Jump to content

कार्तिक शुद्ध चतुर्दशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वैकुंठ चतुर्दशी या पानावरून पुनर्निर्देशित)

कार्तिक शुद्ध चतुर्दशी ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील चौदावी तिथी आहे.


१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

चातुर्मासी चतुर्दशी हा जैन धर्मातील सण आणि उत्सव आणि वैकुंठ चतुर्दशी हे हिंदू धर्मातील व्रत या दिवशी केले जाते. या दिवशी आवळीच्या झाडाखाली बसून जे जेवण करतात, त्यास आवळी भोजन म्हणतात.[][]

वैकुंठ चतुर्दशी

[संपादन]

त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते.[] चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात.वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते.[] या दिवशी चतुर्मासाची सांगता होते असे मानले जाते. या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन तुळशी वाहून आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल वाहून पूजा केली जाते हे या पूजेचे विशेष महत्त्व आहे. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहिली जाते परंतु या पूजेचा त्याला अपवाद आहे.[] विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरांतसुद्धा 'हरिहर' पूजा केली जाते. चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेले हरिहर भेटीचे चित्र प्रसिद्ध आहे. काशी येथील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात या दिवशी विष्णू या देवतेला शंकराच्या गर्भगृहात विशेष स्थान दिले जाते आणि पूजा केली जाते.[] गंगा नदी मध्ये स्नान केल्यानंतर भाविक विश्वनाथ मंदिरात जाऊन विष्णू आणि शिव यांच्यासमोर या दिवशी विशेष पणती लावतात आणि पूजा करतात. विष्णू आणि शिव यांच्या तीर्थक्षेत्री या दिवशी जत्रा भरतात, मेळे भरतात आणि भाविक व स्थानिक लोक त्याचा आनंद घेतात.[] या दिवशी मंदिरांमध्ये अन्नकोट केला जातो.

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Gupte, B. A. (1994). Hindu Holidays and Ceremonials: With Dissertations on Origin, Folklore and Symbols (इंग्रजी भाषेत). Asian Educational Services. ISBN 978-81-206-0953-2.
  2. ^ Dasarā-Divāḷī. Mahārāshṭra Śāsana Śikshaṇa Vibhāga, Mahārāshṭra Rājya Lokasāhitya Samitīsāṭhī. 1990.
  3. ^ a b "वैकुंठप्राप्तीसाठी करतात, वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!". लोकमत. 2020-11-23. 2021-11-16 रोजी पाहिले.
  4. ^ Vibhu, Vidya Bhusan (1958). Abhidhana-anusilana (हिंदी भाषेत).
  5. ^ Vidyarthi, Lalita Prasad; Jha, Makhan; Saraswati, Baidyanath (1979). The Sacred Complex of Kashi: A Microcosm of Indian Civilization (इंग्रजी भाषेत). Concept Publishing Company.
  6. ^ Pokhariyā, Debasiṃha (1994). Loka saṃskr̥ti ke vividha āyāma, Madhya Himālaya ke sandarbha meṃ (हिंदी भाषेत). Śrī Almor̥ā Buka Ḍipo. ISBN 978-81-85865-37-9.