वेदांमधील कथा
वेदांमधील कथा - वेदांमध्ये ज्या कथा येतात त्यांना प्रतीकात्मक आध्यात्मिक अर्थ आहे.
०१) पणी नावाच्या दैत्यांनी किंवा वल नावाच्या शत्रूने गायी गुहेत लपवून ठेवल्या होत्या. इंद्र आणि बृहस्पती यांनी अंगिरस आणि सरमा नावाची श्वानकन्या यांच्या मदतीने या गायींची मुक्तता केली अशी कथा ऋग्वेदामध्ये येते. वेदांचे रहस्य जाणून घेण्यासाठी ही कथा गुरुकिल्लीप्रमाणे उपयोगी ठरते. [१]
०२) अंगिरस ऋषींनी हरवलेला प्रकाश आणि हरवलेला सूर्य नऊ ते दहा महिन्यांच्या तपश्चर्येनंतर परत मिळवला अशी एक कथा आहे. (वेद-रहस्य:पा. ११४)
०३) वृत्राच्या पराभवानंतर जलप्रवाह मोकळे झाले, अशी एक कथा आहे. त्याच्या वधानंतर सूर्याच्या जन्माची नांदी होते, उषेचा उदय होतो. (वेदरहस्य: पा. १३२)
०४) वल या असुराच्या वधानंतर पशुधन मोकळे झाले, अशी एक कथा आहे. (वेदरहस्य: पा. १३२)
०५) सूर्य अंधारात राहत होता. दहा महिने तप करून अंगिरस ऋषींनी त्याचा शोध लावला असे वेदामध्ये लिहिले आहे. या कथेचा उगम जुना आहे. या कथेला समांतर अशी कथा इजिप्शियन संस्कृतीच्या आधी अमेरिकेत असलेल्या मय संस्कृतीमध्ये एक कथा येते. [१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b वेद-रहस्य - मूळ लेखक योगी श्रीअरविंद, अनुवाद - स्वर्णलता भिशीकर, २०२३, श्रीअरविंद आश्रम