Jump to content

विश्वनाथ भालचंद्र देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विश्वनाथ भालचंद्र देशपांडे (mr) वि.भा. देशपांडे, वि.भा. (mr)
विश्वनाथ भालचंद्र देशपांडे 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
जन्म तारीखमे ३१, इ.स. १९३८
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विश्वनाथ भालचंद्र देशपांडे (३१ मे, इ.स. १९३८ - ९ मार्च, २०१७) हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी होते. त्यांनी मराठी नाट्यसृष्टीबद्दल लिखाण केले. त्यांनी मराठी नाट्यकोश या सुमारे १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन केले. देशपांडे यांची २०१५ सालापर्यंत अंदाजे ५१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यांपैकी २५ पुस्तके नाट्यविषयक आहेत.[]

‘नाटकातली माणसं‘’, ‘‘गाजलेल्या भूमिका’‘, ‘‘नाटक नावाचं बेट‘’, ‘‘निळू फुले‘‘, ‘‘नाट्यभ्रमणगाथा‘’ , ‘‘निवडक नाट्यप्रवेश : पौराणिक’‘, ‘‘वारसा रंगभूमीचा’‘, ‘‘आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा’‘ ही त्यांनी लिहिलेली काही पुस्तके आहेत. देशपांडे यांना आजवरच्या प्रवासात भेटलेली माणसे आणि त्यांच्याकडून आलेले अनुभव त्यांनी ‘‘नाट्यभ्रमणगाथा’‘ पुस्तकातून लिहिले आहेत. त्यांनी नाट्य-साहित्य क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींबरोबर त्यांनी काम केले तसेच त्यांची मैत्री होती. यांत वि.वा. शिरवाडकर, पु.ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले, विजया मेहता, ज्योत्स्ना भोळे, भीमसेन जोशी, कमलाकर सारंग यांचा समावेश होता.

प्रकाशित साहित्य (स्वतंत्र ग्रंथलेखन)

[संपादन]
  • आचार्य अत्रे प्रतिमा आणि प्रतिभा (प्रेस्टिज प्रकाशन , पुणे)
  • कालचक्र : एक अभ्यास (स्नेहवर्धन प्रकाशन , पुणे)
  • गाजलेल्या भूमिका
  • नटसम्राट : एक आकलन (पुणे विद्यापीठ प्रकाशन)
  • नाटककार खानोलकर (नूतन प्रकाशन , पुणे)
  • नाटक नावाचं बेट
  • नाटकातली माणसं
  • नाट्यभ्रमणगाथा (५१वे पुस्तक), (माधवी प्रकाशन, पुणे. जुलै-२०१५)
  • नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती) . (विमल प्रकाशन , पुणे)
  • नाट्यव्यक्तिरेखाटन , पौराणिक-ऐतिहासिक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
  • नाट्यसंवाद रचना कौशल्य (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ)
  • नाट्यस्पंदने (नाट्यविषयक लेख) (सिग्नेट पब्लिकेशन, पुणे)
  • निवडक नाट्यप्रवेश : पौराणिक
  • निवडक नाट्य मनोगते (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
  • निळू फुले
  • मराठी एकांकी (हिंदी) - (भारतीय भाषा परिषद, कलकत्ता)
  • मराठी नाटक पहिले शतक (व्हीनस प्रकाशन , पुणे)
  • मराठी रंगभूमी - स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ - रंगभूमीचा इतिहास (दोन खंड) (व्हीनस प्रकाशन , पुणे)
  • माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रवास (उन्मेष प्रकाशन , पुणे)
  • यक्षगान लोकनाटक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
  • रायगडाला जेव्हा जाग येते : एक सिंहावलोकन (इंद्रायणी प्रकाशन , पुणे)
  • वसंत शिंदे : व्यक्ती - कलावंत (श्री विशाखा प्रकाशन , पुणे)
  • वारसा रंगभूमीचा
  • (इ.स. १९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथस्वरूपाचे लेखन
  • स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक (व्हीनस प्रकाशन , पुणे)

संपादनात्मक लेखन

[संपादन]
  • के. नारायण काळे यांच्या लेखांचे संपादन (प्रतिमा रूप आणि रंग) (नूतन प्रकाशन , पुणे)
  • गानयोगी मल्लिकार्जुन मन्सूर (पृथ्वी प्रकाशन , पुणे)
  • निवडक एकांकिका - १९७८ (मेहता प्रकाशन , पुणे)
  • प्रयोगक्षम एकांकिका - १९८३ (मेहता प्रकाशन , पुणे)
  • निवडक नाट्यप्रवेश भाग १ (पौराणिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
  • निवडक नाट्यप्रवेश भाग २ (ऐतिहासिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
  • निवडक नाट्यप्रवेश भाग ३ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
  • निवडक नाट्यप्रवेश भाग ४ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
  • पु. ल. पंच्याहत्तरी (सहसंपादन) (पु. ल. गौरव समिती)
  • प्रतिमा रूप आणि रंग (के. नारायण काळे यांचे लेख) (नूतन प्रकाशन , पुणे)
  • मराठी एकांकी (हिंदी) (भारतीय भाषा परिषद , कलकत्ता)
  • मराठी कलाभिरुची (कॉन्टिनेन्टल प्रकाशन , पुणे)
  • मराठी नाट्यकोश (निशांत प्रकाशन, कलागौरव , पुणे)
  • मराठी नाट्यसमीक्षा : काही दृष्टिकोण (मेहता प्रकाशन , पुणे)
  • मराठी भाषा - साहित्य (मेहता प्रकाशन , पुणे)
  • रंगयात्रा(१९५० ते १९८५ मधील रंगभूमीविषयक लेखांचा संग्रह) (नाट्यसंपदा प्रकाशन , पुणे)
  • वसंत शिंदे : व्यक्ती - कलावंत (श्री विशाखा प्रकाशन , पुणे)

गौरवग्रंथ/गौरविका संपादन

[संपादन]

पुरस्कार/सन्मान

[संपादन]
  • उत्कृष्ट संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार
  • कॉसमॉस पुरस्कार
  • जयवंतराव टिळक गौरव निधीतून पुरस्कार
  • नाट्यगौरव पुरस्कार
  • नाट्यदर्पण पुरस्कार
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गौरव
  • पुणे महापालिकेकडून गौरव
  • माधव मनोहर पुरस्कार
  • रंगत-संगत सन्मान
  • राजा मंत्री पुरस्कार
  • वत्सलाबाई अंबाडे साहित्य निर्मिती पुरस्कार (१८-२-२०१५)
  • वि.स. खांडेकर नाट्यसमीक्षक पुरस्कार

इंदिरा-भालचंद्र पुरस्कार

[संपादन]

वि.भा. देशपांडे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दर वर्षी एका चांगल्या ग्रंथाला ‘इंदिरा-भालचंद्र पुरस्कार’ देण्यात येतो. २०१६ साली हा पुरस्कार रत्‍नाकर मतकरी यांना त्यांच्या ‘माझे रंगप्रयोग’ या पुस्तकासाठी देण्यात आला. (७-८-२०१६). दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

याआधी विजया मेहता (झिम्मा), डॉ. अजय वैद्य (मास्टर दत्ताराम : नाट्यवीर) व मोहन जोशी (नट-खट) यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भा. रा. भागवत, वि. भा. देशपांडे, उत्तम कांबळे". १७ डिसेंबर २०२५ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]