"हर्बर्ट हूवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ku:Herbert Hoover
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hy:Հերբերտ Հուվեր
ओळ ५४: ओळ ५४:
[[hr:Herbert Hoover]]
[[hr:Herbert Hoover]]
[[hu:Herbert Hoover]]
[[hu:Herbert Hoover]]
[[hy:Հերբերտ Հուվեր]]
[[id:Herbert Hoover]]
[[id:Herbert Hoover]]
[[io:Herbert Hoover]]
[[io:Herbert Hoover]]

००:४२, २९ मार्च २०१२ ची आवृत्ती

हर्बर्ट हूवर

हर्बर्ट क्लार्क हूवर (इंग्लिश: Herbert Clark Hoover) (ऑगस्ट १०, इ.स. १८७४ - ऑक्टोबर २०, इ.स. १९६४) हा अमेरिकेचा ३१वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १९२९ ते ४ मार्च, इ.स. १९३३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली.

हूवर पेशाने खाण-अभियंता व लेखक होता. इ.स. १९२०च्या दशकामधल्या वॉरेन हार्डिंगकॅल्विन कूलिज यांच्या अध्यक्षीय राजवटींमध्ये त्याने वाणिज्यसचिवाचा पदभार वाहिला होता. हूवराला अध्यक्षीय निवडणूकमोहिमांचा काहीही अनुभव नसतानादेखील रिपब्लिकन पक्षाने इ.स. १९२८च्या अध्यक्षीय निवडणुकींसाठी त्याचे नामांकन जाहीर केले. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार अल स्मिथ याच्यावर त्याने घवघवीत मताधिक्याने विजय मिळवला. निवडणुकांचा किंवा सैनिकी पेशातील उच्चपदांवरचा अनुभव नसतानाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर निवडून आलेल्या दोन व्यक्तींपैकी हा एक (दुसरा म्हणजे विल्यम हॉवार्ड टाफ्ट) आहे.

इ.स. १९३०च्या दशकाच्या आरंभी पसरू लागलेल्या महामंदीचा हूवर प्रशासनाला सामना करावा लागला. त्यासाठी हूवर प्रशासनाने हूवर धरणप्रकल्पासारखे मोठे प्रकल्प हाती घेतले, स्मूट-हॉली टॅरिफ योजनेअंतर्गत कररचनेतील सर्वाधिक करचौकट २५%पासून ६३%पर्यंत पुढे रेटली; मात्र आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी हे प्रयत्न फारसे यशस्वी ठरले नाहीत. परिणामी इ.स. १९३२च्या अध्यक्षीय निवडणुकींत हूवर पराभूत झाला.

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://www.whitehouse.gov/history/presidents/hh31.html. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • (इंग्लिश भाषेत) http://www.loc.gov/rr/program/bib/presidents/hoover/index.html. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)