व्हाय धिस कोलावेरी डी
व्हाय धिस कोलावेरी डी (तमिळ: வொய் திஸ் கொலவெறி டி ; रोमन लिपी: Why This Kolaveri Di ;) हे इ.स. २०१२ साली प्रदर्शित होणाऱ्या ३ नावाच्या तमिळ चित्रपटातील गाणे आहे. तमिळ अभिनेता धनुष याने लिहिलेल्या व गायलेल्या या गाण्याला अनिरुद्ध रविचंदर याने संगीत दिले आहे. १६ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी अधिकृतरित्या प्रदर्शित झालेले हे गाणे त्यातील टँग्लिश, अर्थात तमिळ-इंग्लिश संमिश्र, शब्दरचनेमुळे आणि धिम्या ठेक्यातल्या लयदार चालीमुळे अत्यल्प कालावधीत लोकप्रिय झाले. या गाण्याच्या लोकप्रियतेची लाट पसरवण्यात सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचा मोठा वाटा होता.
निर्मिती
[संपादन]अनिरुद्ध रविचंदर याच्या म्हणण्यानुसार चित्रपटाची निर्माती ऐश्वर्या रजनीकांत धनुष (तमिळ अभिनेता रजनीकांत याची कन्या आणि अभिनेता धनुष याची पत्नी) हिला निष्फळ ठरलेल्या प्रेमाविषयी एखादे हलक्या-फुलक्या ढंगातील गाणे हवे होते. रविचंदराने केवळ ५ मिनिटांत एक चाल बनवून दिली [१]. त्यानंतर धनुष याने चालीवर गीतरचना लिहायला घेतली आणि तीदेखील केवळ वीसेक मिनिटांच्या लिहिण्या-गुणगुणण्यातून तयार झाली [२].
संदर्भ व सूची
[संपादन]- ^ वॉरियर,शोभा. "हिअर इज हाऊ द कोलावेरी डी साँग हॅपन्ड (मराठी: कोलावेरी डी गाणे कसे बनले याची कहाणी)" (इंग्लिश भाषेत). २४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ कामत,सुधीश. "व्हाय धिस 'व्हाय धिस कोलावेरी' (मराठी: 'व्हाय कोलावेरी डी' का ?)" (इंग्लिश भाषेत). २४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
[संपादन]- "व्हाय धिस कोलावेरी डी गाण्याचे चलचित्र" (तमिळ व इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |