विश्वनाथ जिल्हा
| लघुनाम | BSW |
|---|---|
| देश | भारत |
| राजधानी | Biswanath Chariali |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | North Assam division |
| भौगोलिक गुणक | २६°४३′४०″N ९३°९′६″E |

विश्वनाथ जिल्हा हा भारतातील आसाम राज्यातील एक जिल्हा आहे. २०१५ मध्ये नविन निर्माण झालेल्या जिल्ह्यांपैकी हा एक जिल्हा आहे. १५ ऑगस्ट २०१५ ला तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी ह्या जिल्ह्याच्या निर्मीतीची घोषणा केली होती.[१][२]
पूर्वीच्या सोनितपूर जिल्ह्यातील गोहपूर आणि विश्वनाथ उपविभागाचा बहुतांश भाग एकत्र करून हा जिल्हा तयार करण्यात आला आहे. या जिल्ह्याच्या सीमा उत्तरेला अरुणाचल प्रदेश, दक्षिणेला गोलाघाट व ब्रह्मपुत्रा नदी, पूर्वेला लखीमपूर जिल्हा आणि पश्चिमेला सोनितपूर जिल्हा यांना लागून आहेत. ह्याचे प्रशासकीय मुख्यालय विश्वनाथ चारियाली येथे आहे.
३१ डिसेंबर २०२२ रोजी, राज्यातील भारतीय निवडणूक आयोग द्वारे होणाऱ्या परिसीमन प्रक्रियेपूर्वी, या जिल्ह्याचे विद्यमान सोनितपूर जिल्ह्यात पुनर्विलनीकरण करण्यात आले.[३]
तथापि, २५ ऑगस्ट २०२३ रोजी, आसाम मंत्रिमंडळाने विश्वनाथचा जिल्हा दर्जा पुनर्संचयित करण्याची घोषणा केली.[४]
संदर्भ
[संपादन]- ↑ "CM Tarun Gogoi announces 5 new districts in Assam on Independence Day". 2016-03-03 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2016-01-27 रोजी पाहिले.
- ↑ "Assam gets five more districts". 15 August 2015. 25 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 January 2016 रोजी पाहिले.
- ↑ Tribune, The Assam (2022-12-31). "Assam: Four districts to re-merge with existing districts". assamtribune.com (इंग्रजी भाषेत). 2023-01-03 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-01-03 रोजी पाहिले.
- ↑ "Assam Cabinet decides to 'create' 4 districts". The Hindu. 25 August 2023. 26 August 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 August 2023 रोजी पाहिले.