Jump to content

व्याहृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्याहृती (संस्कृतात व्याहृति) - विविध लोकांशी संबंधित अशी ही नावे आहेत.

व्याहृती क्रमाने पुढीलप्रमाणे आहेत.

वेदांमधील नाव उपनिषदातील नाव अधिक माहिती
१ पृथिवी भूर् मानवाधारित भौतिक चेतना
२ अंतरिक्ष भुवर्
३ द्यौ (स्वर्ग) स्वर् अतिभौतिकावर आधारित दिव्य चेतना
४ स्वर्लोक किंवा सत्यलोक महर् स्वर्लोकाचे दोन स्तर आहेत. १) स्वर्लोक २) त्याचे शिखर म्हणजे मयस् (वेद-रहस्य: पान १६०)

ऋग्वेदामध्ये हे चारही लोक म्हणजे अस्तित्वाची चार गुप्त व पवित्र अधिष्ठाने आहेत.

तैत्तरिय उपनिषदात महाचमस्य ऋषींनी चवथ्या व्याहृतीचा - महर् चा शोध लावला, असा संदर्भ येतो. (वेद-रहस्य: पान १६०) [१]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ वेद-रहस्य - मूळ लेखक योगी श्रीअरविंद, अनुवाद - स्वर्णलता भिशीकर, २०२३, श्रीअरविंद आश्रम