वेस्टजेट एरलाइन्स
| ||||
| स्थापना | २९ फेब्रुवारी १९६६ | |||
|---|---|---|---|---|
| हब |
कॅल्गारी आंतरराष्ट्रीय विमानतळ (कॅल्गारी) टोराँटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ (टोराँटो) व्हँकूव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ (व्हँकूव्हर) | |||
| मुख्य शहरे |
एडमंटन विनिपेग लंडन गॅटविक विमानतळ | |||
| विमान संख्या | ११७ | |||
| गंतव्यस्थाने | ९१ | |||
| मुख्यालय | कॅल्गारी, आल्बर्टा, कॅनडा | |||
| संकेतस्थळ | http://westjet.com/ | |||

वेस्टजेट ही कॅनडा देशातील एक प्रवासी विमानवाहतूक कंपनी आहे. कॅनडातील प्रमुख एरलाइन्सच्या स्पर्धेत प्रवाशांना किफायतशीररीत्या कमी खर्चात प्रवास करता यावा म्हणून या एरलाइनचा उदय झाला.[१] ही एरलाइन देशात आणि देशाबाहेर १०० ठिकाणी विमान सेवा देते. आजच्या घडीला वेस्टजेट एर कॅनडाखालोखाल देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे.[२] वेस्टजेटकडे सध्या ४२५ विमाने आहेत आणि ती प्रत्येक दिवशी ४५००० पेक्षाही जादा प्रवासी वाहतूक करतात. सन २०१३ मध्ये या कंपनीने १८५ लाख प्रवाशांची ने-आण केली. आणि उत्तर अमेरिकेतील ९ क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी ठरली. या कंपनीत १०००० कर्मचारी काम करतात.[३] यांची संघटना नाही आणि वेस्टजेटचा इतर कोणत्याही एरलाइन्स बरोबर करार नाही.
इतिहास
[संपादन]वेस्टजेट या विमान कंपनीची स्थापना क्लाइव्ह बेद्दोए, डेव्हिड नीलेमान, मार्क हिल, टिम मॉर्गन,आणि डोनाल्ड बेल यांनी दिनांक २९-२-१९९६ रोजी केली. अमेरिकेचे साऊथ वेस्ट एरलाइन्स आणि मॉरिस एर यांचे कमी खर्चाच्या विमान सेवेचे मंत्र आत्मसात करून व मार्गदर्शक बांबी नजरेसमोर ठेवून कमी खर्चाची वेस्टजेट विमान सेवा चालू केली.[४] यांचे सुरुवातीचे विमान मार्ग पश्चिम कॅनडातील होते म्हणून त्याला वेस्टजेट हे नाव दिलेले आहे. वरील दिनांकास बोइंग ७३७-२०० ही तीन विमाने व २२५ कर्मचारी वापरून वेस्टजेट कॅलगरी, एडमाॅन्टन, केलोवना, व्हँकूव्हर आणि विंनिंग येथे वेस्टजेटची प्रथम सेवा सुरू झाली.[५] त्याच वर्षी रेगिना, सासकटून आणि व्हिक्टोरिया येथे विमान सेवा देऊन आपला विस्तार वाढविला.
वेस्टजेट एंकोर
[संपादन]वेस्टजेट एंकोरही वेस्टजेटची सहकारी प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. २४ जून, २०१३ पासून ही कंपनी बाँबार्डिये क्यू४०० प्रकारची विमाने वापरून विमानसेवा पुरवते.[६]
निर्गमन ठिकाण
[संपादन]वेस्टजेट आणि वेस्टजेट आंकोर सध्या उत्तर आणि मध्य अमेरिका, कॅरिबियन, युरोप, कॅनडातील ३६ शहरे, आणि युनायटेड स्टेट्स मधील २१ शहरे अशा २० देशात १०० ठिकाणी विमान सेवा देतात. वेस्टजेटचे मुख्य आणि सर्वात मोठे ठाणे टोरोंटो पियरसन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुख्यतः तेथून पूर्व कॅनडा आणि कॅलगारी आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच पश्चिम कॅनडाही जोडलेले आहे. वेस्टजेट ११ कॅनडातील शहरातून ओरलँडो आणि १२ शहरांतून लास व्हेगसला मोसमी थेट विमानसेवा पुरवते.
वेस्टजेट कॅरिबियन देशांतील २० शहरे आणि मेक्सिको मधील ७ शहरांना सेवा पुरवते. त्यांतील काही मोसमी आहेत. वेस्टजेटने आपली नवीन बोईंग-७६७ विमाने वापरून लंडन गॅटविकला थेट सेवा पुरविण्याचे घोषणा जुलै २०१५ मध्ये केली.[७]
विमानताफा
[संपादन]सध्याचा ताफा
[संपादन]डिसेंबर २०२५ च्या सुमारास वेस्टजेटकडे फक्त बोईंग विमाने होती:[८][९]
| विमान | सेवेत | मागण्या | प्रवासी क्षमता | नोंदी | संदर्भ | ||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| व्या | प्री | वा.आ. | कि | एकूण | |||||
| बोईंग ७३७-७०० | ३५ | — | — | १२ | १२ | १०८ | १३२ | निवृत्त केले जाणार आहे, मात्र तारीख अद्याप निश्चित नाही. | [१०] |
| बोईंग ७३७-८०० | ५५ | — | — | १२ | २४ | १३८ | १७४ | [११][१२][१३] | |
| — | — | १८९ | १८९ | १० विमाने स्वूप एरलाइन्सकडून त्यांच्या रंगसंगतीसह हस्तांतरित. ९ विमाने सनविंग एरलाइन्सकडून हस्तांतरित. | |||||
| १२ | ३६ | १३२ | १८० | पुन्हा १७४ आसनांमध्ये बदलले जाणार आहे. | [१४][१५][१६] | ||||
| बोईंग ७३७ मॅक्स ८ | ५९ | ९ | — | १२ | २४ | १३८ | १७४ | [१७][१८] | |
| — | — | १८९ | १८९ | ६ विमाने स्वूपकडून हस्तांतरित. ९ विमाने लिंक्स एरकडून हस्तांतरित. ९ विमाने सनविंगकडून हस्तांतरित. | |||||
| १२ | ३६ | १३२ | १८० | पुन्हा १७४ आसनांमध्ये बदलले जाणार आहे. | [१४][१५][१६] | ||||
| बोईंग ७३७ मॅक्स १० | — | १०१ | — | — | — | १९९ | प्रथम ग्राहक. ४७ पर्यायी विमानांसह मागणी. वितरण २०३४ पर्यंत. |
[१९][२०][२१] | |
| बोईंग ७८७-९ | ७ | ९ | १६ | २८ | ६० | २१६ | ३२० | ४ पर्यायी विमानांसह मागणी. वितरण २०३४ पर्यंत. |
[२२][१९] |
| वेस्टजेट कार्गो (मालवाहतूक) ताफा | |||||||||
| बोईंग ७३७-८००बीसीएफ | ३ | — | मालवाहतूक | सेवा बंद करण्याचे नियोजित. | [२३][२४] | ||||
| एकूण | १५७ | १२३ | |||||||
निवृत्त विमाने
[संपादन]| विमान | एकूण | ताफ्यात आले | निवृत्त झाले | नोंदी |
|---|---|---|---|---|
| बोईंग ७३७-२०० | २५ | १९९६ | २००६ | |
| बोईंग ७३७-६०० | १३ | २००६ | २०२१ | कोव्हिड-१९ महामारीमुळे निवृत्त. |
| बोईंग ७५७-२०० | १ | २०११ | २०११ | नॉर्थ अमेरिकन एरलाइन्सकडून भाड्याने घेतले होते. |
| ७ | २०११ | २०१५ | थॉमस कूक एरलाइन्सकडून कर्मचाऱ्यांसह भाड्याने घेतले होते. | |
| बोईंग ७६७-३००ईआर | ४ | २०१५ | २०२० | कोव्हिड-१९ महामारीमुळे निवृत्त. |
कायदेशीर भागीदारी करार
[संपादन]वेस्ट जेटचा खालील एर लाइन्स बरोबर कायदेशीर भागीदारी करार केलेला आहे.[२५]
- अमेरिकन एरलाइन्स
- एर कॅनडा
- एर फ्रान्स
- एमिरेट्स
- एरोमेक्सिको
- कॅथे पॅसिफिक
- केएलएम
- कोरियन एर
- क्वांटास
- चायना एर लाइन्स
- चायना ईस्टर्न एरलाइन्स
- चायना सदर्न एरलाइन्स
- डेल्टा एर लाइन्स
- जपान एरलाइन्स
- फिलिपाइन्स एरलाइन्स
- लॅटॅम एरलाइन्स
- हैनान एरलाइन्स
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "वेस्टजेट एरलाइन्सच्या बद्दल".
- ↑ "वेस्टजेट एरलाइन्स ने एर फ्रांस, केएलएम एरलाइन्स सोबत कायदेशीर भागीदारी करार केला".
- ↑ "वेस्टजेट एरलाइन्सचा वार्षिक अहवाल".
- ↑ "कनाडामधील वेस्टजेट कमी खर्चिक विमानसेवा कंपनी".
- ↑ "वेस्टजेट एरलाइन्स सेवा". 2015-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-17 रोजी पाहिले.
- ↑ "वेस्टजेट आंकोर ही वेस्टजेटची नवीन प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे".
- ↑ "वेस्टजेट एरलाइन्स लंडन गॅटविकला थेट सेवा देणार".
- ↑ साचा:TCregister
- ↑ "कमर्शियल". बोईंग (इंग्रजी भाषेत). १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "बोईंग ७३७-७०० नेक्स्ट-जनरेशन".
- ↑ टॅम, हाइके (९ ऑगस्ट २०२४). "एर्गो कॅपिटलने आठ विमाने विकत घेऊन वेस्टजेटला भाड्याने दिली". ॲव्हीट्रेडर एव्हिएशन न्यूज. १९ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "बोईंग ७३७-८०० नेक्स्ट जनरेशन".
- ↑ "वेस्टजेटचा ताफा विस्तार सुरू, सनविंगच्या विमानांचा समावेश".
- 1 2 "वेस्टजेटने बोईंग ७३७ च्या नवीन केबिन सुविधा सादर केल्या".
- 1 2 "केबिन अद्यतने".
- 1 2 "वेस्टजेटचा दाटीवाटीच्या आसन व्यवस्थेचा निर्णय रद्द".
- ↑ "बोईंग ७३७-८ मॅक्स".
- ↑ "लिंक्स एरची विमाने ताब्यात घेतल्यानंतर वेस्टजेट उन्हाळी विस्तारासाठी सज्ज". द ग्लोब अँड मेल. २१ जानेवारी २०२५. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले.
- 1 2 "वेस्टजेटची बोईंगसोबतची सर्वात मोठी विमान मागणी" (Press release). वेस्टजेट. ३ सप्टेंबर २०२५.
- ↑ ऑस्ट्रोवर, जॉन (२०२५-०७-२४). "७३७ मॅक्स ७ आणि १० चे प्रमाणन २०२६ पर्यंत लांबणीवर". द एर करंट (इंग्रजी भाषेत). ४ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "वेस्टजेट ग्रुपचा बोईंगसोबत अतिरिक्त विमानांचा करार" (Press release). वेस्टजेट. २९ सप्टेंबर २०२२.
- ↑ "बोईंग ७८७-९ ड्रीमलायनर".
- ↑ "वेस्टजेट कार्गोचे पहिले विमानाचे कॅल्गरीत लँडिंग" (Press release). वेस्टजेट. ८ एप्रिल २०२२.
- ↑ "वेस्टजेट कार्गो आपली मालवाहतूक सेवा बंद करणार". caasint.com. २७ मार्च २०२५.
- ↑ "वेस्टजेटचे उड्डाणे घेणारे हवाई परिवहन भागीदार".