Jump to content

व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल
उपवर्गvoting machine संपादन

व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल तथा व्हीव्हीपॅट हे मतदारांना त्यांनी केलेल्या मतदानाचे विवरण दिसण्यासाठीची सोय असते. भारतीय सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ही सोय मतदान पेटीच्या शेजारी ठेवण्यात आलेल्या यंत्राद्वारे दिली जाते. मतदान केल्यानंतर मत कोणाला केले आहे हे दाखविणारी चिठ्ठी यंत्राच्या खिडकीत येते आणि सात सेकंदात परत जाते.