व्यामिश्र जाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जालसिद्धांतामध्ये व्यामिश्र जाल हे खुप व्यामिश्र रचना असणारे जाल आहे. अशा प्रकारची जाले अनेक भौतिकी संहंतिंमध्ये आढळून येतात. व्यामिश्र जालांचा अभ्यास हे नुकतेच विकसित होत असणारे क्षेत्र असुनदेखिल अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमधील तज्ञ आणि संशोधन करणारे विद्यार्थि यांच्या सतत सुरु असणाऱ्या योगदानामुळे मोठ्या गतीने वाढते आहे. या क्षेत्राचा उगम हा वेगवेगळ्या भौतिक संहतिंमधील जालांच्या प्रायोगिक अभ्यासातुन पुढे आलेल्या सांख्यिक माहितीच्या आधारे आणि प्रेरणेने झाला. या अभ्यासात समाजशास्त्र, जीवशास्त्र, संगणक विज्ञान इत्यादी वेगवेगळ्या शास्त्रांमधिल जालांचा समावेश होता.

व्याख्या[संपादन]

बऱ्याचशा सामाजिक, जीवशास्त्रिय आणि तंत्रज्ञानातिल जालांची रचना ही अनिश्चित जाल आणि संपूर्णपणे सुनिश्चित जाल यांच्या जोडणीतिल रचनांपेक्षा अतिशय वेगळी असल्याचे दिसून आले आहे. व्यामिश्र जालांच्या रचनेतिल महत्वाची लक्षणे म्हणजे त्यांच्या दुवा वितरणामध्ये असणारी जाड शेपूट आणि त्यांचा मोठा पुंजगुणक.