"सलांगोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २६: ओळ २६:


=== विधिमंडळ व कार्यकारी परिषद ===
=== विधिमंडळ व कार्यकारी परिषद ===
सलांगोराचे विधिमंडळ ही शासनव्यवस्थेतील वैधानिक यंत्रणा असते. दर पाच वर्षांनी होणार्‍या सार्वजनिक निवडणुकींमधून विधिमंडळाचे सदस्य निवडले जातात. विधिमंडळ सदस्यांपैकी सुलतानाने निवडलेल्या दहा सदस्यांची कार्यकारी परिषद ही शासनव्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणा असते. ''मंत्री बसार'', अर्थात मुख्यमंत्री, हा सलांगोराच्या कार्यकारी परिषदेचा अध्यक्ष व कार्यकारी शासनप्रमुख असतो.
सलांगोराचे विधिमंडळ ही शासनव्यवस्थेतील वैधानिक यंत्रणा असते. दर पाच वर्षांनी होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकींमधून विधिमंडळाचे सदस्य निवडले जातात. विधिमंडळ सदस्यांपैकी सुलतानाने निवडलेल्या दहा सदस्यांची कार्यकारी परिषद ही शासनव्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणा असते. ''मंत्री बसार'', अर्थात मुख्यमंत्री, हा सलांगोराच्या कार्यकारी परिषदेचा अध्यक्ष व कार्यकारी शासनप्रमुख असतो.


=== प्रशासकीय विभाग ===
=== प्रशासकीय विभाग ===

००:५३, ३ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

सलांगोर
Selangor
سلاڠور
मलेशियाचे राज्य
ध्वज

सलांगोरचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
सलांगोरचे मलेशिया देशामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
राजधानी शाह आलम
क्षेत्रफळ ७,९५६ चौ. किमी (३,०७२ चौ. मैल)
लोकसंख्या ५१,८०,०००
घनता ६५१.१ /चौ. किमी (१,६८६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MY-10
संकेतस्थळ http://www.selangor.gov.my/

सलांगोर (देवनागरी लेखनभेद: सेलांगोर; भासा मलेशिया: Selangor; जावी लिपी: سلاڠور ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. त्याच्या उत्तरेस पराक, पूर्वेस पाहांग, दक्षिणेस नगरी संबिलान, तर पश्चिमेस मलाक्क्याची सामुद्रधुनी आहे. क्वालालंपूरपुत्रजया हे दोन मलेशियन संघाचे संघशासित प्रदेश चहूबाजूंनी सलांगोराने वेढले असून, पूर्वी ते सलांगोराच्याच अधिक्षेत्रात समाविष्ट होते.

सलांगोराची प्रशासकीय राजधानी शाह आलम येथे असून शाही राजधानी क्लांग येथे आहे.

सकल वार्षिक उत्पन्नाच्या निकषानुसार सलांगोर मलेशियाच्या संघातील सर्वाधिक संपन्न राज्य असून येथील दरडोई उत्पन्नही देशात सर्वाधिक आहे. २७ ऑगस्ट, इ.स. २००५ रोजी सलांगोर राज्य शासनाने सलांगोर मलेशियाच्या संघातील पहिले विकसित राज्य बनल्याची घोषणा केली.

शासन, प्रशासन व राजकारण

सलांगोराच्या राज्यघटनेनुसार सलांगोर घटनात्मक राजतंत्र आहे. २६ फेब्रुवारी, इ.स. १९५९ रोजी सलांगोराची राज्यघटना लागू झाली.

राजतंत्र

सलांगोराचा सुलतान हा सलांगोराचा घटनात्मक शासनप्रमुख असतो. सलांगोराच्या राजघराण्यातील व्यक्ती वंशपरंपरागत रित्या या पदावर आरूढ होतात.

विधिमंडळ व कार्यकारी परिषद

सलांगोराचे विधिमंडळ ही शासनव्यवस्थेतील वैधानिक यंत्रणा असते. दर पाच वर्षांनी होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकींमधून विधिमंडळाचे सदस्य निवडले जातात. विधिमंडळ सदस्यांपैकी सुलतानाने निवडलेल्या दहा सदस्यांची कार्यकारी परिषद ही शासनव्यवस्थेतील कार्यकारी यंत्रणा असते. मंत्री बसार, अर्थात मुख्यमंत्री, हा सलांगोराच्या कार्यकारी परिषदेचा अध्यक्ष व कार्यकारी शासनप्रमुख असतो.

प्रशासकीय विभाग

सलांगोरातील जिल्हे

प्रशासकीय दृष्ट्या सलांगोराचे नऊ जिल्हे आहेत :

  1. गोंबाक
  2. हुलू लांगात
  3. हुलू सलांगोर
  4. क्लांग (पोर्ट क्लांग शहरासह)
  5. क्वाला लांगात
  6. क्वाला सलांगोर
  7. पतालिंग
  8. साबाक बर्नाम
  9. सपांग

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत