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. शांताराम यांचे शालेय शिक्षण पातूर आणि अकोला येथे पार पडले आणि इ.स. १९६४ साली त्यांनी कृषी शाखेतून विज्ञानाची पदवी (BSc) प्राप्त केली. कालांतराने गणित ह्या विषयाकडे त्यांचा ओढा वाढू लागला आणि त्यांनी गणितातील अनेक विस्थापित सिद्धांताचा सखोल आभ्यास केला आणि काही नवीन सिद्धांत प्रस्थापित केले.

जानोरकारांचे सर्वात महत्त्वाचे संशोधन[ संदर्भ हवा ] भूमिती मधील जागतिक शास्त्रज्ञांना मान्य असलेली जगातील कार्यालयीन मापनाची खुण अंश (Degree) असून अंश हेच जानोरकारांनी केलेल्या संपूर्ण संशोधनाचे बीज, उगमस्थान, प्रमाण, आधार आहे.

१. जानोरकारांच्या मते 'गणितातील पाय (π)ची किंमत अंदाजे अनंत अपरिमेय बीजातीत आहे' हा सिद्धांतच मुळात चुकीचा आहे. पाय (π)ला म्हणजेच गोबाला निश्चित किंमत आहे व टी ३.१४१५९२६५३ एवढी निश्चित आहे.

२. सुप्रसिद्ध वैज्ञानिक सर अलबर्ट आईन्स्टाईनचे शक्तीचे सूत्र E=Mc2 हे चुकीचे कसे हे जानोरकारांनी सप्रमाण सिद्ध केले असून त्याऐवजी E=Mm2 असे त्यांनी शक्तीचे सूत्र दिले असून १८६००० (एक लक्ष शहाऐंशी हजार) मैल प्रती सेकंद हा प्रकाशाचा वेग नसून प्रकाशाच्या उगम स्थानाचा वेग आहे. प्रकाशाचा वेग २२,३२,००००००० (बावीस अब्ज बत्तीस कोटी) मैल प्रती सेकंद हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.

३. जागतिक गणित तज्ञांनी दिलेली बिंदूची व्याख्या 'बिंदूला अस्तित्व आहे, पण मिती नाहीत - जसे लांबी, रुंदी, उंची किंवा खोली' ही चुकीची व्याख्या ठरवून त्यांनी नवीन बिंदूची व्याख्या 'बिंदूला अस्तित्व असून ४ मिती आहेत, जसे काळ, लांबी, रुंदी, उंची किंवा खोली आहे' आणि ती सप्रमाण सिद्ध करून दाखवली आहे.

४. गडगडणारा मेघ किंवा ढग पृथ्वीपासून किती अंतरावर आहे याचे जानोरकारांनी सोप्यात सोपे सूत्र दिले आहे.

५. वर्तुळाच्या केंद्रस्थानी १ वर्तुळ केंद्रबिंदू आहे आणि वर्तुळ परिघावर ६ वर्तुळ केंद्रबिंदू आहेत. असे एकून ७ व्यक्त बिंदू जानोरकारांनी दाखविले आहेत. घानाच्या ८ अव्यक्त बिंदू आहेत व एक वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे असे ९ अव्यक्त बिंदू आहेत. म्हणजेच वर्तुळाच्या केंद्रस्थानी १+२=३ बिंदू आहे. याप्रमाणे वर्तुळांश म्हणजेच आद्य वर्तुळाच्या केंद्रस्थानी परिघावर ६ केंद्र आहेत. म्हणजेच वर्तुळांश आद्य ३ व अंत्य ६=३६ अंशात वर्तुळांश व त्यावर वर्तुळ परीघ किंवा शून्य ठेवले असतं, ३६० अंशात तर वर्तुळांश ३६ अंशात आहेत. या अंशाचे भाषेत रूपांतर करून श्री जानोरकार यांनी अव्यक्त आत्मा आणि व्यक्त आत्मा यांची सिद्धता सप्रमाण सिद्ध करून दाखवली आहे.

६. वैदिक ओम, पौराणिक ओम, आधुनिक ओमची माहिती आध्यात्मिक जगतात आजपर्यंत कुणाच माहित नाही. पतंजली योगपीठाद्वारे दाखवण्यात येत असलेली ओम ही आधुनिक ओमची चुकीची, भ्रष्ट नक्कल आहे. याच प्रमाणे मराठी शब्दकोशात मा. श्री. लक्ष्मणशास्त्री यांनी दिलेल्या वैदिक, पौराणिक व आधीनिक ओमची चुकीची, भ्रष्ट नक्कल असून श्री शांताराम जानोरकारांनी एका अंशाला एक कंस त्रिज्येप्रमाणे व अंशाचे भाषेत रूपांतर करून त्यांनी ओमची वैज्ञानिक दृष्ट्या सिद्धता सप्रमाण सिद्ध करून दिली आहे.