Jump to content

वैशाली रमेशबाबू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वैशाली रमेशबाबू
२०२५ मध्ये वैशाली
देश भारत भारत
जन्म२१ जून, २००१ (2001-06-21) (वय: २५)
चेन्नई, तामिळनाडू, भारत
पद ग्रॅंडमास्टर
फिडे गुणांकन २४७३ (नोव्हेंबर २०२५)
सर्वोच्च गुणांकन २५०६ (ऑगस्ट २०२४)

वैशाली रमेशबाबू (तमिळ : வைஷாலி ரமேஷ்பாபு; जन्म: २१ जून २००१) ही एक भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. ती २०२३ आणि २०२५ मध्ये फिडे महिला ग्रँड स्विस स्पर्धेची दोन वेळा विजेती ठरली, आणि अनुक्रमे २०२४ आणि २०२६ मध्ये महिला कँडिडेट्स स्पर्धेच्या दोन आवृत्त्यांसाठी पात्रता मिळवली.[][] ती आणि तिचा भाऊ प्रज्ञानंदा हे ग्रँडमास्टर पदके मिळवणारी पहिली बहीण आणि भाऊ आहेत जेथे प्रज्ञानंदाने २०१८ मध्ये ही पदवी मिळवली आहे.[] ती तमिळनाडूतील पहिली महिला ग्रँडमास्टर देखील आहे.[]

जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये चेन्नईतील महाबलिपुरम येथे झालेल्या ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये वैशाली महिला विभागात पट-३ वर खेळली. भारताच्या महिला संघाने सांघिक कांस्यपदक जिंकले आणि वैशालीने तिसऱ्या पटासाठी वैयक्तिक कांस्यपदक जिंकले.[] ती सप्टेंबर २०२४ मध्ये हंगेरी येथील बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाचा भाग होती.[] तिने २०२४ च्या महिला जागतिक ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक देखील जिंकले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Vaishali Wins Women's Grand Swiss, Vidit Also Gets Close To Title Triumph". न्युज-१८ (इंग्रजी भाषेत). २०२३-०५-११.
  2. "वैशाली रमेशबाबू ठरली FIDE महिला ग्रँड स्विस विजेती; जाणून घ्या भारताच्या ग्रँडमास्टरचा संपूर्ण प्रवास". बीबीसी. २०२५-०९-१६.
  3. "ग्रँडमास्टर प्रज्ञानंद आणि बहीण वैशालीनं रचला अनोखा विक्रम, विक्रमवीर जगातील पहिले भावंड". इ.टी.व्ही भारत. २०२३-१२-०२.
  4. "Stalin lauds Vaishali on becoming first woman GM from TN". 27 March 2025 रोजी पाहिले.
  5. "44th Chess Olympiad : खुल्या गटात भारत 'ब' संघाला कांस्य, तर महिला गटात 'अ' संघ तिसऱ्या स्थानी". etvbharat. २०२२-०८-०९.
  6. "बुद्धिबळ ऑलिंपियाड २०२४ राउंड ११ लाईव्ह अपडेट्स: अर्जुन आणि गुकेश यांच्या विजयामुळे भारताने ऐतिहासिक ओपन गोल्ड जिंकला; दिव्याने भारताला अझरबैजान विरुद्ध महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली". २०२४-०९-२२.
  7. "FIDE World Blitz C'ship 2024 - ग्रँडमास्टर वैशालीची ब्लिट्झमध्ये कांस्यपदकाला गवसणी…". civicmirror.in. २०२५-०१-०१.