वोलारीस एअरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वोलारीस एअरलाइन्स हि कमी प्रवास दर असलेली मेक्सिकन विमानकंपनी आहे जिचे मुख्यालय सांता फे, अल्वारो ओब्रेगोन, मेक्सिको सिटी येथे आहे. तसेच तिचे गुदालावारा, मेक्सिको सिटी आणि तिउआना येथे हब आहेत. ती एरोमेक्सिको नंतरची देशातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी विमान कंपनी आहे आणि ती अमेरिकेत देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सेवा देते. वोलारीसचा आता मेक्सिकन देशांतर्गत सेवेमध्ये २३% हिस्सा असून ती एक महत्वाची प्रतिस्पर्धी कंपनी आहे .[१]

इतिहास[संपादन]

सेवा सुरु करण्यापूर्वीच्या कायदेशीर बाबी पूर्तता तसेच पायाभूत सुविधा उभ्या करण्याचा कामांना वूएला एअरलाईन्स या नावाखाली ऑगस्ट २००५ मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीचे महत्वाचे शेअरधारक गृपो टेलेविसा, इनबर्सा, एवीयांका आणि डिस्कवरी अमेरिका फंड हे होते.यांपैकी प्रत्येकाने २५% म्हणजेच १०० मिलिअन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली होती.[२] पुढे टेलेविसा आणि इनबर्सा ने त्यांचा हिस्सा विकला.

तिकीट विक्रीची सुरुवात १२ जानेवारी, २००६ रोजी सुरु झाली आणि पहिले उड्डाण फेब्रुवारी २००६ मध्ये घेतले गेले.[३] सुरुवातीला कंपनीने मेक्सिको सिटी साठी तेथे गर्दी आणि महाग असल्याने उड्डाण भरणे टाळले. सप्टेंबर २०१० मध्ये कंपनीने मेक्सिकाना आणि तिच्या उपकंपनी मेक्सिकाना क्लिक आणि मेक्सिकाना लिंकचे स्लॉट घेऊन मेक्सिको सिटी येथे सेवा सुरु केली. मार्च २०११ मध्ये कंपनीने टोलुका येथील आपला तळ गुदालाआरा येथे हलवणार असल्याची घोषणा केली. ५ जून २०१२ मध्ये कंपनीने नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी व्ही क्लब नावाची योजना सुरु केली. तिच्यांतर्गत विशेष सूट, तत्काळ प्रवास योजना आणि इतर काही लाभ देण्यात आले. त्यातून प्रवासी ४०% बचत करू शकत होते. ६ जून २०१२ मध्ये पे-पल हि कंपनी ऑनलाइन पेमेंटची सुविधा देऊ लागली ज्याने प्रवासी कंपनीच्या वेबसाईटवरून तिकीट खरेदी करू शकत होते. १७ सप्टेंबर २०१२ मध्ये वोलारीसने जर्मन कंपनी कॉन्डोर सोबत कोड शेअर ची घोषणा केली .[४]

१३ मार्च २०१३ मध्ये कंपनीने तिचा ७वी वर्षपूर्ती प्रवाश्यांना प्रवासात ७०% सूट देऊन साजरी केली. तेव्हापासून कंपनी दरवर्षी असे करते. मार्च २०१६ मध्ये कंपनीने नवीन उपकंपनी वोलारीस कोस्टा रिका ची घोषणा केली [५]. कोस्टा रीकाची राजधानी सन होसे येथील संता मारीया आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असलेल्या या उपकंपनीची नोव्हेंबर २०१६ मध्ये सेवेला सुरुवात झाली.[६]

आंतरराष्ट्रीय सेवा[संपादन]

नोव्हेंबर २००८ मध्ये वोलारीस ने अमेरिकन स्वस्त प्रवासदर असलेली विमानकंपनी साउथवेस्ट एअरलाइन्स सोबत कोडशेअर ची घोषणा केली.

१३ डिसेंबर २०१० मध्ये वोलारीसची शिकागो आणि गुदालाआराच्या मध्ये सेवेला सुरुवात झाली. हे वोलारीसचे चौथे आंतरराष्ट्रीय गंतव्य स्थान होते. तसेच हा वोलारीसच्या इतिहासातील सर्वात लांब मार्ग होता. मेक्सिकाना दे एविएशन हि कंपनी बंद पडल्यानंतर वोलारीसने तिच्या अनेक आंतरराष्ट्रीय मार्गांचे अधिग्रहन केले.

२५ फेब्रुवारी २०११ मध्ये वोलारीस, मेक्सिकानाचे गंतव्य स्थान, फ्रेस्नो अधिग्रहित करणार असल्याची तसेच १४ एप्रिल २०११ पासून सेवा सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आली. फ्रेस्नो वोलारीसचे अमेरिकेतील पहिले असे गंतव्य स्थान होते जेथे त्यांनी साउथवेस्ट एअरलाईन्स सोबत भागीदारी केली नाही.

वोलारीस ने डलास/फोर्ट वर्थ आणि मेक्सिको सिटी दरम्यान तसेच इतर अमेरिका-मेक्सिको दरम्यान सेवा पुरविण्याची परवानगी मिळवली. ३ फेब्रुवारी २०११ ला वोलारीस ने परवानगी साठी विनंती सादर केली आणि ११ फेब्रुवारीला अमेरिकन वाहतूक विभागाने त्यांना मंजुरी दिली.[७] परंतु वोलारीस ने ४ वर्षानंतर २९ एप्रिल २०१५ ला डलास/फोर्ट वर्थ आणि गुदालाआरा दरम्यान सेवेला प्रारंभ केला.[८]

वोलारीस ने त्यांची नॉर्थईस्टर्न अमेरिकेतील पहिली विनाथांबा सेवा सुरु केली जेव्हा त्यांनी न्यूयॉर्क ते गुदालाआरा दरम्यान १५ जुलै २०१५ ला सेवा देण्यास सुरुवात केली.[९] आणि त्यांनी १ मार्च २०१७ ला त्यांची दुसरी विनाथांबा सेवा मेक्सिको सिटी आणि न्यूयॉर्क दरम्यान सुरु केली.

मार्च २०१७ ला वोलारीस ने गुदालाआरा ते मील्वाउकी अशी विनाथांबा सेवा सुरु केली.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Aeromexico trades domestic & international market share gains for lower yields as 2Q profits drop".
  2. ^ "Indigo Partners buys stake in Mexico's Volaris".
  3. ^ "Volaris flight schedule".
  4. ^ "Condor and the Mexican airline Volaris enter into partnership" (PDF).
  5. ^ "Volaris sets up Costa Rican unit; eyes 2H launch".
  6. ^ "Volaris Costa Rica commences operations".
  7. ^ "Volaris get U.S. approval for DFW-Mexico City flights".
  8. ^ "Volaris wants to fly DFW-Guadalajara route, too".
  9. ^ "Volaris, Now Arriving in New York".