पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्यसनमुक्ती साहित्य संमेलन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्र सरकारतर्फे भरणारे पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन २ व ३ ऑक्टोबर २०१२ रोजी पुण्यात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल अवचट होते. संमेलनाचे उद्‍घाटन महाराष्ट्राच्या तत्कालीन राज्यपालांनी केले. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ’महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ देण्यात आले. संस्थेसाठी पुरस्काराची रक्कम ३० हजार रुपये तर वैयक्तिक पुरस्काराची रु.१५ हजार इतकी होती.

संमेलनाला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. कल्याण गंगवाल, संमोहनतज्‍ज्ञ नवनाथ गायकवाड वगैरे उपस्थित होते.

पुरस्कार मिळालेल्या ३० व्यक्ती आणि १९ संस्था[संपादन]

व्यक्ती

डॉ. बाळासाहेब कुमार (जळगाव), बाळासाहेब केदार, पंढरीनाथ खर्डेकर (लोही, जि. यवतमाळ), मारोतराव खैरकर (नेहरोली, जि. ठाणे), डॉ. व्ही. व्ही. घाणेकर (पुणे), विलास चंदणे (औरंगाबाद), विलास ऊर्फ रमेश जवळ (जवळवाडी, जि. सातारा), सुरेश जाधव (अंबड, जि. नाशिक), लोकनाटककार विनोद ढगे (जळगाव), रामकृष्ण दिग्रजकर (जव्हार, जि. ठाणे), ज्ञानोबा देवकाते (सहायक पोलीस निरीक्षक बिटरगाव, जि. यवतमाळ), सदाशिवराव देवरे (म्हसदी, जि. धुळे), रघुनाथ देशमुख (जव्हार, जि. ठाणे), दीपक निकम (पुणे), डॉ. लियाकत रहेमानखान पठाण (परभणी), तुकाराम पवार (कुरुंदवाड, जि. कोल्हापूर)केसरीनाथ पाटील (मुंबई), जगन्नाथ पाटील (अक्कलकोप, जि. सांगली), मोहन मसकर पाटील (शाहूनगर, गोंडाली, जि. सातारा), साहित्यिक जेलसिंग पावरा (शहादा, जि. नंदुरबार), संजय बुटले (चंद्रपूर), राही भिडे (मुख्य संपादक, दै. पुण्यनगरी पुणे), शाहीर देवानंद माळी (मिरज, जि. सांगली), अलका मुंजाळ (राक्षेवाडी, जि.पुणे), शांताबाई मुळुक (चाकसमान, जि. पुणे), प्रा. डॉ. राजकुमार म्हस्के (जालना), लेखक भाऊसाहेब येवले (त्रिमूर्तीनगर, जि. अहमदनगर), संतोष वळसे (मंचर, जि. पुणे), विकास वैद्य (नागपूर), डॉ. संजय शिंदे (पोलीस उपायुक्त, पुणे), संतोष शेळके (शिरपूर, जि. बुलढाणा).

संस्था पुरस्कार विजेते

अल्कोहोलिक ॲनॉनिमस(मुंबई), आकाशवाणी(मुंबई), इंडियन एक्सप्रेस(मुंबई), ए.बी.पी. माझा(मुंबई), कॉकलिया संस्था(पुणे), दैनिक नवभारत(नागपूर), नशाबंदी मंडळ(मुंबई), नांदेड विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, पुण्यनगरी, सावित्रीबाई फुले संस्था(दाभडी,जि.यवतमाळ), सहकारी शिक्षण विकास समूहाचे मराठा हायस्कूल(मुंबई), मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र(पुणे), मैत्री व्यसनमुक्ती केंद्र, (नागपूर), वर्ल्ड स्पिरिच्युअल ट्रस्ट(मुंबई), विनटेल प्रायव्हेट लिमिटेड(जितेंद्र पंडित-पुणे), श्रमिक एल्गार(श्रीमती परिणीता गोस्वामी-चंद्रपूर), सन सिक्युरिटीज(कर्नल मागो) पुणे.

यापुढची व्यसनमुक्ती साहित्य संमेलने[संपादन]