वॉटर पाईप रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वॉटर पाईप
मध्य रेल्वे स्थानक
माथेरान डोंगरी रेल्वे स्थानक
Water Pipe Railway Station.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता रायगड जिल्हा
मार्गिका नेरळ−माथेरान रेल्वे
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत WTP
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे

वॉटर पाईप रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील माथेरान डोंगरी रेल्वे या अरुंदमापी लोहमार्गावरील एक स्थानक आहे.

नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या येथे थांबा घेतात.

हे स्थानक एक 'तांत्रिक थांबा' असून येथे तिकीट खिडकी नाही. या स्थानकापासूनचे किंवा या स्थानकापर्यंतचे तिकीट उपलब्ध होत नाही. पूर्वीच्या काळी जेव्हा नेरळ-माथेरान-नेरळ दरम्यान धावणा-या गाड्या वाफेच्या इंजिनावर धावायच्या तेव्हा या स्थानकात इंजिनात पाणी भरले जायचे. आजही येथे ती पाण्याची टाकी व नळ दिसतो.