वोल्फ्सबुर्ग
वोल्फ्सबुर्ग Wolfsburg |
|||
जर्मनीमधील शहर | |||
| |||
देश | जर्मनी | ||
राज्य | नीडर जाक्सन | ||
स्थापना वर्ष | १ जुलै १९३८ | ||
क्षेत्रफळ | २०४ चौ. किमी (७९ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | २४६ फूट (७५ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १,२२,४५७ | ||
- घनता | ६०० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.Wolfsburg.de |
वोल्फ्सबुर्ग (जर्मन: Wolfsburg) हे जर्मनी देशाच्या नीडर जाक्सन या राज्यातील एक प्रमुख शहर आहे. वोल्फ्सबुर्ग ॲलर नदीच्या काठावर ब्राउनश्वाइगच्या ३० किमी ईशान्येस, हानोफरच्या ७५ किमी पूर्वेस तर बर्लिनच्या २३० किमी पश्चिमेस स्थित आहे. जर्मन मोटार वाहन उद्योगाचा कणा मानले जाणारे वोल्फ्सबुर्ग जर्मनीतील सर्वात श्रीमंत शहर आहे. फोल्क्सवागन ह्या जगातील प्रमुख मोटार वाहन कंपनीचे मुख्यालय व कारखाना येथेच आहे.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात वसवले गेलेले वोल्फ्सबुर्ग हे जर्मनीमधील मोजक्या शहरांपैकी एक आहे. फोल्क्सवागन बीटल ही जगप्रसिद्ध कार ॲडॉल्फ हिटलरच्या मार्गदर्शनाखाली येथेच १९३८ साली प्रथम बनवली गेली. फोल्क्सवागनसोबत ऑडी, बेंटले, बुगाट्टी, लॅम्बॉर्गिनी, पोर्शे, स्कोडा ऑटो इत्यादी फोल्क्सवागन समूहामधील इतर कंपन्यांचे कारखाने देखील वोल्फ्सबुर्गमध्ये आहेत.
खेळ
[संपादन]फुटबॉल हा वोल्फ्सबुर्गमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. १९४५ साली स्थापन झालेला व बुंदेसलीगामध्ये खेळणारा फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग हा संघ येथेच स्थित आहे.
संदर्भ
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |