शरीर छेदन
शरीर छेदन (किंवा शरीर टोचणे) हा एक शरीर सुधारण्याचा प्रकार आहे. यात मानवी शरीराच्या एखाद्या भागाला भोक पाडतात किंवा कापतात. त्याठिकाणी एखादा दागिना घालतात किंवा एखादा इम्प्लांट केला जातो. छेदन हा शब्द शरीराला छेदन करण्याच्या कृतीचा किंवा अभ्यासाचा किंवा या कृतीतून किंवा अभ्यासाद्वारे तयार केलेल्या शरीरातील कामासाठी संदर्भ म्हणून वापरू शकतात. हे परिणामी सजावट किंवा वापरलेल्या सजावटीच्या दागिन्यांसाठी देखील याचा संदर्भ घेऊ शकतो. लोकप्रिय विश्वास असा आहे की छेदन केवळ दागिन्यांशी संबंधित आहे. परंतु छेदन हे शरीर आणि त्वचेचे प्रोफाइल आणि देखावा बऱ्याच प्रमाणात बदलते. उदा. सोन्याच्या, प्लॅटिनमच्या, टायटॅनियमच्या किंवा मेडिकल ग्रेड स्टीलच्या धाग्यांनी बनवलेली त्वचा. शरीर छेदनाचा इतिहास चुकीच्या माहितीमुळे आणि चांगल्या संदर्भाच्या अभावामुळे अस्पष्ट झाला आहे. पुरातन काळापासून दोन्ही लिंगांद्वारे वेगवेगळ्या स्वरूपात शरीर छेदनाचा वापर केला जात असल्याचा कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत.
कान टोचणे आणि नाक टोचणे हे जास्त मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. ऐतिहासिक नोंदीमध्ये बरेच पुरावे याचे प्रतिनिधित्व करतात. आजपर्यंत सापडलेल्या सर्वात जुन्या ममीच्या अवशेषांमध्ये कानातले दागिने आढळुन आले आहेत, याचा अर्थ् ५००० वर्षांपूर्वी कान टोचण्याचे प्रकार होत होते. इ.स.पू. १५०० मध्ये नाक टोचेण्याचे कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या शरीर छेदनाचे जागतिक स्तरावर कागदोपत्री पुरावे आहेत. ओठ आणि जीभ छेदनाचे प्रकार मुख्यत्वे आफ्रिकन आणि अमेरिकन आदिवासी संस्कृतींमध्ये आढळून आले आहेत. स्तनाग्र आणि जननेंद्रियाचे छेदन देखील विविध संस्कृतींमध्ये केले होते. स्तनाग्र छेदनाचे प्रकार प्राचीन रोम मध्ये होत होते. जननेंद्रियाच्या छेदनाचे पुरावे प्राचीन भारतात वर्णवलेले आहेत. नाभी छेदन करण्याचा इतिहास तितकासा स्पष्ट नाही. सध्या पाश्चिमात्य संस्कृतीत शरीर छेदण्याची पद्धत वाढत चालली आहे आणि द्वितीय विश्वयुद्धानंतर याची लोकप्रियता वाढली आहे. कानांशिवाय इतर ठिकाणी छेदनाची पद्धत १९७० च्या दशकात उपसांस्कृतिक लोकांत पसरली तर १९९० च्या दशकात मुख्य प्रवाहात पसरली.
सहसा छेदन करणे किंवा छेदन न करण्याची कारणे बरीच भिन्न भिन्न आहेत. काही लोक धार्मिक किंवा आध्यात्मिक कारणांसाठी शरीर टोचतात. तर काही स्वतःची अभिव्यक्ती किंवा सौंदर्याचा वाढवण्यासाठी, तर काही लैंगिक सुख वाढवण्यासाठी शरीर छेदन करतात. काही संस्कृतीशी जुळवून घेण्यासाठी, तर काही त्याविरूद्ध बंड करण्यासाठी शरीर छेदन करतात. छेदन करण्याचे काही प्रकार विवादास्पद आहेत, विशेषतः जेव्हा छेदन तरुणांवर केले जाते. बहुतेक शाळा, काही कंपन्या आणि धार्मिक गटांद्वारे छेदन प्रदर्शन प्रतिबंधित केलेले आहे. यावर वाद असूनही काही लोक मोठ्या प्रमाणात शरीर छेदन करतात. गिनीज बुकमध्ये नाव येण्यासाठी लोकांनी अंगावर हजारो कायमस्वरुपी आणि तात्पुरते छेदन केल्याच्या नोंदी सापडतात.