"संगीत सौभद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो →‎बाह्य दुवे: साचा भरला using AWB
(चर्चा | योगदान)
छो संगीत सौभद्रपान सौभद्र कडे J स्थानांतरीत
(काही फरक नाही)

११:४५, २५ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

नाटक: संगीत सौभद्र

लेखक : बलवंत पांडुरंग तथा बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
साल: इ.स. १८८२
पात्रे :

  • अर्जुन
  • सुभद्रा
  • नारद
  • श्री कृष्ण
  • बलराम
  • नटी
  • सूत्रधार
  • रुख्मिणी
  • विदूषक
  • कुसुमावती
  • सारंगनयना
  • गर्गमुनी

या नाटकातली गाजलेली पदं

पात्र: नारद
राधाधरमधुमिलिंद जयजय । रमारमण हरि गोविंद ॥ धृ ॥
कालिंदी तट पुलिंद लांच्छित सुरनुतपदरविंद । जयजय ॥ 1 ॥
उदधृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद । जयजय ॥ 2 ॥
गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवत्स्तुतिते न निंद । जयजय ॥ 3 ॥

पात्र: नारद

पार्था, तुज देउन वचनें ।
फसविले पहा मुकुंदानें ॥ ध्रु ॥
सार्वभौम दुर्योधननृपती ।
लक्ष्मी त्याची आणुनी चित्तीं ।
त्यजिले तुज अवमानें ॥ 1 ॥

पात्र: नारद
पावना वामना या मना ।
दे तव भजनीं निरंतर वासना ॥ ध्रु ॥
श्रीवत्सांकित कौस्तुभधारिन ।
योगिजनांतररंजना ॥ 1 ॥
भो प्रल्हादपरा हरिरुपा ।
मत्तनिशाचरकंदना ॥ 2 ॥
नवतुलसीदलमालाभूषा ।
बलवद भवभयभंजना ॥ 3 ॥

पात्र: सुभद्रा
बलसागर तुम्ही वीरशिरोमणी कोठेंतरी रमलां ।
आश्वासन जिस दिले तिला कां विसरुनियां गेलां ॥ धृ ॥
पेरियलें जें प्रीतितरुचें बीज ह्रुदयिं त्याला ।
अंकुर येउनि सुदृढ तयाचा वृक्ष असे झाला ।
सुंदर तुम्ही मूर्तिमान तच्छायेला बसलां ।
चित्र असे हृदयांत कोंदतां ठाव न अन्याला ॥



बाह्य दुवे