इंडोनेशिया एअरएशिया फ्लाइट ८५०१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंडोनेशिया एअरएशिया फ्लाइट ८५०१
PK-AXC ह्या भरकटलेल्या विमानाचे सिंगापूर चांगी विमानतळावर ऑगस्ट २०११ मध्ये टिपलेले चित्र
अपघात सारांश
तारीख २८ डिसेंबर, इ.स. २०१४
स्थळ शेवटचा संपर्क झालेले ठिकाण: जावा समुद्र, इंडोनेशिया[१]
3°14′47.76″S 109°22′5.52″E / 3.2466000°S 109.3682000°E / -3.2466000; 109.3682000
प्रवासी १५५
कर्मचारी
विमान प्रकार एअरबस ए३२०
वाहतूक कंपनी इंडोनेशिया एअरएशिया
पासून जुआंदा आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुरबया, इंडोनेशिया
शेवट सिंगापूर चांगी विमानतळ, सिंगापूर
फ्लाइटचा मार्ग व शेवटचे ज्ञात ठिकाण

इंडोनेशिया एअरएशिया फ्लाइट ८५०१ हे एअरएशियाच्या इंडोनेशियामधील उपकंपनीचे सुरबयाहून सिंगापूरकडे जाणारे उड्डाण होते.

२८ डिसेंबर २०१४ रोजी पश्चिम इंडोनेशियन प्रमानवेळेनुसार (यूटीसी+०७:००) ०५:३५ वाजता ह्या विमान सुरबया शहराच्या जुआंदा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सिंगापूर चांगी विमानतळाकडे जाण्यासाठी उड्डाण केले. ०६:१७ वाजता ह्या विमानासोबत अखेरचा संपर्क झाला होता. त्यानंतर हे विमान बेपत्ता झाले आहे.

जाणकारांच्या मतानुसार खराब हवामान व वादळामुळे हे विमान समुद्रात कोसळले असण्याची दाट शक्यता आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "AirAsia flight QZ8501 loses contact with air traffic control" (इंग्लिश भाषेत). २०१४-१२-२९ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)