Jump to content

शर्वरी वाघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
شروری واگھ (skr); শর্বরী বাঘ (bn); Sharvari Wagh (fr); शारवरी (mai); 샤르바리 와그 (ko); Sharvari Wagh (ast); Шарвари (ru); शर्वरी वाघ (mr); Sharvari Wagh (de); Sharvari Wagh (pt); Sharvari Wagh (ga); شارواری (fa); Sharvari Wagh (es); Sharvari (en); शारवरी (ne); شروری واگھ (ur); Sharvari Wagh (pt-br); シャルヴァリ・ワーグ (ja); شارفارى واج (arz); శార్వరి వాఘ్ (te); ശർവാരി വാഗ് (ml); Sharvari Wagh (nl); شروري (ps); शारवरी वाघ (hi); ᱥᱟᱨᱵᱷᱚᱨᱤ (sat); ਸ਼ਰਵਰੀ ਵਾਘ (pa); শৰ্ৱৰী (as); شارفاري واغ (ar); ସରବରୀ ୱାଗ୍ (or); சர்வாரி வாக் (ta) actriz india (es); aktore indiarra (eu); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); actriz india (ast); индийская актриса (ru); indische Schauspielerin (de); بازیگر هندی (fa); 印度女演員 (zh); indisk skuespiller (da); Hintli kadın oyuncu (tr); インドの女優 (ja); ممثله من الهند (arz); індійська акторка (uk); भारतीय अभिनेत्री (जन्म: 1997) (hi); intialainen näyttelijä (fi); ভাৰতীয় অভিনেত্ৰী (as); இந்திய நடிகை (ta); attrice indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); indijska glumica (hr); भारतीय अभिनेत्री (mr); actriz indiana (pt); Indian actress (en); שחקנית הודית (he); بھارتی اداکارہ (ur); actriță indiană (ro); indisk skådespelare (sv); ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ (or); indyjska aktorka (pl); actriu índia (ca); د هند د هندۍ ژبې فيلمونو ستورې (ps); भारतीय अभिनेत्री (ne); India näitleja (et); actores a aned yn 1996 (cy); भारतीय अभिनेत्री (mai); actriz india (gl); ممثلة هندية (ar); indisk skodespelar (nn); 인도 여배우 (ko) शारवरी वाघ (ne); শর্বরী (bn); शारवरी वाघ (mai)
शर्वरी वाघ 
भारतीय अभिनेत्री
Шарвари Ваг 30 мая 2024 года
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावशारवरी
जन्म तारीखजून १४, इ.स. १९९६
मुंबई
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २०२०
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

शर्वरी वाघ (जन्म १४ जून १९९७), ही शर्वरी या नावाने ओळखली जाणारी ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.[] तिने २०१५ मध्ये लव रंजन आणि संजय लीला भन्साळी यांच्यासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर कबीर खान यांच्या युद्ध नाटक मालिकेत द फॉरगॉटन आर्मी - आझादी के लिए (२०२०) द्वारे तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

शर्वरीने यशराज फिल्म्सच्या कॉमेडी बंटी और बबली २ (२०२१) मधून चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले, ज्यात तिने सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेर पुरस्कार जिंकला. २०२४ मध्ये व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी कॉमेडी हॉरर मुंज्या चित्रपटाद्वारे तिने तिचे यश संपादन केले.

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

शर्वरी वाघचा जन्म १४ जून १९९७ रोजी एका मराठी कुटुंबात झाला. [] त्यांचे पालक शैलेश वाघ हे बांधकाम व्यावसायिक आणि नम्रता वाघ ही आर्किटेक्ट आहेत. तिने मुंबईच्या दादर पारसी युथ असेंब्ली हायस्कूल आणि रुपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.[] महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे तिच्य आईकडून तिचे आजोबा होते.[]

कारकीर्द

[संपादन]

शर्वरीने प्यार का पंचनामा २, बाजीराव मस्तानी आणि सोनू के टीटू की स्वीटी या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.[] तिने सांगितले की ती २०१४ पासून चित्रपटांमधील मुख्य भूमिकेसाठी ऑडिशन देत होती.[] तिने २०२० च्या अमेझॉन प्राइम मालिकेतील द फॉरगॉटन आर्मी - आझादी के लिए मधून सनी कौशलसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.[]

शर्वरीने राणी मुखर्जी, सैफ अली खान आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासमवेत यशराज फिल्म्स च्या क्राईम कॉमेडी बंटी और बबली २ मध्ये पदार्पण केले, जो २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता.[] तिच्या अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेर पुरस्कार आणि वर्षातील स्टार महिला पदार्पणाचा आयफा पुरस्कार मिळाला. हिंदुस्तान टाईम्सने नोंदवले की, "शर्वरी तिच्या पहिल्या चित्रपटासाठी खूपच आत्मविश्वासू आहे आणि तिची स्क्रीनवरील उपस्थिती उत्तम आहे."[] पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कामगिरी केली नाही.[]

तिचा पुढचा चित्रपट तीन वर्षांनंतर २०२४ मध्ये मुंज्या हा विनोदी हॉरर चित्रपट प्रदर्शित झाला. महाराष्ट्रीय लोककथेतील मुंज्या पासून प्रेरित होऊन, हा चित्रपट मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा एक भाग म्हणून काम करत होता.[१०] रेडिफमधील सुकन्या वर्मा म्हणाल्या, "शर्वरी तिच्या अभिनयावर टिकून आहे - उत्साहात ती तेजस्वी तर प्रोस्थेटिक्समध्ये रागीट दिसते".[११] व्यावसायिकदृष्ट्या, हा चित्रपट स्लीपर हिट ठरला आणि तिला यशस्वी भूमिका मिळवून दिली.[१२] [१३] शर्वरीने यश राज फिल्म्सच्या पीरियड नाट्य चित्रपट महाराज मध्ये जुनैद खान सोबत एक छोटी भूमिका केली होती (विशेष उपस्थिती म्हणून). हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.[१४] नंतर शर्वरीने जॉन अब्राहमसोबत वेदा या अ‍ॅक्शन नाट्यपटामध्ये वेदा बेर्वा या एका दलित महिलेची मुख्य भूमिका साकारली जिच्यावर तिच्या जातीमुळे सामाजिक अन्याय होत असतात. अब्राहम ह्यात माजी सैनीक आहे जो वेदाची लढण्यामध्ये मदत करतो.[१५] चित्रपटाच्या संमिश्र पुनरावलोकनात, स्क्रोल वेबसाइटच्या नंदिनी रामनाथ यांनी "तिच्या नायिकेच्या लढाऊ वृत्तीला किती चांगल्या प्रकारे दर्शवीले" याची नोंद घेतली.[१६] हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एक मोठा फ्लॉप ठरला, ज्याचे कारण द टाइम्स ऑफ इंडियाने सोबत प्रदर्शित झालेल्या स्त्री २ चित्रपटाला दिले.[१७]

शर्वरी पुढे आलिया भट्ट सोबत अल्फा या हेरगीरी-थरारपटात सामील होईल. [१८]

चित्रपटांची यादी

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका नोट्स Ref.
२०१५ प्यार का पंचनामा २ सहाय्यक संचालक []
बाजीराव मस्तानी सहाय्यक संचालक []
२०१८ सोनू के टीटू की स्वीटी सहाय्यक संचालक []
२०२१ बंटी और बबली २ सोनिया/बबली []
२०२४ मुंज्या बेला [१९]
महाराज विराज विशेष उपस्थिती [२०]
वेदा वेदा [१५]
२०२५ अल्फा चित्रीकरण चालू [२१]

पुरस्कार

[संपादन]
वर्ष पुरस्कार श्रेणी काम निकाल संदर्भ.
२०२२ २२ वे आयफा पुरस्कार वर्षातील स्टार पदार्पण - महिला बंटी और बबली २ विजयी [२२] [२३]
६७ वे फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण विजयी [२४] [२५]
पिंकव्हिला स्क्रीन अँड स्टाइल आयकॉन्स पुरस्कार स्टायलिश उदयोन्मुख प्रतिभा - महिला नामांकन [२६]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Kumari Rana, Priya (9 February 2023). "Class of 2023: Sharvari, the 'Bunty Aur Babli 2' actress talks about films, fashion and more". Cosmopolitan India. 19 January 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 November 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Bunty Aur Babli 2 star Sharvari Wagh celebrates 25th birthday with an intimate house party". Bollywood Hungama. 16 June 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 June 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Meet 'Bunty Aur Babli 2' debutante Sharvari Wagh". DNA India (इंग्रजी भाषेत). 21 August 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 November 2021 रोजी पाहिले.
  4. ^ a b c d e Singh, Mohnish (13 January 2020). "Why is Bollywood excited about Sharvari Wagh?" Check |url= value (सहाय्य). Rediff (इंग्रजी भाषेत). 25 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 November 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Bunty Aur Babli 2 actor Sharvari Wagh on being rejected for 6 years before getting a project". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 28 February 2020. 23 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 November 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "The Forgotten Army: Azaadi Ke Liye trailer sees Sunny Kaushal, Sharvari lead INA, wage war against British rule". Firstpost. 7 January 2020. 8 January 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 January 2020 रोजी पाहिले.
  7. ^ a b "Bunty Aur Babli 2 movie review and release highlights". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 19 November 2021. 19 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 November 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "Bunty Aur Babli 2 movie review: Rani Mukerji is the saving grace in this snooze-fest, don't watch even if paid for it". Hindustan Times. 19 November 2021. 20 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 November 2021 रोजी पाहिले.
  9. ^ "Can Ranbir Kapoor do for Yash Raj with Shamshera what Aamir Khan, Ranveer Singh and Akshay Kumar could not?". Mint. 24 June 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 June 2022 रोजी पाहिले.
  10. ^ "Sharvari opens up about mouthwatering Konkan cuisine experience on 'Munjya' set". The Times of India. 2 June 2024. 2 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 June 2024 रोजी पाहिले.
  11. ^ "Munjya Review: Watch Out For Abhay Verma!" Check |url= value (सहाय्य). Rediff. 11 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 June 2024 रोजी पाहिले.
  12. ^ Abraham, Hannah (3 July 2024). "'Munjya' Star Sharvari On Finding Success In Bollywood With A Supernatural Horror-Comedy & Her Desire To Work With Greta Gerwig". Deadline Hollywood. 3 July 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 July 2024 रोजी पाहिले.
  13. ^ "Munjya Emerges As Surprise Hit!" Check |url= value (सहाय्य). रीडिफ.कॉम. 10 June 2024. 10 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 June 2024 रोजी पाहिले.
  14. ^ "Junaid Khan resumes shooting for Maharaja; film also stars Shalini Pandey and Sharvari Wagh". News18. 9 June 2021. 23 May 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 May 2022 रोजी पाहिले.
  15. ^ a b "John Abraham and Sharvari Wagh commence shooting for Nikkhil Advani's next titled Vedaa". Bollywood Hungama. 21 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 June 2023 रोजी पाहिले.
  16. ^ Ramnath, Nandini (15 August 2024). "'Vedaa' review: Caste in the same mould". Scroll.in. 15 August 2024 रोजी पाहिले.
  17. ^ "Stree 2 dominates box office, leaving Khel Khel Mein and Vedaa far behind: Trade experts - Exclusive". The Times of India. 2024-08-20. ISSN 0971-8257. 27 August 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-10-22 रोजी पाहिले.
  18. ^ Ramachandran, Naman; Frater, Patrick (4 July 2024). "Alia Bhatt, Sharvari-Led Yash Raj Spy Universe Film Reveals Title". Variety. 5 July 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 July 2024 रोजी पाहिले.
  19. ^ "Maddock Films' unveils 'Munjya' movie to release on June 7". The Week (इंग्रजी भाषेत). 21 May 2024. 21 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 May 2024 रोजी पाहिले.
  20. ^ Kanabar, Ankita (14 June 2024). "High Court gives stay order to Aamir Khan's son Junaid Khan's debut film 'Maharaj' till June 18". The Times of India. 14 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 June 2024 रोजी पाहिले.
  21. ^ Arya, Prachi (5 July 2024). "Alia Bhatt, Sharvari Wagh's YRF spy-thriller titled 'Alpha', shooting begins". India Today. 5 July 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 July 2024 रोजी पाहिले.
  22. ^ "IIFA Awards 2022:a list of all the winners". IIFA (इंग्रजी भाषेत). 4 June 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 June 2022 रोजी पाहिले.
  23. ^ "IIFA Awards 2022 complete list of winners: Vicky Kaushal, Kriti Sanon win top acting honours". DNA India (इंग्रजी भाषेत). 5 June 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 June 2022 रोजी पाहिले.
  24. ^ "Winners of the Filmfare Awards 2022". Filmfare (इंग्रजी भाषेत). 1 September 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 August 2022 रोजी पाहिले.
  25. ^ "Filmfare Awards 2022 full list of winners". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 31 August 2022. 31 August 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 August 2022 रोजी पाहिले.
  26. ^ "Pinkvilla Style Awards Nominations: Sharvari To Rashmika, Nominees For Super Stylish Emerging Talent Female". HiIndia.com. 11 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2022 रोजी पाहिले.