शरद पोंक्षे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शरद पोंक्षे
कार्यक्षेत्र अभिनय (नाटक, चित्रपट, टीव्ही)
भाषा मराठी (स्वभाषा)
मराठी, हिंदी (अभिनय)
प्रमुख नाटके मी नथुराम गोडसे बोलतोय
प्रमुख टीव्ही कार्यक्रम दामिनी
वादळवाट
अधिकृत संकेतस्थळ http://www.sharadponkshe.com

शरद पोंक्षे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रातील एक प्रतिभावंत कलाकार म्हणून शरद पोंक्षे ओळखले जातात.नाट्य सृष्टी बरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विनोदी, गंभीर, नायक, खलनायक तसेच अतिशय संवेदनात्मक अश्या सर्व तर्हेच्या भूमिका यशस्वीरीत्या साकारणारे अभिनेते म्हणुन त्यांना ओळखले जाते.

जीवन[संपादन]

शरद पोंक्षे यांचे इयत्ता सहावीपर्यंतचे शालेय शिक्षण मिरज येथे आजोळी झाले [१]. त्यानंतर त्यांयाचे कुटुंब मुंबईत हलल्यावर, भायंदर येथील "अभिनव विद्या मंदिर" येथील शाळेत त्यांचे पुढील शालेय शिक्षण झाले [२]. इयत्ता बारावीनंतर त्यांनी तीन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम केला. डिप्लोमा अभ्यासक्रमानंतर ते बेस्टमध्ये नोकरीत रुजू झाले.

कारकीर्द[संपादन]

इ.स. १९८८ साली "दे टाळी " या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेद्वारे त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले [२]. इ.स. १९८९ साली "वरून सगळे सारखे" या नाटकातील भूमिकेद्वारे त्यांचा व्यावसायिक रंगमंचावर प्रवेश झाला.

शरद पोंक्षे यांच्‍या नाट्यकारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या "मी नथुराम गोडसे बोलतोय" या नाटकाचा पहिला प्रयोग १० जुलै, इ.स. १९९८ रोजी झाला [२]. या नाटकातील व अन्य माध्यमांतील यशामुळे त्यांनी अभिनयावर लक्ष एकवटण्याचा निर्णय घेतला आणि इ.स. २००० साली बेस्टमधील नोकरी सोडली [२].

मी नथूराम गोडसे बोलतोय[संपादन]

प्रदीप दळवी लिखित व विनय आपटे दिग्दर्शित 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाची निर्मिती माउली प्रॉडक्शनची आहे. हे नाटक १९९७ मध्ये रंगभूमीवर आले. शरद पोंक्षे त्यात नथूरामची भूमिका करत. नाटकाला विरोध होऊ लागल्याने न्यायालयीन लढाई लढावी लागली. उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने नाटकाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतरही नाटकाची बस जाळणे, धमक्या असे प्रकार सुरू होते. अशा विरोधाला झुगारून नाटकाचे प्रयोग सुरू होते. एक हजार प्रयोगाचे लक्ष ठेवण्यात आले होते, पण त्याआधीच जानेवारी २०१६मध्ये ८१७ प्रयोगानंतर नाटकावर पडदा पडला आहे.

आंदोलने, धमक्या व न्यायालयीन लढाई अशा प्रखर विरोधानंतरही रसिकांच्या गर्दीने हाउसफुल ठरलेल्या 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाला अंतर्गत वादाचा फटका बसला आहे. नाटक बंद पाडण्यासाठी झालेला विरोध झुगारून दिमाखात झालेले प्रयोग नाट्यनिर्माता व प्रमुख अभिनेते यांच्यातील वादामुळेच आता थांबले आहेत. वादामुळे नाटकाचे प्रयोग बंद करण्यात आल्याची घोषणा निर्मात्यांनी केल्याने एक हजार प्रयोगांचे स्वप्न भंगले आहे. तर दुसरीकडे नाटकावर कायमचा 'पडदा' पडल्याचे नाट्यवर्तुळात बोलले जात आहे.

नाटक हजाराचा टप्पा गाठत असल्याने विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात हे प्रयोग व्हावेत आणि नथुरामची भूमिका पोहचावी, असा शरद पोंक्षे यांचा विचार होता; पण निर्मात्यांना हे मान्य नसल्याने त्यांनी नाटकाचे प्रयोग बंद केले, असे पोंक्षे म्हणतात.

शरद पोंक्षे यांनी लिहिलेली नाटके[संपादन]

  • हे-राम नथुराम

शरद पोंक्षे यांची भूमिका असलेली नाटके[संपादन]

  • अथांग
  • असं झालंच कसं?
  • उंबरठा
  • एक दिवस मठाकडे
  • एका क्षणात
  • कबिराचे काय करायचे?
  • कळा या लागल्या जीवा
  • गंध निशिगंधाचा
  • गांधी आंबेडकर
  • तिची कहाणी
  • तू फक्त हो म्हण
  • झाले मोकळे आकाश
  • त्या तिघांची गोष्ट
  • नटसम्राट
  • नांदी
  • बॅरिस्टर
  • बायकोचा खून कसा करावा?
  • बेइमान
  • भारतभाग्य विधाता
  • मी नथुराम गोडसे बोलतोय
  • रमले मी
  • लहानपण दे गा देवा
  • वर भेटू नका
  • वरून सगळे सारखे
  • सुखाने नांदा
  • सर्वस्वी तुझीच
  • हाय-राम नथुराम

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

शरद पोंक्षे यांनी दूरचित्रवाणीवरील अनेक मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप सोडली. दूरदर्शन वरील दामिनी या अत्यंत गाजलेल्या मालिकेत त्यांची महत्वाची भूमिका होती. अग्निहोत्र, वादळवाट, कुंकू, कन्यादान, उंच माझा झोका या मालिकांनी शरद पोंक्षे यांना महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय केले. न्यायमूर्ती रानडे व त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित मालिकेत शरद पोंक्षे यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या वडिलांची भूमिका रंगवली. या शिवाय कै. विनय आपटे यांच्या देहावसानानंतर दुर्वा या मालिकेत त्यांची भूमिका शारद्जीनी अतिशय ताकदीने रंगवली.

दूरचित्रवाहिनी-अभिनयाची कारकीर्द[संपादन]

वर्ष (इ.स.) दूरचित्रवाहिनी कार्यक्रम दूरचित्रवाहिनी भाषा सहभाग/टिप्पणी
अग्निहोत्र झी मराठी मराठी अभिनय
उंच माझा झोका झी मराठी मराठी अभिनय
कन्यादान झी मराठी मराठी अभिनय
कुंकू झी मराठी मराठी अभिनय
दामिनी दूरदर्शन सह्याद्री मराठी अभिनय (भूमिका -"उदय कारखानीस")
दुर्वा झी मराठी मराठी अभिनय
वादळवाट झी मराठी मराठी अभिनय (भूमिका -"देवराम खंडागळे")

चित्रपट-कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्रपट भाषा
२०१७ कणिका मराठी
२०१६ विघ्नहर्ता महागणपती मराठी
२०१६ वेल डन भाल्या मराठी
२०१६ वृंदावन [३] मराठी
२०१५ ब्लाक मराठी
२०१५ व्हाट अबाउट सावरकर [४] मराठी
२०१५ संदुक मराठी
२०१४ तप्तपदी मराठी
२०१२ तुकाराम मराठी
२०१३ कुरुक्षेत्र मराठी
२०१३ मोकळा श्वास [५] मराठी
२०१३ अश्याच एका बेटावर [६] मराठी
२०१४ सुराज्य मराठी
२०१३ अंगारकी मराठी
२०१२ हाय कमांड [७] मराठी
२०१२ जरा जपून करा मराठी
२०१२ सत्या मराठी
२०१३ जय शंकर मराठी
२०१३ जय महाराष्ट्र मराठी
२०१३ धर्मांतर मराठी
२०१३ स्वराज्ज्य मराठी
२०१३ कुरुक्षेत्र मराठी
२०१३ सुराज्य मराठी
२०१२ फक्त सातवी पास मराठी
२०१२ गोळा बेरीज मराठी
२०१२ उदय मराठी
२०१२ बोकड मराठी
२०१२ सवाई सर्जाच्या नावाने चांगभलं मराठी
२०११ तूच घराची लक्ष्मी मराठी
२०११ हिप हिप हुर्रे मराठी
२०११ आरंभ मराठी
२०१० साई दर्शन . . . एक अनुभव मराठी
२०१० जेता मराठी
२०१० मिशन पॉसिबल [८] मराठी
२०१० पाश मराठी
२०१० मुलगा मराठी
२०१० कोण आहे रे तिकडे मराठी
२०१० क्रांतिवीर राजगुरू मराठी
२०१० झाले मोकळे आकाश मराठी
२००८ अचानक मराठी
२००८ धुडगूस मराठी
२००८ होतं असं कधी कधी मराठी
२००७ बंध प्रेमाचे मराठी
२००७ वासुदेव बळवंत फडके मराठी
२००६ रस्ता रोको मराठी
२००६ गाढवाचं लग्न मराठी
१९८८ फेरा मराठी
२००५ एक पल का प्यार हिंदी
२००० हे राम हिंदी
१९८८ दे टाळी मराठी

[९]

संदर्भ व नोंदी[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ गिरमे,सागर (२० एप्रिल, इ.स. २०११). "अभिनेता होण्याची लहानपणापासूनची इच्छा....." (मराठी मजकूर). सकाळ. २५ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. 
  2. a b c d शिर्के,उल्हास. "प्रेक्षकांची दाद हाच सर्वात मोठा सन्मान." (मराठी मजकूर). मराठीमूव्हीवर्ल्ड. २५ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. 
  3. ^ http://marathistars.com/movies/vrundavan-2016-marathi-movie/
  4. ^ http://marathistars.com/movies/what-about-savarkar-marathi-movie/
  5. ^ http://marathistars.com/movies/mokala-shwaas-marathi-movie-cast-story-photos/
  6. ^ https://in.bookmyshow.com/movies/ashach-eka-betavar/ET00013071
  7. ^ http://www.gomolo.com/high-command-movie/44158
  8. ^ http://marathimovieworld.com/review/mission-possible-review.php
  9. ^ https://en.wikipedia.org/wiki/Sharad_Ponkshe


बाह्य दुवे[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.