वेलकमहॉटेल (चेन्नई)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वेलकमहॉटेल चेन्नई या पानावरून पुनर्निर्देशित)

माय फॉर्च्यून भारताच्या तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात असलेले पंचतारांकित हॉटेल आहे. आयटीसी वेलकमग्रुप हॉटेल्स, पॅलेसेस अँड रिसोर्ट्स या कंपनीच्या[१] व्यवस्थापनाखाली असलेले हे हॉटेल १०, कॅथेड्रल मार्गावर आहे. याचे उद्घाटन १८ ऑक्टोबर, इ.स. १९७५ रोजी झाले.

इतिहास[संपादन]

हे हॉटेल पूर्वी हॉटेल चोला शॅरेटन म्हणून ओळखले जात असे. चेन्नई परिसरातील अनेक इतर हॉटेलांप्रमाणे हे हॉटेल आयएसओ १४००१ प्रमाणित आहे.[२]

फॉर्च्यून पार्क हॉटेल्स लि. ही आयटीसीची उपकंपनी १९९५ मध्ये स्थापन झाली. हे हॉटेल सर्व प्रकारच्या प्रथम श्रेणी सुविधा देते.[३]

हॉटेल[संपादन]

हे हॉटेल १० मजल्याचे असून यात ९० खोल्या आहेत. त्यात ४८ निवडक फॉर्च्यून क्लब खोल्या, (६५० फूट क्षेत्रफळ), २६ फॉर्च्यून क्लब खोल्या, (४४० फूट क्षेत्रफळ), १६ उच्च प्रतिच्या खोल्या (२२० फूट क्षेत्रफळ) आहेत. या हॉटेलची ऊंची ३९.७५ मीटर आहे. या हॉटेलमध्ये आहार आणि मदिरा सेवांसाठी मातीच्या मोठ्या चुली तसेच उत्तर भारतीय अल्पोपहार, माय कॅफे, २४ तास विविध आहार, माय डेली, दूरांत बार यांचा समावेश केलेला आहे. त्यांची विशेषतः खालील आहे.

माय कॅफे[संपादन]

24 तास विविध प्रकारचे खाध्य व्हरांड्यात देणेची व्यवस्था, बुफे पद्दतीने ब्रेक फास्ट, लंच, डिनर, शिवाय दिवसभर सर्व मेनू सुविधा आहे.

अर्थर्ण ओव्हण[संपादन]

उत्तर भारतातील अनेक प्रकारचे खाध्य पदार्थ त्यात कबाब,करी, भारतीय बेकरी फूड की जे मातीच्या हंडीत तयार केलेले अगदी गरमा गरम मिळण्याचे ठिकाण म्हणजे माय फॉर्च्यून !

माय डेली[संपादन]

कुंडातील पाण्याजवळ हवेशीर ठिकाणी कॉफी / चहा, सॅंडविच, कीश पिझ्झा आणि केक आणि पेस्ट्र्या या माय डेलीमध्ये मिळतात.

ड्यरॅंड बार[संपादन]

उच्चतम प्रतीची मद्ये येथे पुरविली जातात. याचे नाव चार्ल्स ड्युरॅंट या चेन्नईतील सर्वप्रथम वाइन व्यापाऱ्याचे आहे.

रेसिडेंट लोंज[संपादन]

दिवसभर काम केल्यानंतर आरामात विश्रांति घेण्याचे परिपुर्ण विश्राम स्थळ असे याला म्हणता येईल. या हॉटेल मध्ये 3 सभा ग्रह आहेत. त्यातील मंडप सभाग्रहात 200, सागरी सभाग्रहात 60 आणि समीती सभाग्रहात 18 व्यक्ति सामावू शकतात. येथे व्यवसाइकासाठी 8 माणसे सामावतील असे सभाग्रह आहे आणि 4 व्यक्ति पुरते व्यवसाय कार्यालय आहे. पाण्याच्या कुंडा जवळ मोकळ्या जागेत ही 50 व्यक्ति सामाऊ शकतात.

प्रवाश्यांसाठी सर्व सुविधा परिपुर्ण आहेत, त्यात मीटींग साठी तसेच कौटुंबिक गेट टुगेदरसाठी प्रशस्त हॉल, जिम, पोहण्याचा तलाव, सौना, मश्याज केंद्र, यांचा समावेश आहे. हे पंचतारांकित हॉटेल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सर्व पद्दतीचे उत्कृष्ट खाध्य पदार्थ पुरविते.

ठिकाण[संपादन]

माय फॉर्च्यून हॉटेलला चेंन्नईत महत्त्वाचे प्रत्येक ठिकाण सोयीचे आहे. ती खालील प्रमाणे आहेत.

अण्णा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विमानतळ 15 किमी, मुख्य रेल्वे स्टेशन 8 किमी, इगमोर रेल्वे स्टेशन 7 किमी यू.एस. कॉन्सुलेट अंदाजित 0.5 किमी, टी. नगर (खरेदी केंद्र) 4 किमी, मरीना बीच 3 किमी अण्णा सलाई (व्यापारी केंद्र ) 7 किमी, कपलेश्वंर मंदिर 4 किमी

सुविधा[संपादन]

इतर सुविधा खालील प्रमाणे आहेत.

सेफ, दूरध्वनी, इस्त्री, धोबी, रेफ्रीजरेटर, वर्तमानपत्र, एलसीडी प्रोजेक्टर, ऑडिओ विजुयल उपकरण, मुलांचे मनोरंजन सुविधा, बुटी सलुन, स्वास्थ्य केंद्र, खरेदी केंद्र, स्टीम बाथ, 24 तास स्वागत कक्ष, वाहन तळं, प्रवाशी मार्गदर्शक, पाळणा घर, ड्राय क्लिनिंग, फुलांचे दुकान, 24 तास सुरक्षा, लिफ्ट, लग्न समारंभ सेवा !

संदर्भ[संपादन]

  1. ^ "माय फॉर्च्यून चेन्नई वैशिष्ट्ये".
  2. ^ "आयटीसी हॉटेल्स बद्दल".
  3. ^ "वेलकम होटल शेरेटोन चोला इन चेन्नई गेटस् फॉच्र्युन टॅग".