वृत्तलेखन
वृत्तलेखन म्हणजे घडून गेलेल्या बातमीचा आढावा घेणे होय .एखादी बातमी घडून गेल्यानंतर वृत्तलेख लिहिला जातो . वृत्तलेख हा नेहमीच ताजा असावा लागतो . त्याला काही निमित्त असावे लागते.वृत्तलेख हा घडलेल्या, घडू पाहणाऱ्या घटनेशी संबंधित असतो .वृत्त्लेखाला ‘धावपळीचे साहित्य’ असेही म्हणतात .वृत्तलेख तातडीचा असला तरी त्यामधील अचूकता महत्त्वाची असते .वृत्तलेखात वाचकांच्या भावनाची दखल घेतली जाते. वृत्तलेख हा स्वतंत्र असतो. त्यातील मजकूर हा वैशिष्ट्यापूर्ण असतो,तसेच तो आकर्षकही असतो. वृत्तलेखाची भाषादेखील वाचकाला खिळवून ठेवणारी असते. वृत्तलेखाची भाषा सोपी ,वाचकाला समजणारी ,त्यांना आपलीशी वाटणारी ,वाचकांच्या मनात ठाव घेणारी ,कमी शब्दात अधिक आशय सांगणारी असते . वृत्तलेख वाचकाला आनंद देणारा ,माहिती देणारा ,ज्ञान देणारा , मनोरंजन करणारा असतो. वाचकाला त्यात उत्सुकता आणि रस असतो .
वृत्तलेखांचे प्रकार :
- बातमीवर आधारित वृत्तलेख
- व्यक्तीचित्रनात्मक वृत्तलेख
- मुलाखतीवर आधारित वृत्तलेख
- ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख
- नवल ,गूढ ,विस्मय इत्यादींवर आधारित वृत्तलेख
वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यायच्या बाबी :
- वाचकांची अभिरुची
- तात्कालिकता
- वेगळेपण
- वाचकांचे लक्ष वेधणे
- वृत्तलेखाची शैली