Jump to content

व्ही. नानम्मल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
V. Nanammal (es); ভি নানাম্মাল (bn); V. Nanammal (fr); V. Nanammal (ast); V. Nanammal (ca); व्ही. नानम्मल (mr); V. Nanammal (de); V. Nanammal (ga); نانامال (fa); V. Nanammal (sl); വി. നാണമ്മാൾ (ml); V. Nanammal (nl); వి.నానమ్మల్ (te); ਵੀ. ਨਾਨਾਮਲ (pa); V. Nanammal (en); ভি ননমল (as); Β. Ναναμμάλ (el); நானம்மாள் (ta) professeure de yoga indienne (fr); profesora india (ast); భారతదేశపు అత్యంత పురాతన యోగా గురువు (1920-2019) (te); India's oldest Yoga teacher (1920-2019) (en); Yogameisterin (de); ਭਾਰਤੀ ਯੋਗਾ ਅਧਿਆਪਕਾ (pa); India's oldest Yoga teacher (1920-2019) (en); Indiaas onderwijzeres (1920-2019) (nl); ο γηραιότερος δάσκαλος γιόγκα της Ινδίας (el); India karimma ŋun nyɛ paɣa (dag)
व्ही. नानम्मल 
India's oldest Yoga teacher (1920-2019)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखफेब्रुवारी २४, इ.स. १९२०
कोइंबतूर जिल्हा
मृत्यू तारीखऑक्टोबर २६, इ.स. २०१९
कोइंबतूर
मृत्युचे कारण
  • falling from height
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

व्ही. नानम्मल (२४ फेब्रुवारी, १९२० - २६ ऑक्टोबर, २०१९) ह्या भारतातील सर्वात वयस्कर योग शिक्षीका होत्या. त्यांनी ४५ वर्षांत जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले आणि दररोज शंभर विद्यार्थ्यांना शिकवले. त्यांचे सहाशे विद्यार्थी जगभरात योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.[]

त्यांच्या कार्याला २०१६ मध्ये भारताचा राष्ट्रीय नारी शक्ती पुरस्कार[] आणि २०१८ मध्ये देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.[][]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

नानम्मल यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२० रोजी कलियापुरम, कोइंबतूर, येथील 'जमीन' या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला.[] वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांकडून योग प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ज्यात त्यांनी ४० हून अधिक योगासने आत्मसात केली.[]

नानम्मलचे वडील आणि आजोबा दोघेही 'नोंदणीकृत भारतीय वैद्यकीय व्यावसायिक (RIMP)' होते. योग ही या घरची कौटुंबिक परंपरा होती. कुटुंबाबाहेरील इतर कोणालाही हा योग शिकवला जात नव्हता. त्या काळात, कुटुंबाचा प्राथमिक व्यवसाय पारंपारिक सिद्ध औषधी आणि शेती हा होता. केरळ राज्यात त्यांचे नारळ आणि काजूचे शेत होते.[]

नानाम्मल यांचे पती देखील सिद्ध औषधी साधक होते आणि ते शेती देखील करत होते. आपल्या पती सोबत त्या नेगमम आणि नंतर गणपती या गावी राहायला गेल्या.[][] लग्नानंतर त्यांना निसर्गोपचाराची आवड निर्माण झाली.[] त्यांना एकून पाच मुले, १२ नातवंडे आणि ११ पणतवंडे आहेत.[]

२०१६ साली राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते नानम्मल यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला

नानम्मल यांनी ८व्या वर्षी योगाभ्यास सुरू केला. नानाम्मलच्या मते, त्यांच्या वडिलांना मार्शल आर्ट्स माहित होते आणि त्यांनी तिला योगा शिकवला होता. नानम्मलने पुढे आयुष्यभर योगाभ्यास सुरू ठेवला.[]

१९७२ मध्ये त्यांनी कोइंबतूरमध्ये "ओझोन योग केंद्र" स्थापन केले. नानम्मल आणि त्यांचे कुटुंब, पिढीदरपिढी हस्तांतरित केल्या जाणाऱ्या परंपरांचे पालन करतात. या केंद्राने त्यांची पारंपारिक योग शैली सर्व सामान्य लोकांना शिकवली.[][]'ओझोन योगा स्कूल' स्थापन केल्यापासून, नानाम्मल आणि त्यांच्या कुटुंबाने १,००,००० हून अधिक लोकांना योग शिकवला आहे.[]

गेल्या पाच दशकांत, नानाम्मल यांनी दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आणि आयुष्यभर 'ओझोन योग केंद्र' येथे दररोज १०० विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले. त्यांच्या कुटुंबातील ३६ सदस्यांसह सुमारे ६०० विद्यार्थी जगभरातील विद्यार्थ्यांना योग शिकवणारे 'योग प्रशिक्षक' बनले आहेत.[][] त्यांचा मुलगा बालकृष्णन यांच्या मते, त्यांनी त्यांच्या आयुष्यात ६० हून अधिक कुटुंबातील सदस्यांना योग शिक्षक म्हणून प्रशिक्षण दिले आहे.[]

पुढील आयुष्य आणि मृत्यू

[संपादन]

नानाम्मल यांनी कोइम्बतूरमधील २०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना आणि उत्साही लोकांना योग शिकवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा प्रयत्न केला. महिलांमध्ये, विशेषतः मुलींमध्ये, योग तंत्रांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा त्यांचा प्रमुख उद्देश होता. त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन सर्व सामान्य लोकांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या सोडवल्या. त्या 'इंडियाज गॉट टॅलेंट' या भारतीय वास्तव प्रदर्शनीमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेणार होत्या.[] नानम्मल यांना यूट्यूब वर देखील चांगली लोकप्रियता मिळाली होती. यात कठीण योगासनांचे व्हिडिओ समाविष्ट आहेत.[१०]

२०१९ च्या शरद ऋतूमध्ये नानम्मल आपल्या पलंगावरून खाली पडल्या आणि तेव्हापासून त्या अंथरुणावर खिळून होत्या.[][१०] शेवटी २६ ऑक्टोबर २०१९ रोजी कोइम्बतूर येथे त्यांचे निधन झाले.[११]

सन्मान

[संपादन]

नानम्मल यांना प्रेमाने लोक "योगा आजी" म्हणून ओळखत असत.[११]योगातील त्यांच्या कामगिरीबद्दल, त्यांना पुढील पुरस्कार आणि प्रशस्तिपत्रे देण्यात आली:

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b K Jeshi (19 June 2017). "Bend it like Nanammal". Online Edition of The Hindu, dated 19 June 2017. 2017, thehindu.com. 19 June 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  2. ^ a b Government of India. "Nari Shakti Puraskar 2016". Online Edition of Ministry of Women & Child Development. 2016, Government of India. 24 March 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  3. ^ Madhurima Sarkar (21 March 2018). "V Nanammal Receives Padma Shri; The 99-Year-Old Yoga Practitioner Continues to Follow A Lifestyle Close to Nature". latestly.com. 2018, latestly.com. 24 March 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "Padma Awards 2018, Know the recipients". The Times of India. 20 March 2018. 2 May 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2018 रोजी पाहिले.
  5. ^ a b c d e f "Nanammal, the yoga grandma, wins Padma Shri". The Times of India. 26 January 2018. 25 March 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2018 रोजी पाहिले.
  6. ^ a b c Sushma UN (21 June 2017). "India's oldest yogini says you're doing yoga wrong if you're working up a sweat". qz.com. 2017, Quartz India. 25 March 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  7. ^ a b c d Merin James (20 August 2016). "V Nanammal: The nonagenarian yogini". Deccan Chronicle. 2016, deccanchronicle.com. 24 March 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  8. ^ a b "99-year-old 'Yoga Grandma' V Nanammal passes away in Coimbatore". The New Indian Express. 29 October 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 October 2019 रोजी पाहिले.
  9. ^ Staff. "Nanammal: The 97-year-old woman from Tamil Nadu who teaches yoga to 100 students". dailyhunt.com. 2018, dailyhunt.com. 25 March 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  10. ^ a b Nath, Akshaya (26 October 2019). "Yoga grandma V Nanammal passes away at 99 in Coimbatore". India Today (इंग्रजी भाषेत). 29 October 2019 रोजी पाहिले.
  11. ^ a b "India's 'yoga grandma' breathes her last at 99". BBC. 26 October 2019. 26 October 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 October 2019 रोजी पाहिले.
  12. ^ "Padma Awards 2018" (PDF). 21 March 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF).
  13. ^ GovOfIndia. "Story of Smt. V Nanammal, India's oldest Yoga teacher - Padma Awardee 2018". Online Edition MyGov India. 2018, MyGov India.
  14. ^ Govt. of India. "Padma Awards 2018: V. Nanammal". padmaawards.gov.in. 2018, padmaawards. 24 March 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  15. ^ "At 98, Amma Nanammal, India's Oldest Yoga Guru, is Giving Us Some Serious Fitness Goals". News18. 29 October 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 October 2019 रोजी पाहिले.
  16. ^ Special Correspondent V.S. Palaniappan (22 March 2018). "In Coimbatore Today". thehindu.com. 2018, thehindu.com. 28 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.