Jump to content

शंखिनी (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शंखिनी
घोंघल्या फोडी

शंखिनी, घोंघल्या फोडी किंवा कालव फोड्या (इंग्लिश: Oystercatcher or sea-pie; हिंदी:दरिया गजपाँव; गुजराती:दरियाई अबलख; तेलुगू:येर्र कालि उलंक) हा एक पाणपक्षी आहे

हा पक्षी आकाराने तित्तिरापेक्षा मोठा असतो. ठळक काळा-पांढरा रंग असलेला समुद्रकाठचा हा पक्षी असतो.मजबूत तांबडे पाय असतात.लांब,सरळ,चपटी,नारिंगी, लाल चोच.पाणलाव्याच्या चोचीसारखी टोकाला बोथट असतात.उडताना काळ्या पाठीवरचा खालचा भाग पांढरा शुभ्र.त्याविरुद्ध रंगाचे डोके,छाती व शेपटी काळी असते.नर-मादी दिसायला सारखे असतात.जोडीने किंवा समूहाने आढळतात.

वितरण

[संपादन]

भारत,पाकिस्तान आणि श्रींलंकेत हिवाळी पाहुणे असतात.क्वचितच स्थलांतर-मार्गावरील आतील भागात आढळतात.उन्हाळ्यात पाकिस्तानच्या समुद्रकिनाऱ्यावर विणीस योग्य नसलेले पक्षी आढळतात.होलार्क्टिक भागात वीण.

निवासस्थाने

[संपादन]

समुद्रकिनाऱ्यावरील पुळण आणि कातळ असलेला भाग तसेच खाडीवर दिसतात.

संदर्भ

[संपादन]
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली