Jump to content

वैदिक देवदेवता आणि दैत्यासुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वैदिक देवदेवता - वेद वाङ्मयामध्ये काही देवदेवतांचे उल्लेख येतात. त्यांना उद्देशून सूक्तांची रचना केलेली आढळते.

वैदिक देव

[संपादन]

खालील देव हे वैदिक देव म्हणून ओळखले जातात. []

क्र. देवाचे नाव कशाचे प्रतीक इतर माहिती
वरुण चैतन्याच्या व्यापकतेचे प्रतीक, शुद्धीचे प्रतीक वरुणाला 'रिशादस्' असे म्हटले जाते कारण तो शत्रूंचा नाश करतो.[]
मित्र प्रेम व आनंद, सुसंवादाचे प्रतीक मित्रामध्ये महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या शक्तींचे एकत्रीकरण झालेले असते.[] मित्राला 'पूतदक्ष' असे म्हटले जाते कारण त्याच्याजवळ शुद्ध निर्णयशक्ती असते.
अर्यमा शक्ती आणि तपस्या यांचे प्रतीक
भग ऐश्वर्य उपभोगाचे प्रतीक भग या शब्दाचा अर्थ 'आनंद उपभोगणे' असा आहे तसाच त्याचा अर्थ 'भाग' म्हणजे

वाटा असाही आहे.

इंद्र स्फूर्तिमय चित्ताची देवता; इंद्र देव मन:शक्तीचे प्रतीक आहे. याचा निवास स्वरलोकात असतो. तो तिसऱ्या व्याहृतीचा निदर्शक आहे. ती संदेहरहित शुद्ध मनाची द्योतक आहे. [] श्रीअरविंद यांच्या मते, इंद्र ही मानवात जन्म घेणारी दिव्य मनाची शक्ती आहे. (वेदरहस्य: पा. १५२)
बृहस्पती प्रज्ञेचे प्रतीक बृहस्पती हे परमआकाशात जन्माला आले. त्यांना सात मुखे आहेत. बृहस्पती पुन्हा पुन्हा जन्म घेतात. त्यांनी स्तंभ आणि ऋक या आपल्या गणांच्या सहाय्याने वल या असुराचे तुकडेतुकडे केले. आणि त्यांनी गायींचे प्रकाशमान समूह उर्ध्व दिशेने गतिमान केले, असे वर्णन वेदांमध्ये येते. बृहस्पती हा मंत्रांचा उद्गाता असतो. (वेदरहस्य: पा. १२९) देव याचे अंगिरसाशी घनिष्ठ नाते आहे. (वेदरहस्य: पा. १४९) बृहस्पतीला ब्रह्मणस्पति म्हणजे पवित्र व प्रेरित शब्दांचा स्वामी असेही नाव आहे.
सूर्य
ऋभुगण हे अमृतत्वाला पोहोचलेले पहिले मानव होते. त्यांच्या कर्मात पूर्णता आणल्यामुळे ते दैवी अमर्त्य शक्तींचे वाहक बनले होते.
सोमदेव ऋग्वेदाच्या नवव्या मंडलात सोमदेवाची सूक्ते आहेत. मनुष्याच्या मानसिक भागाचे कार्य तीन स्तरावर चालते. त्या तीन स्तरांशी संबंधित देवता म्हणजे सूर्य, इंद्र आणि सोम.

सूर्य - विशुद्ध विचारात्मक मनाशी संबंधित इंद्र - सक्रिय गतिशील मनाशी संबंधित सोम - इंद्रियाश्रीत मनाशी संबंधित (वेदरहस्य: पा. १७५)

१० अग्नि सामर्थ्य व प्रकाश यांचे प्रतीक विविध विश्वांची निर्मिति करणारी आणि पूर्ण ज्ञानाने विश्वरचना करणारी ही शक्ति 'जातवेदस्' नांवाने ओळखली जाते. चैतन्यशक्तीचे सर्व आविष्कार, निर्मितिप्रक्रिया यांचे ज्ञान तिला असते. त्यामुळे 'विश्वानि वयुनानि विद्वान्' असे तिला म्हटले जाते. मर्त्य जीवांमधील अमर्त्य शक्ति, मनुष्यातील दिव्य चेतना आणि पूर्णतेकडे प्रवास करणारी ऊर्जा म्हणजे अग्नि, अशीही वर्णने नेहमी येतात. अग्नीला पृथ्वीवरील वनस्पतींचा पुत्र किंवा पृथ्वी किंवा आकाशाचा पुत्र असे म्हटले जाते. (वेदरहस्य: पा. १०६)
११ मरुत-देव हे देव गोमुक्तीच्या कार्यात अप्रत्यक्ष रीतीने सहभागी आहेत, असे दिसते. हे ऋचांचे गायक असतात. (वेदरहस्य: पा. १२९-१३०) हे वीज-वादळाचे स्वामी आहेत. ते ज्ञानसंपन्न असून, प्राणशक्तीनेही संपन्न आहेत, ते शत्रूवर विद्द्युल्लतेप्रमाणे कोसळतात. (वेदरहस्य: पा. १५२)
१२ विष्णू वैश्विक चेतनेचे प्रतीक
१३ वायू प्राण किंवा जीवनाचे प्रतीक []
१४ विश्वदेव विश्वातील ईश्वरीय शक्तींचे सामूहिक अस्तित्व. त्यांना अप्तुर: असे म्हटले आहे. अप्तुर म्हणजे जे चेतनेचे जल उल्लंघून जातात असे. (वेदरहस्य : पा. ७५-७६) नकारात्मक असुरी वृत्तींच्या आघातपासून ते मुक्त असतात. ते मनुष्याचे पोषण करतात, महान कार्यात त्याला साहाय्यकारी होतात. []
१५ अश्विनीकुमार विराट सिंधूच्या पोटी यांचा जन्म झाला आहे. हे दोन बंधू आहेत. आंतरिक संदेहातून प्रकाशमय स्फूर्तीची वाट दाखविण्यासाठी ते मदत करतात. ते शरीराच्या व मनाच्या शक्तींचे आणि त्यांच्या उर्ध्वगामी गतींचे स्वामी आहेत. (वेदरहस्य: पा. ११६)
१६ पूषादेव

वैदिक देवता

[संपादन]

वेदांमध्ये पुढील देवतांचे उल्लेख येतात.

क्र. देवतेचे नाव अधिक माहिती
उषा उषादेवतेला गोमती असेही म्हटले आहे. ती अश्वावती म्हणजे अश्वांनी संपन्न आहे. तिच्या रथाला केशरी रंगाचे घोडे गती देत असतात. उषादेवता ही किरणांची माता आहे, असे म्हटले आहे. (वेदरहस्य[]: पा. ११२) उषा ही गायींची माता आहे असे वर्णनही वारंवार येते. (वेदरहस्य: पा. ११८) उषेचा जन्म सत्यामधून झाला आहे, ती सत्यस्वरूप आहे, असे म्हटले आहे. (वेदरहस्य: पा. ११९) उषादेवतेला अंगिरस्तमा, आणि तिच्यामध्ये इंद्रशक्ती पूर्णत्वाने अवतरली असल्याने तिला इंद्रतमा असे म्हटले आहे. (वेदरहस्य: पा. १५३) ती स्वर्लोकाची कन्या आहे. तिच्याकडे प्रकाश आणि ज्ञानाच्या समृद्धीचे भांडार आहे.
मही मही आणि समीची या दोघी अग्नीच्या माता असल्याचे समजले जाते. (वेदरहस्य: पा. १०३)
समीची अग्नीच्या दोन मातांपैकी एक
अदिती अदिती म्हणजे अनंत चेतना. तिच्यातून देव जन्माला येतात. (वेदरहस्य: पा. ११०)

इला, सरस्वती आणि सरमा या वैदिक देवता म्हणजे अंतःस्फूर्त ज्ञानाची प्रतीके आहेत.[]

ऋतम किंवा सत्यचेतना चार प्रकारे आविष्कृत होते.

क्र. देवतेचे नाव अंतःस्फूर्तीचा प्रकार इतर माहिती
इला थेट अनुभूती ही चांद्रवंशाची मातृदेवता आहे. ही साक्षात्काराची किंवा सत्यदर्शनाची देवता आहे.
सरस्वती अंतःप्रेरणा सरस्वती ही विद्येची देवता म्हणून ओळखली जाते. ती अंतःस्फूर्तीची आणि दिव्य शब्दांची देवता आहे.
सरमा अंतर्दृष्टी हिला स्वर्गातील श्वान असेही म्हटले आहे.
दक्षिणा ज्ञानाचे प्रकटीकरण करणारी देवता. ही अत्यंत सूक्ष्म विवेक असणाऱ्या प्रातिभ ज्ञानाची देवता आहे. मानसिक स्तरावरील विवेक करण्यासाठी ती मदत करते. तसेच सत्याच्या विविध स्तरीय अनुभवांची श्रेणी जाणण्यासाठी ती मार्गदर्शन करते.

वैदिक असुर

[संपादन]
क्र. दैत्य किंवा असुराचे नाव अधिक माहिती
दिती ही असुरांची माता आहे. [] (वेदरहस्य: पा. ११८)
वृत्र / वृत्रासुर नकारात्मक शक्तींचे प्रतीक (वेदरहस्य: पा. १००) वृत्र हा प्रकाशाने नाहीसा केलेला अंधार आहे, असा त्याचा अर्थ आहे. वृत्र म्हणजे विरोधी, विघ्न निर्माण करणारा.
दस्यू नकारात्मक शक्ती म्हणजे दस्यू . हे दस्यू आर्यांकडून सर्व संपदा चोरून आपल्या ताब्यात ठेवतात.
पणि गायींचे हरण करणारे दस्यू म्हणजे पणि. हे आळशी आणि तामोग्रस्त आहेत. (वेदरहस्य: पा. १३२) पाहा: वेदांमधील कथा. पणि हे घातक शक्तींचे प्रतीक आहेत. ते अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात. (वेदरहस्य: पा. १५४)
वल / वलासुर वल हा पणींचा प्रमुख आहे. वल याचा अर्थ बंदिस्त करणारा असा होतो. (वेदरहस्य: पा. १२६)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c Aurobindo, Sri (1998). The Secret of the Veda. The Complete Works of Sri Aurobindo. 15. Sri Aurobindo Ashram Publication Department. 23 March 2025 रोजी पाहिले.
  2. ^ a b Aurobindo, Sri (2012). Letters on Yoga — I, Foundations of the Integral Yoga. The Complete Works of Sri Aurobindo. 28. Sri Aurobindo Ashram Publication Department. 23 March 2025 रोजी पाहिले.
  3. ^ Martin, E. Osborn (1914). The Gods of India: A Brief Study of Hindu Mythology (PDF). J.M. Dent & Sons. 23 March 2025 रोजी पाहिले.
  4. ^ Griffith, Ralph T.H. (1896). The Hymns of the Rigveda. E.J. Lazarus & Co. 23 March 2025 रोजी पाहिले.
  5. ^ a b वेद-रहस्य - मूळ लेखक योगी श्रीअरविंद, अनुवाद - स्वर्णलता भिशीकर, २०२३, श्रीअरविंद आश्रम