Jump to content

शरीयत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इस्लामचे दोन मुख्य स्रोत
कुरआनाचे मराठी भाषांतर आणि हदीस

शरियत किंवा शरिया किंवा शरिअत (अरबीत شريعة , इंग्रजीत shariya ) हा शब्द ‘शरा’ या अरबी शब्दापासून तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ 'कायदा’ असा होतो. सृष्टिकत्याचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यावर जो अंतिम ग्रंथ अवतरित केला म्हणजे ़कुरआन आणि त्यांची शिकवण आपल्या उक्ती, कृती व सहमतीद्वरारे तोच कुरआन ज्या प्रेषितांनी लोकांना समजावून सांगितला ती शिकवण (सुन्नत) या दोन स्त्रोतांवर आधारित कायदे म्हणजेच शरीयत होय. ़कुरआन किंवा हदिसग्रंथात एखाद्या विषयावर स्पष्ट मार्गदर्शन सापडले नाही, तर ‘सहाबा’ म्हणजे आदरणीय प्रेषित मुहम्मद सल्लम यांचे सहकारी (सहाबीचे अनेकवचन सहाबा) यांच्या जीवनातील प्रसंग किंवा त्यांच्या वचनांशी सुसंगत असलेली भुमिका अंगिकारली जाते, पण ़कुरआन, हदिस व सहाबांच्या जीवनाततही एखाद्याला स्पष्टपणे एखाद्या मुद्यावर काही संदर्भ सापडला नाही, काही जन ़फुकहा इस्लामी विचारवंतांनी मांडलेले मत विचारात घेतात, तर काही जन ‘अहेल बैत’ प्रेषितांच्या वंशजापैकी असलेले इमाम, इस्लामी विचारवंत यांनी मांडलेले मत विचारात घेतात, तर काही जन आदरणीय प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यानंतरच्या तीन अधिकृत पिढ्यांतील इस्लामी विचारवंतांची मते विचारात घेतात. यातही स्पष्टपणे संदर्भ लागला नाही, तर मग ती व्यक्ती स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीने निर्णय घेऊ शकते, मात्र तो निर्णय उपरोक्त तीन्ही स्त्रोतांच्या मुलभूत शिकवणीशी विसंगत नको. साध्या शब्दात शरियत म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून अल्लाह व पैगंबरांची शिकवण होय. तीच शिकवण, तीच नीतीमुल्ये, तीच नियमावली, तीच संहिता जी सुफी संतांनी भारतीय उपमहाद्विपामध्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना वर्णवादी गुलामगीरीतून मूक्त केले. त्यामुळे यापुढे आपण शरियत या शब्दाऐवजी आपण पैगंबरी नीतीनियम किंवा पैगंबरी शिकवण असे शब्दप्रयोग करू या इन्शा अल्लाह आणि तसलेच पर्यायी शब्द उपयोगात आणणे आजची गरज आहे. []

  1. ^ Thalib, Prawitra (1 September 2018). "DISTINCTION OF CHARACTERISTICS SHARIA AND FIQH ON ISLAMIC LAW". www.researchgate.net. 1 September 2018 रोजी पाहिले.