व्यवसाय नोंदणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही सरकारी नोंदण्या आवश्यक असतात. मात्र या शिवायही अजून काही महत्त्वाचा नोंदण्या असू शकतात. नवीन व्यवसाय कसा सुरू करताना हे आवश्यक असते.

प्रमुख नोंदण्या[संपादन]

१. पॅन नंबर - कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पर्मनंट अकाऊंट नंबर असणे आवश्यक आहे. हा नंबर युनिट ऑनलाईन अप्लाय करता येतो. मात्र कागदपत्रे छाननीसाठी प्रत्यक्ष जावेच लागते. यासाठी बहुदा युनिट ट्रस्टच्या शाखेत जाता येते. कंपनी रजिस्टर करणार असाल तर ४९ए हा फॉर्म आवश्यक आहे. शिवाय कंपनी नोंदणी प्रमाणपत्राची रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ने दिलेली एक (किंवा अधिकही!) अटेस्टेड कॉपी, कंपनीचे ऍड्रेस प्रूफ आणि तुमचा आयडी लागेल. याची फी रुपये ९४ आहे. (फॉर्म आंतरजालावरून उतरवून घेतला असल्यास फुकट, नाहीतर रुपये ५ अधिक)

२. प्रा. लि. कंपनीच्या सुरुवातीसाठी टॅक्स अकाऊंट नंबर (टॅन) आवश्यक राहील. यासाठी ४९ बी हा फॉर्म भरून जेथे टीडीएस भरता येतो अशा ठिकाणी देणे आवश्यक आहे. योग्य ती छाननी झाल्या नंतर हा क्रमांक दिला जातो. यासाठी बहुदा रुपये ६० फी लागते.

३. कोणत्याही व्यवसायासाठी शॉप ऍक्ट रजिस्ट्रेशन आवश्यक असते. याची फी मात्र तुमच्या कंपनीत किती लोक कामावर आहेत यावर ठरते. १ माणसासाठी रुपये १००, १ ते ५ माणसे नोकरीवर असल्यास रु. ३०० लागतात.

४. प्रा. लि. कंपनी साठी व्हॅल्यु ऍडेड टॅक्स व्हॅट रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. ही नोंदणी सेल्स टॅक्स साठी असते. यासाठी - कंपनीच्या घटनेची प्रत - नोंदणी प्रमाणपत्राची रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ने दिलेली एक (किंवा अधिकही!) अटेस्टेड कॉपी - कंपनीचे ऍड्रेस प्रूफ - तुमचे पासपोर्ट आणि लायसन असे किमान दोन आयडी - विहित नमुन्यातील फोटो - पॅन कार्डाची प्रत ही कागदपत्रे लागतील. या नोंदणीसाठी रु. ५०० फी आहे.

५. प्रा. लि. कंपनी साठी व्यवसाय कर प्रोफेशन टॅक्सचे रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. यासाठी - कंपनीच्या घटनेची प्रत - नोंदणी प्रमाणपत्राची रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ने दिलेली एक (किंवा अधिकही!) अटेस्टेड कॉपी - कंपनीचे ऍड्रेस प्रूफ - पॅन कार्डाची प्रत यासाठी कोणतीही फी नाही.

६. तुमच्या प्रा. लि. कंपनी मध्ये २० पेक्षा जास्त लोक काम करत असतील त्यांच्यासाठी भविष्य निर्वाह निधीची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी कोणतीही फी नाही.

७. तुमच्या प्रा. लि. कंपनी मध्ये २० पेक्षा जास्त लोक काम करत असतील त्यांच्यासाठी तर मेडिकल इंशुरंन्स रजिस्टरमध्ये नोंदणी आवश्यक आहे. यासाठी कोणतीही फी नाही.

बाह्य दुवे[संपादन]