शमिता शेट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शमिता शेट्टी (इ.स. २००९)

शमिता शेट्टी (तुळू: ಶಮಿತಾ ಶೆಟ್ಟಿ ; रोमन लिपी: Shamita Shetty) (फेब्रुवारी २, इ.स. १९७९; मंगळूर, कर्नाटक - हयात) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिने हिंदी, तमिळ, तेलुगू चित्रपटांतून अभिनय केला आहे. ही शिल्पा शेट्टी या अभिनेत्रीची बहीण आहे.

कारकीर्द[संपादन]

शमिता शेट्टी हिने इ.स. २००० साली प्रदर्शित झालेल्या मोहब्बतें या हिंदी चित्रपटातून कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर मेरे यार की शादी है, साथिया यासारख्या हिंदी चित्रपटांतून आयटम गाण्यांवर नाचण्यापुरत्या छोटेखानी भूमिका तिने साकारल्या. दरम्यान राज्यम (इ.स. २००२) या तमिळ, तर पिलिस्ते पालुकुथा (इ.स. २००३) या तेलुगू चित्रपटांद्वारे तिने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढील काळात मात्र तिच्या नावावर फारसे यशस्वी चित्रपट जमा झाले नाही. तिची प्रमुख भूमिका असलेल्या जहर (इ.स. २००५) चित्रपटासारख्या यशस्वी चित्रपटांची संख्या सीमितच राहिली.

१४ जून, इ.स. २००१ रोजी तिने अंतर्गत सजावट क्षेत्रातील कारकिर्दीस सुरुवात करण्यासाठी अभिनय सोडणार असल्याचे जाहीर केले [ संदर्भ हवा ].

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.