मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड
मॅक ओएस एक्स चा एक भाग
विकासक
अ‍ॅपल इन्क.
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
आवृत्त्या
प्रकाशन दिनांक ऑगस्ट २८, २००९ (माहिती)
सद्य आवृत्ती १०.६.७ (मार्च २१, २०११) (माहिती)
परवाना एपीसीएल व अ‍ॅपल इयुएलए
केर्नेल प्रकार ३२-बिट किंवा ६४-बिट हायब्रिड
पूर्वाधिकारी मॅक ओएस एक्स लेपर्ड
उत्तराधिकारी मॅक ओएस एक्स लायन
समर्थन स्थिती
फक्त सुरक्षा अद्ययावते


मॅक ओएस एक्स १०.६ (सांकेतिक नाव स्नो लेपर्ड) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची सातवी महत्त्वाची आवृत्ती आहे. ती मॅक ओएस एक्स लेपर्डची उत्तराधिकारी असून मॅक ओएस एक्स लायनची पूर्वाधिकारी आहे.

स्नो लेपर्डचे उद्घाटन जून ८, २००९ रोजी अ‍ॅपल वर्ल्डवाइड डेव्हलपर्स मध्ये झाले. २८ ऑगस्ट २००८ मध्ये ही संगणक प्रणाली जगामध्ये जारी करण्यात आली व ती अ‍ॅपलच्या संकेतस्थळावरून विकत घेण्यास उपलब्ध करण्यात आली. एका वापरकर्त्यासाठी या सॉफ्टवेअरची किंमत २९ अमेरिकन डॉलर आहे. या कमी किमतीमुळे तिची पहिली विक्री आधीच्या सर्व ओएस एक्सपेक्षा जास्त होती. मॅक ओएस एक्स लेपर्डच्या उद्घाटनानंतर स्नो लेपर्डचे उद्घाटन जवळजवळ २ वर्षांनी झाले.

मॅक ओएस एक्स लायन ही ओएस मॅक ओएस एक्स स्नो लेपर्डनंतर प्रकाशित झाली. तिचे प्रकाशन जुलै २०, २०११ रोजी झाले.

सिस्टिम आवश्यकता[संपादन]

  • इंटेल प्रक्रियाकारासहित (प्रोसेसर) (आयए-३२) मॅक संगणक. कोअर सोलो व कोअर ड्यु सारखे "योनाह" प्रक्रियाकार फक्त ३२-बिट प्रणाल्या चालवू शकतात.
  • १ जीबी रॅम
  • ५ जीबी डिस्क उपलब्ध
  • डीव्हीडी ड्राइव्ह / यूएसबी किंवा फायरवायर डीव्हीडी ड्राइव्ह स्थापनेसाठी

आवृत्त्यांचा इतिहास[संपादन]

आवृत्ती बिल्ड दिनांक ओएस नाव टिपा उतरवणे
१०.६ १०ए४३२ ऑगस्ट २८, २००९ डार्विन १०.० मूळ रिटेल डीव्हीडी आवृत्ती style="background: #ececec; color: #2C2C2C; vertical-align: middle; font-size: smaller; text-align: center; " class="table-na" | —
१०ए४३३ सर्व्हर आवृत्ती; मूळ रिटेल डीव्हीडी आवृत्ती
१०.६.१ १०बी५०४ सप्टेंबर १०, २००९ डार्विन १०.१ मॅक ओएस एक्स १०.६.१ विषयी मॅक ओएस एक्स १०.६.१
१०.६.२ १०सी५४० नोव्हेंबर ९, २००९ डार्विन १०.२ मॅक ओएस एक्स १०.६.२ विषयी मॅक ओएस एक्स १०.६.२
१०.६.३ १०डी५७३ मार्च २९, २०१० डार्विन १०.३ मॅक ओएस एक्स १०.६.२ विषयी मॅक ओएस एक्स १०.६.२
१०डी५७५ ? द्वितीय रिटेल डीव्हीडी प्रकाशन
१०डी५७८ एप्रिल १३, २०१० मॅक ओएस एक्स १०.६.२ विषयी; १.१ मॅक ओएस एक्स १०.६.२ (कॉम्बो)
१०.६.४ १०एफ५६९ जून १५, २०१० डार्विन १०.४ मॅक ओएस एक्स १०.६.४ विषयी मॅक ओएस एक्स १०.६.४ (कॉम्बो)
१०.६.५ १०एच५७४ नोव्हेंबर १०, २०१० डार्विन १०.५ मॅक ओएस एक्स १०.६.५ विषयी मॅक ओएस एक्स १०.६.५ (कॉम्बो)
१०.६.६ १०जे५६७ जानेवारी ६, २०११ डार्विन १०.६ मॅक ओएस एक्स १०.६.६ विषयी मॅक ओएस एक्स १०.६.५ (कॉम्बो)
१०.६.७ १०जे८६९ मार्च २१, २०११ डार्विन १०.७ मॅक ओएस एक्स १०.६.६ विषयी मॅक ओएस एक्स १०.६.६ (कॉम्बो)
१०जे३२५० मार्च २१, २०११ "अर्ली २०११ मॅकबुक प्रो" साठी मॅक ओएस एक्स १०.६.७ "अर्ली २०११ मॅकबुक प्रो" साठी

नवीन किंवा बदललेली साधने[संपादन]

या विभागास विस्ताराची आवश्यकता आहे.

वगळलेली साधने[संपादन]