"सदस्य चर्चा:Mvkulkarni23" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ७३७: ओळ ७३७:


[[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] १६:१३, १ जानेवारी २०१२ (UTC)
[[ सदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 | राहुल देशमुख ]] १६:१३, १ जानेवारी २०१२ (UTC)

: धन्यवाद राहुल. [[नवीन सदस्यांना मार्गदर्शन]] या लेखात काही सुधारणा हव्या असल्यास अवश्य सुचवाव्यात/ कराव्यात. त्याचा फायदा मराठी विकिपीडिया वर येणाऱ्या नवीन सदस्यांना नक्कीच होईल.... मंदार कुलकर्णी १६:४६, १ जानेवारी २०१२ (UTC)

२२:१६, १ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

   स्वागत Mvkulkarni23, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Mvkulkarni23, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९५,७१६ लेख आहे व २८२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :



मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

कृपया मजकुरातील भाषा मराठी व लिपी देवनागरी ठेवावी

नमस्कार कुलकर्णी!

आपण गेल्या काही अमेरिकाविषयक संपादनांमध्ये काही रोमन लिपीतील शब्द मजकुरात अधूनमधून लिहिल्याचे पाहिले. मराठी विकिपीडियावर विकिसंकेतांनुसार परभाषीय अथवा देवनागरीखेरीज अन्य लिप्यांमधील शब्द योजण्याच्या विवक्षित व प्रचलित पद्धती आहेत :

  • लेखाचा विषय परभाषीय असल्यास त्या-त्या स्थानिक भाषेनुसार अथवा लिपीनुसार त्याचे लेखन लेखाच्या आरंभी एकदाच नोंदवले जाते. तसे करताना त्या-त्या स्थानिक भाषेचा किंवा लिपीचा उल्लेख केला जातो.
  • त्यानंतर मात्र लेखात सहसा देवनागरी लिपीतच या संज्ञांचे/ नावांचे लेखन केले जाते.

या संकेतामागचे प्रयोजन असे, की मराठी विकिपीडियावर एकमेव गृहित भाषा मराठी व गृहित लिपी देवनागरी मानली जाते. अन्य भाषांतील अथवा लिप्यांतील लेखने विषयोचित असल्यास लिहायला हरकत नसली, तरीही वाचकाला त्या-त्या भाषेची अथवा त्या-त्या लिपीची पूर्वकल्पना देणे बंधनकारक मानले जाते. हे मुद्दे अधिक स्पष्ट होण्यासाठी खालील लेख पाहावेत :

आपला उत्साहवर्धक सहभाग असाच लाभत राहील, ही आशा आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:०२, २८ ऑक्टोबर २०१० (UTC)

विश्वकोशीय लेखनशैली

धन्यवाद

नमस्कार मंदार! आपण उत्साहाने सहभागी होत आहात, त्याबद्दल आदर आणि कौतुक आहेच. आपल्यासारख्या सदस्यांना मदत करायला इथले नियमित सदस्य आपणहून येतातच, कारण सर्वांच्या सहयोगी प्रयत्नांनी मराठी विकिपीडिया वाढावा ही आपल्या सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे.
क.लो.अ.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:१८, २९ ऑक्टोबर २०१० (UTC)


सदस्यचौकट साचे

कृपया [[वर्ग:सदस्यचौकट साचे]]येथे बघा. तेथील लागु असणारे साचे आपण आपल्या सदस्यपानावर लावु शकता. वि. नरसीकर (चर्चा) १४:४९, ३१ ऑक्टोबर २०१० (UTC)

Hi there

Hi Mandar, User:AshLin from en:WP. We met yesterday at SICR. AshLin ०५:२६, ४ जानेवारी २०११ (UTC)

साचा:महाराष्ट्र राज्य महामार्ग

नमस्कार, तुम्ही "साचा:महाराष्ट्र राज्य महामार्ग" ह्या साच्यामध्ये काही बदल केले , काही दिवसापुर्वी ज्या महामार्गांचे लेख नाहीत त्या महामर्गांचे दुवे मी ह्या साच्या मधुन काढले होते. ते तुम्ही परत टाकले? क्रृपया त्या बदलचे कारण सांगावे अथवा त्या साच्याला पुर्वस्थीत अणावे हि विंनंती. --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १०:४१, २२ फेब्रुवारी २०११ (UTC)

नमस्कार, मला असे वाटते की साचा भरून त्यात आपल्या सगळ्यांना माहिती भरता येईल. आधी साचा बनवून मग पाने भाराने मला सोपे जाते. तुम्हाला जर तसे वाटत नसेल तर आपण बदल उलटवू शकता. - मंदार कुलकर्णी

नमस्कार, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण सध्या अपल्याकडे फक्त ५ लेख आहेत, त्यातसुधा २ लेख मी आता पुर्ण केले. तो साचा खूप खराब दिसत आहे कारण त्यात लाल दुवे जास्त आहेत. म्हणुन मी ते सर्व दुवे काढले. तुम्हाला नवीन लेख चालु करावयचा असेल तर ह्या "महाराष्ट्रातील राज्यस्तरीय महामार्गांची यादी" पाना पासुन सुरवात करा. अथवा काही मदत लगल्यास मला कळवा. मी नेहमी तथपर आहे मदती साठी :) --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०४:०७, २३ फेब्रुवारी २०११ (UTC)

गौरव

भूगोल बार्नस्टार
मंदार कुलकर्णी, मराठी विकिपीडियावर केलेल्या भूगोलविषयक महत्त्वपूर्ण योगदानाची कदर म्हणून मराठी विकिपीडियाच्या वतीने तुम्हांला हा गौरव प्रदान करण्यात येत आहे.


अभय नातू ०४:३७, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)


मनापासून धन्यवाद !!! मंदार कुलकर्णी

शुभेच्छा

नमस्कार,Mvkulkarni23,

मराठी भाषादिनी संपादने करून उत्साहाने सहभाग नोंदवलात,आपल्याबरोबरीने धावणारे संपादनपटु भेटोत, आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो हि शुभेच्छा.माहितगार १९:४९, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

कौरव

मंदार,

कौरवांची यादी कोठून मिळवली? आत्तापर्यंत मी ही कोठेच पाहिली नव्हती! या प्रत्येक कौरवाबद्दल एक-दोन वाक्यांत माहिती उपलब्ध आहे का?

अभय नातू १८:११, ७ मार्च २०११ (UTC)


दादा, आता सगळा नीटच करायचं म्हंटल्यावर.... सध्या माझ्याकडे संस्कृत - मराठी चे दोन अनुवादक तसेच ब्रिटानियाचे विश्वकोशाचे सगळे खंड आले आहेत. त्याच्यात मला बरीच माहिती मिळाली. तरी सगळ्या कौरवांची माहिती जशी मिळेल तशी भरत जाईन...... मंदार कुलकर्णी

प्र.के.घाणेकर

’किल्ली पाहूया’ हे अशुद्ध मराठी आहे. काही संयुक्त क्रियापदांमध्ये ’या’ व ’द्या’ ही साहाय्यक क्रियापदे निरर्थक क्रियापदे म्हणून येतात. संयुक्त क्रियापदे तोडून लिहायची असल्याने जाऊ या, निघू या, करू द्या, पाहू द्या इत्यादी जोडशब्द तोडून लिहावेत, असा व्याकरणाचा नियम आहे. पुस्तकाचा मथळा मुखपृष्ठ बनवणार्‍या चित्रकाराने केलेला असतो, तो व्याकरणशुद्ध असेलच असे नाही. २. व्याख्याता किंवा अधिव्याख्याता म्हणजे लेक्चरर. जो माणूस विभागप्रमुख असेल तो अगदी प्रपाठक(रीडर)नसला तरी निदान प्राध्यापक असलाच पाहिजे. लेक्चररला कोणी विभागप्रमुख करत नाहीत. ३. जिन्सीवाले बरोबरच आहे. लेखात जीन्सिवाले होते, न्सि दीर्घ करताना गडबडीत जी र्‍हस्व करायचा राह्यला. वेळ मिळाला की तोही करीन. ३. पुरस्कार म्हणजे अनेकदा पारितोषिक. पुस्तकात पुरस्कार शब्द वापरलाही असेल, पण लेखात जी यादी दिली आहे तीत सर्व पुरस्कार नाहीत, म्हणून मानसन्मान आणि पुरस्कार अशी सुधारणा केली.

लेखातल्या किरकोळ त्रुटी दाखवल्या म्हणून नाउमेद व्हायचे कारण नाही, लेख एकूण चांगलाच आहे, असेच जोरदार लिखाण करीत राहाल अशी आशा आहे.---J ११:५२, १८ मार्च २०११ (UTC)

डॅशचे चिन्ह टाळावे

विकिपीडियावर ---- हे डॅशचे चिन्ह वापरणे सहसा टाळावे त्या एवजी ..........टिंब चिन्हाचा वापर करावा माहितगार १८:५२, २४ मार्च २०११ (UTC)

तिथी, सणवार

मंदार, सहसा तिथी आणि तिथिनुसार साजरे केले जाणारे सणवार एकाच लेखात असावेत. त्यात्या तिथिलेखात या तिथीला साजरे केले जाणारे सण असे शीर्षक देउन त्याखाली त्या तिथीच्या सगळ्या सणवारांचे वर्णन (लागल्यास उपशीर्षकांखाली) करावे.

याला अपवाद म्हणजे "मोठे" सण, जसे दिवाळी, गुढीपाडवा, इ. या सणांना त्यांचे लेख असण्यास हरकत नाही. असे केल्यास त्या तिथीलेखात त्याचा उल्लेख करुन तेथे दुवा आणि दोन-तीन वाक्यात माहिती लिहावी किंवा सरळ तिथीला सणाकडे पुनर्निर्देशित करावे. पुनर्निर्देशन केल्यात सणाचे पान त्या महिन्यात वर्गीकृत करण्यास विसरू नये.

अभय नातू १८:३९, २९ मार्च २०११ (UTC)

आभार. मला एखादे उदाहरण देऊन सांगू शकाल काय? ..... मंदार कुलकर्णी

श्रावण अमावास्या / पोळा

अभय नातू १९:००, २९ मार्च २०११ (UTC)

अंतिम सामना

अंतिम सामन्याची माहिती खुप चांगली आहे व नक्कीच लेखात भरता येईल. परंतु संदर्भांची गरज काही ठीकाणी आहे.

  • मैदानातील नारे
  • सचिनचा कोहलीला सल्ला
  • चिडीचा डाव.

तुम्ही जो अंतिम सामन्याचा अहवाल लिहीला आहे तो खुप सुंदर झाला आहे, त्या बद्दल तुमचे अभिनंदन.

Maihudon १७:१९, ४ एप्रिल २०११ (UTC)

सगळ्यात कमी बदल असलेले लेख

नमस्कार ! खालीलपैकी एखादा मार्ग प्रत्येक केशीगणिक वापरावा लागेल :

  1. जर ते लेख चुकून रोमन लिपीत किंवा इंग्लिश नावाने बनवले गेले असतील, व त्यांसाठी संबंधित मराठी लेख अगोदरपासून अस्तित्वात असतील, तर तसे लेख उडवायला हवेत.
  2. जर तसे लेख रोमन लिपीत असतील व कुठल्याश्या इंग्लिश संज्ञेचे लघुरूप, आद्याक्षरी नाव असतील, तर त्या विषयाचे संबंधित मराठी लेख बनवून, मग ही रोमन आद्याक्षरी नावे/लघुरूपे पुनर्निर्देशन म्हणून ठेवावीत.
  3. जर एखादी केस संदिग्ध असेल, तर चर्चापानावर किंवा चावडीवर चर्चा घडवून आणावी.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:०९, २३ मे २०११ (UTC)

पुस्तकांबद्दलचे बदल पहावे.

  1. सांगाती सह्याद्रीचा
  2. डोंगरयात्रा
  3. दुर्गदर्शन
  4. दुर्गभ्रमणगाथा
  5. दुर्गकथा

व आपले बहुमोल मार्गदर्शन द्यावे.

Dr.sachin23 १६:११, २४ मे २०११ (UTC)

छान. आवडले. सह्याद्री बुक्स ची साईट माझ्या मित्राचीच आहे.... अजून बरीच माहिती भरायची आहे. वेळ झाला कि आपण भरूच. तुझा इमेल कळवशील.....
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
मंदार कुलकर्णी १८:२०, २४ मे २०११ (UTC)

व्यक्तिगत दृष्टिकोन

मंदार,

येथील लेखांत अधूनमधून तुझे (सुंदर असेच) ललितलेखन डोकावते. शक्यतो ते टाळावे. तसेच प्रथम पुरुषी उल्लेख ही (मी, माझे, मला, इ.) टाळावे.

अभय नातू १९:१२, २८ मे २०११ (UTC)

जमल्यास पहावे

नमस्कार मंदार,

दुरचित्र वाहिनीन वरील मालीकेंच्या माहिती साठी साचा बनून देतायेईल का ? जमल्यास पहावे.

धन्यवाद

राहुल देशमुख १०:०९, १२ जून २०११ (UTC)

नमस्कार. कल्पना चांगली आहे. मी पण सध्या साचा दुरुस्ती या प्रकारात झगडतो आहे पण जमेल असे वाटते. तुम्ही जर माहितीचे कोणते रकाने हवे आहेत किंवा काय सुधारणा अपेक्षित आहेत, हे सांगितले तर मी तसे घालून देईन.....मंदार कुलकर्णी १०:१८, १२ जून २०११ (UTC)


मंदार त्वरित प्रतिसादाबद्दल धन्यवाद ...!

मी दुरचित्र वाहिनीन वरील मालीकेंच्या माहिती साचासाठी खालील माहितीचे रकाने देत आहोत. (आपण गरजेनुसार काही अनिवार्य रकाने (जसे की चित्र आकारमान आदी.) सांभाळून घ्याल असे अपेक्षित)

  1. मालिकेचे नाव
  2. चित्र
  3. चित्र माहिती
  4. दुरचित्र वाहिनी

.

  1. देश
  2. भाषा
  3. प्रकार

.

  1. प्रसारण कालावधी
  2. प्रक्षेपण सुरु झाले तो दि.
  3. प्रक्षेपण संपले तो दि.
  4. एकूण भाग

.

  1. निर्माता
  2. दिग्दर्शक
  3. प्रमुख भूमिका
  4. सूत्रधार

.

  1. लेखक
  2. शीर्षक गीत
  3. शीर्षक गीत गीतकार
  4. शीर्षक गीत संगीतकार
  5. शीर्षक गीत गायक

.

  1. उत्तरार्ध

ह्या शिवाय आपणास योग्य वाटल्यास अधिक काही रकाने आपण वाढवावीत.

राहुल देशमुख ११:३१, १२ जून २०११ (UTC)


तपासून पहा

  • नमस्कार मंदार,
थोडा वेळ मिळाला तर मी "साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी मालिका" बनवला आहे. आपणासही वेळ मिळाला तर तपासून पहा आणि अभिप्राय कळवा.
धन्यवाद
राहुल देशमुख ०७:१४, १९ जून २०११ (UTC)
मस्त झाला आहे. मधल्या काळात मला वेळ झाला नाही. ह्या साच्याचा वापर कधी सुरु करणार? ....मंदार कुलकर्णी ११:२७, २४ जुलै २०११ (UTC)
  • नमस्कार मंदार,
साच्याचा वापर सुरु केला आहे काही लेख लिहिले आहेत जसे हमलोग. पण मध्यंतरी मी चावडीचा चेहरा बदलवणे आणि नवीन चावडी "ध्येय आणि धोरणे" प्रस्थापित करण्याच्या कमी व्यस्त असल्याने थोडे मागे पडले. आताही नवीन चावडी सभासदांच्या अंगवळणी पडे पर्यंत थोडी मेहनत घ्यावी लागते आहे. एकदा धोरणे म्हणजे काही नियम बनवायची आपल्याला सवय झाली कि मग नेहेमी नेहेमी तेच तेच प्रश्न उद्भवणार नाही आसे वाटते. परकीय भाषेतील नवे मराठीत कशी लिहावी ह्यावर सध्या काम सुरु आहे आपण पण ह्यात योगदान करावे चर्चा चागलीच रंगत चाललेली आहे पाहू काही फळले तर. धन्यवाद. राहुल देशमुख १२:४०, २४ जुलै २०११ (UTC)

माहितीचौकट हिंदुस्तानी गायक

अभिनंदन मंदार ! :)

ह्या साच्यात साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ साच्यात वापरल्याप्रमाणे अजून दोन पॅरामीटर वापरता येतील काय ? १. कार्यसंस्था (म्हणजे जिथे शिकवले/नोकरी केली, ती) २. प्रशिक्षण_संस्था (जिथे शिकले ती संस्था).

हे दोन पॅरामीटर ज्या लोकांचे संगीतशिक्षण शांतिनिकेतन किंवा तत्सम विद्यालयांमध्ये झाले आहे किंवा ज्यांनी तेथे अध्यापन केले आहे, त्यांसाठी उपयोगी पडेल. खेरीज हाच साचा हिंदुस्तानी वादक म्हणून वापरायचा असेल (पुनर्निर्देशन ठेवता येईल), तर त्यांत वाद्यांच्या अनुषंगानेही पॅरामीटर वाढवता येतील.

बादवे, माझ्याइकडे आता बरीच रात्र झाली असल्यामुळे मी हा साचा उद्या तपासून चाचणी म्हणून वापरून बघतो; आणि तुला कळवतो.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२५, १४ जून २०११ (UTC)

ओके वाटत आहे. सांगकाम्या लावून उद्या बदल करतो.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५७, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

विकिपीडिया:नाहुआतलकरिता आध्वव

विकिपीडिया:नाहुआतलकरिता आध्वव या पानावर काही काम सदस्य परांजपेंजींचे काही काम चालू आहे दिसते कदाचित तुमच्या अलिकडील चर्चेत असलेल्या विषयाच्या अनुषंगाने काही लेखन दिसले म्हणून तुमचे लक्ष वेधावे असे वाटले माहितगार २०:१३, १४ जून २०११ (UTC)
चावडी ध्येय आणि धोरणे - निमंत्रण
नमस्कार, Mvkulkarni23


चावडी ध्येय आणि धोरणेवर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरू आहे. ज्येष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे निर्देश आपल्या लेखाद्वारे चावडीवर मांडले आहेत. आम्ही आपणास सदर चर्चेत, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहोत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चावडी ध्येय आणि धोरणेवर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कामी अमूल्य योगदान करावे ही विनंती. धन्यवाद !

राहुल देशमुख १८:०५, १८ जुलै २०११ (UTC)
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.


मराठी विपीवर अपलोड करण्या ऐवजी कॉमन्स

नमस्कार मंदार,

मी आपण सांगितल्या प्रमाणे कॉमन्सवर चित्रे चढवणे सुरु केले आहे. तेथे चढवणे थोडे कटकटीचे आहे पण असो सर्वांनाच त्याचा फायदा होत असेल तर थोडा त्रास सहन करायला काय हरकत आहे. सुचने बद्दल धन्यवाद राहुल देशमुख १६:४५, १९ जुलै २०११ (UTC)

  • मंदार, कुठल्याही प्रकारची प्रताधिकारित चित्रे कॉमन्सावर चढवता येत नाहीत; कारण तुम्हांला चित्रे चढवताना त्या चित्रांचे प्रताधिकारमुक्ततेविषयीचे प्रतिज्ञापत्र सादर करून योग्य त्या परवान्यांतर्गत चित्र प्रताधिकारमुक्त म्हणून जाहीर करावे लागते. कंपन्यांच्या लोगोंवर किंवा अन्य प्रताधिकारित चित्रांवर आपल्याकडे कायद्यान्वये प्रताधिकार नसल्यास, तसे करणे बेकायदेशीर आणि म्हणून शिक्षापात्र ठरते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:५२, २० जुलै २०११ (UTC)

संकल्प, प्रताधिकारित चित्रे कॉमन्सावर चढवता येत नाहीत हे मला माहित आहे पण म्हणून हि चित्रे फक्त मराठी वर चढवून नियमाचे उल्लंघन करीत नाही का? कर चित्र प्रताधिकार मुक्त नसेल तर विकिपीडिया वर कुठेच ते चढवता कामा नये. असे माझे मत आहे. राहुल या संदर्भात काळजी घेत असतीलच.... मंदार कुलकर्णी ११:३१, २४ जुलै २०११ (UTC)
  • मंदार आणि संकल्प नमस्कार,

जसे कि मी म्हटले होते कॉमन्सवर चित्रे चढवणे कटकटीचे आहे. आता त्यांच्या बॉटनि प्रश्नांचा सपाटा लावलाय आणि ७ दिवसांनी चित्रे काढण्याची नोटीस दिली आहे. हि चीत्रे इतरही अनेक विपी वापरतात जसे जीमेल चा लोगो २७३ विपी प्रकल्पावर वापरला आहे आणि तत्सम भूतौशी सर्वच गुगलचे लोगो शेकडो वेगवेगळ्या भाषांन मधील विपी वर वापरात आहे पण कॉमन्सवर नाहीत. आता पुढे काय करायचे ....? मराठी विपी वर चढवून काम भागवायचे किंवा कसे? राहुल देशमुख ०२:३३, २१ जुलै २०११ (UTC)


धन्यवाद

>>>>राहुल, तुम्ही करत असलेल्या कष्टाबद्दल तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. मराठी विकिपीडियाला आपणा सारख्यांची (झपाट्याने काम करणारे) खूप गरज आहे ज्यामुळेच आपण सध्या या टप्यावर आलो आहोत. मला येथे एक सुचवावेसे वाटते. माझ्या माहितीप्रमाणे आपण केलेल्या संपादनांपैकी काही संपादने ही "सांगकाम्याच्या" मदतीने करता येऊ शकतात का ते पाहावे. संकल्प कडे ती जादू आहे ज्याद्वारे तो चुटकी सरशी काही कामे करू शकतो. संकल्प, तुझे काय मत आहे यावर?..... मंदार कुलकर्णी १६:५६, ३० जुलै २०११ (UTC)

मंदार, अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मी केलेल्या संपादनातील ३०% कामे हि संकाम्या करवी करता येउशाकली असती, पण खूप गार्बेज होता आणि असामान्य परिस्थिती होती तो साफ करायला बराच त्रास गेला. राहुल देशमुख १८:१५, ३० जुलै २०११ (UTC)

पंचाग

मंदार, तुम्ही पंचागाव्रर काम करत असलेल देसते पण लेखात खूप ज्यास्त साचे होत आहेत असे नाही वाटत. गरज नसलेले साचे कमी करावेत असे वाटते. काल निनादला पण मी आणि संकल्पनी असेच सुचवले. (गीच्याडी नको - संकल्प ). तिकडे नार्सिकार्जी पंचांगात दिनविशेष भरण्याचा सपाटा लावतात आहे. मला असे वाटते कि आपण दिनविशेष लेखात भरण्यापेक्षा साच्यात भरावे म्हणजे त्याचा अनेक ठिकाणी वापर करणे सोपे होईल. करिता अद्यावत बिकट साचा बनवण्या बाबत मी विचार करतो आहे, जेणे करून फक्त तिथी दिले कि दिनविशेष दिसावयास हवे. आपल्या काही कल्पना अथवा सूचना असल्यास जरूर कळवा राहुल देशमुख १८:३३, ३० जुलै २०११ (UTC)

राहुल, मलाही तसेच वाटत होते पण आधीच्या काही लेखांमध्ये तसे/तेवढे साचे होते म्हणून मी उरलेल्या/ नवीन लेखात तसेच ठेवले. संकल्पशी बोलून जास्तीचे "सांगकाम्या" तर्फे काढून टाकता येतील... मंदार कुलकर्णी १८:३७, ३० जुलै २०११ (UTC)


डेटा गृपिंग

मंदार,

मी दिनविशेष चा डेटा जवळ जवळ ३०० दिवस , १२ महिने एकाच यंत्रणे द्वारे महिन्या वारी अथवा दिवस वारी अथवा महिना आणि दिवसवरी दिसेल अशा आशयाचे उपाय बनवावे असा विचार करतो आहे.

डेटा गृपिंग आणि सॉर्टिग करण्या साठी काही पद्धत विकिपिडीयावर माहित आहे का (मिडियाविकी चे जसे DPL जे विकिपीडिया सपोर्ट करत नाही सारखे.) छोट्या डेटाला तर पार्सर ने नियंत्रित करता येतो पण मोठा कसा हाताळायचा? काही कल्पना असल्यास सांगावे. राहुल देशमुख ०९:५०, ३१ जुलै २०११ (UTC)

व्हारच्युअलायझेषण

मंदार नमस्कार,

मराठी तिथीन वर आपण नेमके काय काम करीत आहात ते जर मला कळले तर त्याच्या बहुआयामी आभासाची (व्हारच्युअलायझेषण) ची योजना मी आखतो आहे. त्या करिता मदत होईल आणि (हिंदू धर्म) आणि इतरही अनेक प्रकल्पांना त्याचा थेट फायदा/वापर घेता येईल. केळ्वावे. राहुल देशमुख ०६:०७, २ ऑगस्ट २०११ (UTC)

Rahul,
I am not doing any specific task on Marathi Tithi. Just wanted to create the required pages and possible information. That's all. I can support your work of vertualisation once I get the idea and details what you are exactly doing. My vision is that we get some information about our festivals and marathi tithi either in Panchang/ kalnirnaya / Bhaktimarg pradip. We and our next generation should get all this information on Wikipedia and also understand the real meaning/ cause of doing it.... मंदार कुलकर्णी ०८:५०, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

सूची लेखांमध्ये इ.स.

नमस्कार मंदार ! पद्मश्री पुरस्कार विजेते १९५४-१९५९ या लेखातील सूचीत इ.स. टाकल्याचे पाहिले. या कामासाठी खरे तर तुम्ही स्वतः कष्ट करायची गरज नाही. सांगाकाम्या लावून हे काम करता येईल. कोणत्या सूचीपर लेखांमध्ये सुधारणा करायच्यात, ते कळवल्यास त्याप्रमाणे काम करता येईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५६, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

संकल्प, मी काही हे काम हातांनी करत नाही. सगळा मजकूर वर्ड मध्ये कॉपी करून Find and Replace करतो. त्यामुळे फार कष्ट पडले नाहीत. त्यातून पद्मश्री पुरस्कार विजेते/ पुरस्कार विजेते च्या बाकीच्या लेखात सांगकाम्या लावून हि कामे करून घेता येतील.मंदार कुलकर्णी ०६:२२, ७ ऑगस्ट २०११ (UTC)

WikiConference_India_2011

WikiConference_India_2011 मध्ये आपण काही कमिटी मध्ये आहात तरी अधिक माहिती चावडीवर टाकावी व मराठी विपी बद्दल WikiConference_India_2011 मध्ये काय असणार आहे हे सामान्यांना समजण्याकरिता विषद करावे. सचिन १६:५३, ६ ऑगस्ट २०११ (UTC)

अजून म्हणावे तसे जोरात काम सुरु झालेले नाही. काही माहिती मिळाली कि नक्कीच टाकीन. मराठी विपी बद्दल एक स्लॉट मी WikiConference_India_2011 मध्ये मागितला आहे. भाषण इंग्लिश मधून असेल पण ते मराठी विपी बद्दल. या बद्दल तुमच्या काही सूचना असल्यास अवश्य कळवा......मंदार कुलकर्णी ०७:२६, ७ ऑगस्ट २०११ (UTC)

वर्गीकरण

नमस्कार मंदार !

श्रीनिवास खळेयशवंत देव या लेखांत तुम्ही माहिती भरताना वर्गीकरणाची ओळ वर ठेवल्याचे दिसले. विकिपीडियावरील संपादन-संकेतांनुसार वर्गीकरण लेखाच्या वाचनीय मजकुराच्या शेवटी (पण आंतरविकी दुव्यांच्या वरती) लिहिणे अपेक्षित आहे. अधिक तपशिलांसाठी सहाय्य:वर्ग येथील वर्गीकरणाचे संकेत हा उपविभाग पाहावा. कृपया त्यानुसार दुरुस्ती करावी, ही विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:४६, ७ ऑगस्ट २०११ (UTC)

धन्यवाद; पण तरीही संपादनात राहून गेलेल्या काही चुका लक्षात आणून देतो :
  1. यशवंत देव लेखात वर्गःसंगीतकारCategory:संगीतकार असे त्याच त्या वर्गात दोन वेळा वर्गीकरण झाले आहे. ते चूक आहे. खेरीज वर्गीकरण नेमके हवे. त्यामुळे त्या लेखात केवळ वर्ग:मराठी संगीतकार असे एकमेव वर्गीकरण केले, तर ते योग्य ठरेल.
  2. श्रीनिवास खळे या लेखात वर्गःसंगीतकारवर्गःमराठी संगीतकार अशी दोन वर्गीकरणे दिसत आहेत. तिथेही वर्गीकरणाच्या नेमकेपणाच्या संकेताला अनुसरून वर्गःसंगीतकार हे वर्गीकरण वगळावे. म्हणजे वर्ग:मराठी संगीतकार असे एकमेव वर्गीकरण शिल्लक राहील.. व ते योग्य ठरेल.
तुम्हांला तसदी देतोय, त्याबद्दल क्षमस्व. पण तुम्ही अनुभवी संपादक आहात; तुमच्या संपादन-अनुभवात वर्गीकरणाच्या पैलूत उणीव राहू नये व योग्य वर्गीकरण-संकेतांचा आपल्या संपादनांमध्ये वापर व्हावा, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपण सुज्ञ आहातच; त्यामुळे या संदेशप्रपंचाचा राग मानणार नाहीत अशी खात्री आहे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:०४, ७ ऑगस्ट २०११ (UTC)

वर्ग

मंदार, तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांविषयी माहिती :

  1. उदा. "वर्ग:इ.स. २००६ मधील मराठी चित्रपट" असा एक वर्ग आहे आणि माझ्याकडे ५० चित्रपटांची यादी आहे तर ते त्या वर्गात कसे चढवायचे? त्या साठी प्रत्येक वेळी नवीन लेख बनवून त्यातच नाव टाकावे लागते का?

>> आधी वर्गात विद्यार्थी भरून मग त्यांच्यावर संस्कार करता येतील का? << नाही. लेखामध्ये वर्गीकरणाची ओळ टाकायची असते. वर्गात लेख टाकत नाहीत.

प्रत्येक लेखात तुम्हांला संबंधित वर्गीकरण करावे लागेल व त्या विवक्षित वर्गाचे पान बनवावे लागेल. खेरीज साचा:माहितीचौकट चित्रपट या साच्यात तुम्ही वर्ष व भाषा यांची नावे लिहिली, तर आपोआप संबंधित लेखात वर्गीकरण करण्याची सुविधा आहे.

राहता राहिला पन्नास-बिन्नास लेखांचा मुद्दा. चावडीवर मी नुकत्याच लिहिलेल्या अभ्यास-पाहणीनुसार मराठी विकिपीडियावर दर सक्रिय सदस्याच्या शिरावर १२५०+ लेखांचा बोजा आहे. त्यामुळे एकदम पन्नास लेखांसाठी सांगाडा-लेख बनवून आकडा (आणि बोजा) वाढेल, अश्या पद्धतीने काम करण्यापेक्षा विकिप्रकल्प सुरू करा. त्यात तुम्हांला भरायच्या ५० चित्रपटविषयक लेखांची सूची तुमच्या सदस्यपानावर/उपपानावर/प्रकल्पपानावर लिहून ठेवा. आणि एकेक लेख जरा बाळसेदार पद्धतीने (म्हणजे किमान एखादा परिच्छेद) लिहून मग चढवा. तुमची आजवरची कार्यपद्धती पाहता, तुम्हांला घसघशीत संपादने करणे अधिक रुचत असावे, अशी माझी अटकळ आहे. त्यामुळे माझी ही अवांतर सूचना तुमच्या कार्यपद्धतीला पूरकच ठरेल.

>> # एखाद्या व्यक्तीच्या लेखात अनेक वर्ग येऊ शकतात. त्याला कोणकोणते वर्ग योग्य होतील ते कसे शोधायचे? एकूण वर्गांची संख्या इतकी जास्त आहे की त्यातून योग्य वर्ग शोधून काढणे अवघड वाटते. <<

दुर्दैवाने याचे साधे-सरळ उत्तर सध्यातरी उपलब्ध नाही. वर्ग:आशय येथून सुरू होणारा वर्गवॄक्ष ब्राउझ करून हिंडून-फिरून तुम्हांला दिग्दर्शन मिळत जाईल. खेरीज त्या विषयाशी संबंधित लेख उपलब्ध असल्यास, त्यांचे वर्गीकरण कसे केले आहे, ते न्याहाळूनही बर्‍याच गोष्टी उमगतील. सध्या मराठी विकिपीडियावर विकिप्रकल्प फारसे रुजले नसल्यामुळे ही अडचण होत आहे. एकदा विकिप्रकल्प रुजले, की त्या त्या विकिप्रकल्पावर उपयुत वर्गांची सूची नोंदवून ठेवता येईल व हे काम अधिक सुसूत्र होईल.

>> # एकूण वर्गांपैकी जवळ जवळ ८०० वर्ग इंग्लिश नावाने आहेत. ते मराठी विकिपीडिया मधून काढायला हवेत ना? << खरे आहे. परंतु हात थोडे, कामे फार अशी परिस्थिती असल्यामुळे याबाबत अजूनही काम करायला वाव आहे. यातील काही कामे सांगकाम्याने करता येतील आणि आपली बँडविड्थ वाचू शकेल. तुम्हांला अशी काही कामे आढळल्यास जरूर कळवा; सांगकाम्या लावून ती कामे करून टाकू.

>> # "वर्गवॄक्षात जोडावयाचे राहिलेले लेख" आणि "न वापरलेले वर्ग" या विभागावर मला काम करायचे असेल तर काय काय करायला लागेल? << अवर्गीकृत लेखांसाठी योग्य ते वर्ग शोधून किंवा नवीन बनवून वर्गीकरण करावे लागेल. शिवाय न वापरलेले वर्ग वगळून टाकण्याजोगे असतील, तर पानकाढा साचा लावून ते वगळण्याचा अर्ज करून ठेवता येईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०७:३७, ७ ऑगस्ट २०११ (UTC)

  • संकल्प,
सद्या स्थितीत लेख लिहिला कि त्यावर विस्तार विनंती साचा लावणे हा सर्व संपादकाच्या लेखनाचा अविभाज्य घटक झाला आहे. ह्या साच्या मूळे सदर लेख विस्तार वर्गातही वळता होतो पण बरोबरच लेखाच्या तळाशी वर्ग यादीत पण नोंद दाखवतो. बरेचदा वर्ग अधिक असले तर तो अडचणीचा पण वाटतो. मला असे वाटते कि विस्तार वर्ग हा हिडन करावा जेणे करून ह्या यादीत त्याचे दर्शन होणार नाही आणि वर्गीकरण जरूर होईल. राहुल देशमुख १०:४९, ७ ऑगस्ट २०११ (UTC)

चित्रांचे वर्गीकरण

मंदार,

तुझा प्रश्न नेमका काय होता हे माझ्या अजून लक्षात आलेले नाही, माझ्या समजूतीप्रमाणेच्या प्रश्नाचे उत्तर --

चित्रांचे वर्गीकरण लेखांपेक्षा वेगळे सुद्धा होऊ शकते. लेखाचे सगळे वर्ग चित्राला लागू पडतीलच असे नाही.

प्रश्न वेगळाच असला तर परत एकदा विचारशील.

अभय नातू १७:१६, ९ ऑगस्ट २०११ (UTC)

My understanding is that, once these are linked to the article, it should not be seen in the tab "अवर्गीकृत चित्रे". Am I made it clear now?
Images can be categorized by themselves. Having said that, I did not find any differences between an uncategorized image (LIC Logo.svg) and a categorized image (Aambadi.jpg) relevant to categorization, so I'm not sure where the "uncategorized" tag is coming from. A bit of looking/research is neede.
अभय नातू २३:५४, १० ऑगस्ट २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011


Hi Mvkulkarni23,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

अजय सरपोतदार आणि प्रतधिकारभंग

नमस्कार मंदार !

विकिपीडियाच्या धोरणांनुसार येथील मजकूर अमुक्त व प्रतधिकार-रहित असणे अभिप्रेत आहे. मात्र अजय सरपोतदार या लेखातील काही मजकूर सकाळ वृत्तपत्राच्या बातमीतून जसाच्या तसा कॉपीपेस्ट केल्याचा संशय वाटतो. त्यामुळे तेथे साचा:कॉपीपेस्ट चिकटवून सूचना लावली आहे. तसे असल्यास, ते प्रतधिकारभंगाचे प्रकरण ठरू शकते व विकिपीडियाच्या धोरणांनुसार त्यात संपादनसंस्कार करून ते पुन्हा स्वतंत्रपणे लिहावे लागेल किंवा वगळावे तरी लागेल.

सदर मजकूर तुम्ही संपादला असल्यामुळे तुम्ही याचे पुनर्लेखन करून प्रताधिकारभंग टाळावा, अशी विनंती. जर तसे करणे आपल्याला काही कारणास्तव शक्य होणार नसेल, तर तो मजकूर वगळण्याविषयी कळवावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:५७, १२ ऑगस्ट २०११ (UTC)

माझे त्या लेखावर अजून काम चालू आहे. सुरुवातीला मी सकाळ चा मजकूर घेतला असला तरी त्यात अजून बरीच माहिती भरायची राहिली आहे. मी आता तात्पुरते पुनर्लेखन केले आहे पण संपूर्ण लेख लिहून होईपर्यंत तो लेख निश्तितच प्रताधिकारमुक्त असेल. मंदार कुलकर्णी १८:०७, १२ ऑगस्ट २०११ (UTC)
अजून एक उपसूचना : मजकूर लिहिताना मराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार प्रमाण पद्धतीने लेखन करावे, बोली ढंगातील - म्हणजे "इंग्लंडमध्ये उपायुक्त म्हणून पाठवलं" अशी अप्रमाण/बोली रूपे टाळून "इंग्लंडमध्ये उपायुक्त म्हणून पाठवले" असे प्रमाण लेखन करावे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १८:२१, १२ ऑगस्ट २०११ (UTC)


दिनविशेष

मंदारराव, आदेश वैगरे काय म्हणता ? पण हो आपला सहयोग मात्र जरूर हवा. मागे आपण आपली दिनविशेष बाबतचे विचार मला लिहिले होते आणि माझ्या कल्पनेची विचारणा पण केली होती. आपणास त्या निमित्याने दिनविशेष मला अपेक्षित असलेला मांडतो त्यावर आपण आणि इतरांनी पण सुचवावे जेणेकरून अंतिम ढाचा ठरवता येईल.

  1. दिनविशेष ची माहिती एकाच ठिकाणी भरावी (भरणे, सांभाळणे, वाढवणे सोपे होईल )
  2. हि माहिती हवे तिथे साच्यातून वापरता यावी (माहितचा वापर वाढेल, वापर कर्त्याला माहिती वापरणे सोपे होईल)
  • मराठी दिनविशेषचे वेगळे पण आणि आव्हाने
  1. हे सिस्टम टाईमशी रिलेटेड नसणार (मराठी तिथी आणि इंग्रजी तारखा ह्यात समन्वय नसल्याने हे शक्य नाही)
  2. ह्यात तारखे बरोबरच पक्ष (कृष्ण/शुद्ध) असणार (म्हणजे १५ तिथी आणि दोन पक्ष)
  3. तेव्हा केवळ स्ट्याटिक पाने नबनवता अशा आशयाने माहिती भरण्याचे विचाराधीन आहे कि ज्यामुळे डायण्यामिकली माहिती वेगवेगळ्या तर्हेने सामन्य सदस्याला वापरता यावी.
  4. उदा.
    1. जसे साच्यात महिना, तिथी आणि जयंती असे दिले तर त्या संबधीची माहिती
    2. फक्त महिना आणि जयंती , पुण्यतिथी दिले तर संपूर्ण महिन्यातील जयंत्या आणि पुण्यतिथ्याची माहिती
    3. महिना आणि तिथी दिली तर त्या दिवशीच्या जयंत्या , पुण्यतिथ्या, सण/व्रत आणि संकीर्ण माहिती.
  • थोडक्यात क़्युरि बेस रिपोर्ट रायटर सारखे काम करणारे तंत्र बनवावे आणि ह्या द्वारे मिळणारी माहिती पानात साचा नवाटता एकसंघ पानावर दाखवावी जेणे करून वाचकास ती त्या पानाचाच भाग आहे असे वाटावे असे मला ह्या ठिकाणी अपेक्षित आहे.

करिता मी तांत्रिक जबाबदारी पाहण्यास तयार आहे पण मराठी पंचांगहेही बरेच गुंतागुंतीचे आहे आणि त्याची दिनविशेष ची आणि सांगड घालणे हे सुरुवातीचे आपल्या समोरील आव्हाहन आहे. एकदा ढाचा कार्यान्वित झाला कि माहिती भारत राहणे हे सोपे काम आहे. आपल्या भरीव सहकार्याची आवशकता आणि आपण घेतलेल्या पुढाकारा बद्दल धन्यवाद. आपण आपल्या सूचना/विचार/कल्पना कळवा राहुल देशमुख ०६:०३, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०६:०५, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

दिनविशेष

सध्या मी काही दिवस व्यस्त आहे. कितपत वेळ मिळतो ते बघतो.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १४:०३, २१ ऑगस्ट २०११ (UTC)


हे पान संपादा ची परवानगी

मित्र मंडळी ट्रांसलेटविकिवर तुम्हाला $2 ची परवानगी नाही, खालील कारणांसाठी: + हे पान संपादा या दोन संदेशांच एकत्रिकरण होऊन तुम्हाला हे पान संपादा ची परवानगी नाही, खालील कारणासाठी: हे एकत्रित वाक्य बनत आहे. मित्रांनो ट्रांसलेटविकिवर मिडियाविकि संदेशांचे अनुवाद करणे आणि सुधारणा करणे या करिता प्रचालकपद असण्याची आवश्यकता नाही, अर्थात अनुवाद/संपादन करू देण्याची परवानगी मागण्याची फॉर्मॅलिटी आहे ती तिथेच करावी लागते. एकुण प्रोसेस लक्षात यावी म्ह्णजे आपल्या नंतरच्या सदस्यांना मार्गदर्शन करणे सोपे जाईल या दृष्टीने सदर दुरुस्ती स्वतः करण्याचे टाळतो आहे सध्याच्या नवीन संपादक फळी पैकी प्रत्येकाने ट्रांसलेट विकिवर पुढाकार घेऊन सध्याच्या अनुवादातील ५० -५० तरी संदेश तपासून आवश्यक तेथे सुधारणा कराव्यात हि विनंती माहितगार १८:४३, २९ ऑगस्ट २०११ (UTC)

आणखी काही बदल सुचवावे...

भारतरत्‍न मध्ये मी काही बदल केले आहेत. त्यात काही अजुन बदल सुचवावेत.

सचिन १६:०४, ८ सप्टेंबर २०११ (UTC)

याद्या च्या निमित्याने

मंदार, आपले म्हणणे योग्यच आहे. माझा याद्यांना विरोध नाही उलट याद्या बनवण्याचे काही सोपे तंत्र बनवण्याचा हि माझा विचार आहे ज्यामुळे टेबल बनवणे अक्षरवल्हे आदी सुविधा साचा मार्फत देतायेईल. सदस्याचा वेळ, मेहनत वाचेल आणि विपी वर सारखेपणा राखणे सोपे होईल. परंतु आपल्या कडे दीर्घ/अति दीर्घ लेख हे बहुतेक फारच कमी आहेत तेव्हा असलेल्या आजारी लेखांचा जिर्णोधार पहिले व्हावा आणि मग गरज भासल्यास वेगळे लेख बनवावे असे वाटते. नाहीतर एकना धड भराभर चिंध्या सारखे होऊ शकते. अर्थात विशिष्ठ/योग्य ठिकाणी तक्ते अथवा यादिरूपी लेख बाण्यास मुळीच हरकत नाही. हेच मत डिराईव्हड स्वरूपाचे लेखा बाबत पण लागु आहे. राहुल देशमुख १४:३६, १७ सप्टेंबर २०११ (UTC)


साचा हिंदुस्तानी गायक

मंदार, आपण बनवलेला साचा हिंदुस्तानी गायक हा काम करतो आहे काही त्रुटी मला जाणवलेल्या आपल्या माहिती साठी देत आहे आपणही तपासून पहाव्यात.

  1. जन्म नाव ह्या माहितीचे लेबल जन्म दाखवतो
  2. जन्म_स्थान, जन्म दिनांक ह्याचे लेबल दाखवतच नाही
  3. मृत्यू स्थान लेबल दाखवत नाही
  4. स्वाक्षरीशीर्षक_पर्याय, चित्रशीर्षक_पर्याय - चालले नाहीत (ह्याची खरच गरज आहे का ?)
  5. इतर सूचना
    1. साधारणतः चौकट_रुंदी वापरकर्त्याला मागण्या पेक्षा प्री प्रोग्राम असावी असे वाटते
    2. साचा बराच लांब असल्याने विषयनरूप गटवार विभाग पडल्यास वाचकास अधिक सोपे होईल

राहुल देशमुख १७:०३, १७ सप्टेंबर २०११ (UTC)

  • मंदार,
साच्यातील त्रुटी पूर्ततेसाठी काही मदत लागली तर सांगावी. राहुल देशमुख १३:०८, १८ सप्टेंबर २०११ (UTC)
  • मंदार,
मझ्या काही प्रश्नाची उत्तरे द्याल का ?
  1. जुना साचा कोणता आहे ते सांगावे - भारतीय शास्त्रीय गायक
  2. ह्या साच्यात दुरुस्त्या कराव्या कि नवीन साचा बनवला तरी चालेल ? - मी संकल्पचं सांगण्यानुसार हा नवीन साचा बनवला आहे सदस्य:Mvkulkarni23/माहितीचौकट हिंदुस्तानी गायक. अर्थात हा माझा पहिलाच प्रयत्न होता. तत्वतः त्याला तो मान्य आहे पण detailing आणि दुरुस्त्या करणे बाकी आहे.
  3. साच्याची रिक्वायरमेंट थोडी फाईनट्यून करावी का ? (काही बाबी टाळता येतील तर काही जोडता येतील) - अवश्य. पुढे जाऊ शकता.
  4. गटवार माहिती द्यावी असे वाटते आपण गट आणि त्यातील मथळे द्यावे - विचार चांगला आहे. sample पाहून अजून माझे मत देईन.
  5. साचा त्वरित बनवता येईल. - धन्यवाद
  6. साचा तयार झाला कि रिप्लेसमेंट चे सांगतो - नक्की सांगा
राहुल देशमुख १४:४८, १८ सप्टेंबर २०११ (UTC)

संकल्पचे मत पुढे देत आहे... याचा अवश्य विचार करावा. माहितीचौकट हिंदुस्तानी गायक

अभिनंदन मंदार ! :)

ह्या साच्यात साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ साच्यात वापरल्याप्रमाणे अजून दोन पॅरामीटर वापरता येतील काय ? १. कार्यसंस्था (म्हणजे जिथे शिकवले/नोकरी केली, ती) २. प्रशिक्षण_संस्था (जिथे शिकले ती संस्था).

हे दोन पॅरामीटर ज्या लोकांचे संगीतशिक्षण शांतिनिकेतन किंवा तत्सम विद्यालयांमध्ये झाले आहे किंवा ज्यांनी तेथे अध्यापन केले आहे, त्यांसाठी उपयोगी पडेल. खेरीज हाच साचा हिंदुस्तानी वादक म्हणून वापरायचा असेल (पुनर्निर्देशन ठेवता येईल), तर त्यांत वाद्यांच्या अनुषंगानेही पॅरामीटर वाढवता येतील.

बादवे, माझ्याइकडे आता बरीच रात्र झाली असल्यामुळे मी हा साचा उद्या तपासून चाचणी म्हणून वापरून बघतो; आणि तुला कळवतो.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२५, १४ जून २०११ (UTC)

अभिप्राय द्यावा

  • मंदार,
  1. साचा माहितीचौकट गायक नव्याने तयर केला, तपासला आणि वापरून पहिला आहे. भीमसेन जोशी लेख पहावा.
  2. नामांतरण करण्याचे कारण हा साचा शास्त्रीय तसेच अशास्त्रीय आणि हिंदुस्तानी तसेच विदेशी गायकान साठी वापरता येईल अशा तर्हेने बनवण्यात आला आहे.
  3. साचा वापराचे दस्तावेज आणि उदाहरणा दाखल केलेल्या पानाचा गोषवारा उपलब्ध केलेला आहे.
  4. सदर साचा बराच मोठा झाला आहे तरी उत्तम रीतीने काम करतो आहे.
  5. वाचनास सोपा जावा म्हणून त्यास ९ गटामध्ये विभागण्यात आले आहे.
  6. एकूण ४१ मथळे सद्या आहेत.
  7. आपल्या साच्यात ५-६ मथळे रिपीट होते तसेच काही अनावश्यक मथळे तूर्त वगळले आहेत.
  8. संकल्पचे मुद्देही समाविष्ट करण्यात आले आहे
काही बदल/सुधारणा लागले तर सुचवावे, साचा वापरतांना - त्यात माहिती भरावी आणि जुना साचा वगळावा. साच्याच्या वापरा साठी हार्दिक शुभेच्छा. आशा आहे की ह्यामुळे आपले काम सुकर होईल. राहुल देशमुख २०:१८, १८ सप्टेंबर २०११ (UTC)


Dear Rahul, zakkas....... Just touch base with Sankalp to avoid duplication stuff.... मंदार मंदार कुलकर्णी ०३:५५, १९ सप्टेंबर २०११ (UTC)
मंदार : लेखांमध्ये आधी जे साचे होते, त्यांच्या पॅरामीटरांना हुडकून त्याऐवजी माहितीचौकट गायक साच्यातले पॅरामीटर बदलले गेले आहेत. त्यामुळे हे भिन्नत्व दिसत आहे. मात्र त्यामुळे काही अडचण येऊ नये.. कारण सध्या दिसताहेत, ते मूळ साच्याचे उपसंच (सबसेट) आहेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५७, २६ सप्टेंबर २०११ (UTC)

विकी कॉन्फरन्स विषयी

आपले आमंत्रण मिळाले.धन्यवाद.
यापूर्वीच्या विकी कॉन्फरन्सला जे कोणी उपस्थित असतील त्यांचे अनुभव कळाल्यास किंवा वाचायला मिळाल्यास बरे होईल. असा प्रयत्न आपल्याला करता येईल काय ?
संतोष दहिवळ १६:३६, २४ सप्टेंबर २०११ (UTC)


चावडीवर विकिसंमेलन २०११ साठी माहिती/चर्चा पान

मंदार नमस्कार,

चावडीवर विकिसंमेलन २०११ साठी माहिती/चर्चा पान तयार झाले आहे. हे पान सदस्य संवाद सदस्यांशी संपर्क/जागरूकता/माहिती आणि कार्यक्रम पत्रिका तसेच प्रबंधन ह्यासाठी उपयुक्त ठरेल.

कळवे विकिसम्मेलन २०११ - मराठी विकिपीडिया ०५:२०, २६ सप्टेंबर २०११ (UTC)

गायकांविषयीचे लेख

नमस्कार मंदार !

नुकत्याच तू बनवलेल्या काही गायकविषयक लेखांमध्ये अनेक कोरे उपविभाग बनवून ठेवलेले दिसत आहेत. काही माहिती भरण्याजोगा मजकूर असेल, तरच स्वतंत्र उपविभाग बनवावेत; अन्यथा बनवू नयेत - कारण असे लेख वाचायला मिळाल्यावर मराठी विकिपीडिया कायमचाच अंडर-कन्स्ट्रक्शन असल्याची निरुत्साहकारक भावना दॄढावते. ती टाळायला हवी - कारण शेवटी हा सगळा खटाटोप ही माहिती कुणालातरी वाचायला मिळून त्याला/तिला नवीन काहीतरी उपयुक्त माहिती गवसल्याचे समाधान मिळवून देण्यासाठी आहे, हे कायम ध्यानात राखायला हवे.

बाकी, सध्या चांगला जोर चालू आहे असे दिसते... चालू राहू दे. :) माझे सध्या विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/चालू कामे‎ येथील लेखांवर काम चालू होते; आता हे काम बहुशः संपत आले आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:१९, २ ऑक्टोबर २०११ (UTC)

अजून एक छोटेसे निरीक्षण - व्यक्तिविषयक लेखात सर्व "इ.स. xxxx" दुव्यांना विकिदुव्यांचे चौकोनी कंस घालायची आवश्यकता नसते; किंबहुना व्यक्तीच्या जन्मदिनांक, मॄत्युदिनांक व अन्य काही विशेष महत्त्वाच्या दिनांकांतील इसवी सनांव्यक्तिरिक्त अन्य सनांना विकिदुवे घातल्यामुळे त्या इ.स. xxxx पानावरील डेड-लोड वाढते. डेड लोड म्हणजे, जर एखाद्या पानाशी जोडलेली पाने बॉट लावून/प्रत्यक्ष स्वतः धुंडाळली, तर जी अन्य पाने दुव्यांनी जोडलेली आढळतात, अशी पाने. करण एका इसवी सनात हजारो/लाखो लोकांच्या आयुष्यात लाखो घडामोडी घडत असतात. त्या सर्वांसाठी सर्व लेखांत सर्वत्र इसवी सनांचे विकिदुवे घातले, तर मराठी विकिपीडिया जसजसा वाढत जाईल, तसतसे हे डेडलोड अनेक पटींनी वाढत जाते. त्यामुळे वर नोंदवलेला संकेत सोयीचा ठरतो.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४५, २ ऑक्टोबर २०११ (UTC)


आदेश कसला

आदेश कसला? जर अगोदरच पुनर्निर्देशन होऊन ही पूर्ण नावाचे मथळे असलेली पाने अस्तित्वात आली नसतील तर हवी ती पुनर्निर्देशने जरूर व्हावीत. कृष्णराव फुलंब्रीकर हे मास्तर कृष्णराव आणि मास्टर कृष्णराव या तिन्ही नावाने माहीत आहेत. पहिली दोन नावे लेखात आली आहेत. तिसरे नव्हते, म्हणून पुनर्निर्देशन केले.

माझ्या मते पद्धत अशी असावी. मूळ पान प्रचलित नावाने असावे, आणि पुनर्निर्देशित पान कागदोपत्रित नोंद असलेल्या पूर्ण नावाने. म्हणजे पूर्ण नाव हाच मथळा असण्याचा विकीचा प्रघातही पाळला जाईल आणि प्रसिद्ध नावाने शोध घेतला तरी लेख सापडेल. म्हणजे संजीव कुमार हा लेख पुनार्निर्देशित करून हरी जरीवालाकडे नेणे, वगैरे. पण मूळ लेखच जर पूर्ण नावाने असेल तर नाईलाजाने तो प्रचलित नावाकडे वळवावा लागतो. मास्टर कृष्णराव, स्टॅलिन(मूळ मथळा जोसेफ स्तालिन) वगैरे लेखांच्या बाबतीत हेच झाले....J १५:३०, ३ ऑक्टोबर २०११ (UTC)

एडब्ल्यूबी

मंदार, नमस्कार.

आपण एडब्ल्यूबी्/बॉट बाबत शिकण्याची उत्सुकता दाखवली आहे. आपणास जशी उत्सुकता आहे तशीच मलाही सांगकाम्या ही काय भानगड आहे या उत्सुकतेतून मी वापरून पाहण्यास सुरूवात केली (अर्थात हे सगळे स्वयंअध्ययनच होते/आहे. अभय, संकल्प यांनी माझ्यावर विश्वास टाकून प्रयोग करून पाहण्याची संधी दिली म्हणूनच हे स्वयंअध्यन चालू आहे.) ही माझी सुरूवातच आहे मला वाटते १ टक्काच मला त्यातली माहिती झाली आहे. त्यामुळे मलाच पूर्ण माहिती नसल्याने सध्या तरी मी हे ज्ञान इतरांना देऊ शकेन असे वाटत नाही. पण आपणास माझ्यासारख्याच स्वयंअध्ययन करताना काही अडचणी आल्यास जरूर कळवा त्याला उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन. (तुम्हाला आलेली अडचण मला आली असेल तर) आशा आहे आपल्या अडचणी मला विचाराल. संतोष दहिवळ १७:३६, १३ ऑक्टोबर २०११ (UTC)

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


महाराष्ट्र मुख्यमंत्री‎‎

नमस्कार मंदार !

साचा :महाराष्ट्र मुख्यमंत्री‎‎ या साच्यात पूर्ण नावे दृश्यमान केल्याचे पाहिले. तसे पाहता, याबद्दल आपल्याकडे ठामठोक संकेत/मार्गदर्शक तत्त्व नाही. तरीही इंग्लिश विकिपीडियाप्रमाणे अध्यक्ष/पंतप्रधान/मुख्यमंत्री आदी लोकांच्या सूचीवरून मार्गक्रमण साचा बनवताना आडनावानुसार/रूढ नावानुसार दृश्यमान नाव ठेवतात. उदा. शरद पवार असे मुख्य लेखाचे नाव असले, तरीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविषयीच्या मार्गक्रमणात पवार असे लिहिणे अधिक आटोपशीर/काँपॅक्ट दिसते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०८:३१, २५ ऑक्टोबर २०११ (UTC)

साचा :महाराष्ट्र मुख्यमंत्री‎‎ या साच्यात पूर्ण नावे दृश्यमान करण्याची मला वाटलेली कारणे पुढील प्रमाणे:
१. पूर्वी पवार एकच होते. आता शरद पवार आणि अजित पवार असे दोन मोठे लोक आहेत.
२. अ. चव्हाण आणि पृ. चव्हाण या नावांपेक्षा अशोक चव्हाण · पृथ्वीराज चव्हाण ही दोन्ही नावे जास्त योग्य वाटतात.
३. पवार, जोशी, राणे, देशमुख, शिंदे या नावांनी फारसा बोथ होत नाही त्यापेक्षा त्यांचे नाव आणि आडनाव लिहिले तर कळायलाही सोपे जाते..... मंदार कुलकर्णी ०८:५९, २५ ऑक्टोबर २०११ (UTC)

पुस्तकांविषयीचे नवीन लेख

नमस्कार मंदार !

तू पुस्तकांविषयीचे बरेच नवीन लेख बनवल्याचे पाहिले. त्यामध्ये तूर्तास माहितीचौकट व वाचनीय मजकुराचे एक वाक्यच दिसत आहे. यात तू येत्या काही दिवसांमध्ये त्या लेखांत माहिती भरत जाशील, अशी आशा आहे. कारण विकिपीडिया:चावडी#राम राम घ्यावा आमचा येथे नुकत्याच घडून गेलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या नवीन लेखांना वगळण्याची विनंती होऊ शकते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:२७, २८ ऑक्टोबर २०११ (UTC)

संकल्प,

मला कल्पना आहे त्याची.. काही लेखात ४ -४ ओळी पण लगेच घातल्या आहेत...मंदार कुलकर्णी ११:२९, २८ ऑक्टोबर २०११ (UTC)

बरोबर. पण हे ५९ लेख वाचनीय होतील, याची काळजी घ्यायला हवी. म्हणजे येत्या काही आठवड्यांत या ५९ लेखांवर तुझ्याकडे असलेली माहिती (प्रकाशन वर्ष, लेखक/संपादक, प्रकाशक) घालून त्या त्या पुस्तकाबद्दल एखादा परिचयपर परिच्छेद लिहिण्याचे जरूर बघशील.
बाकी साहित्यिकांबद्दलच्या लेखांत चांगली माहिती जमा होतेय. अभिनंदन.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:५२, २८ ऑक्टोबर २०११ (UTC)

सांगकाम्या

मंदार,

तू AWB चालवत असल्याचे पाहिले. काजवा यांना केलेल्या विनंतीप्रमाणे तू सुद्धा यासाठी सांगकाम्या सदस्य तयार करुन त्याद्वारे AWB बदल करशील का?

अभय नातू २१:०३, ९ नोव्हेंबर २०११ (UTC)

वर्गीकरण चपखल हवे

मंदार, एडब्ल्यूबी वापरून काही लेखांमध्ये नवीन वर्ग केल्याचे पाहिले. त्याबद्दल अभिनंदन ! मात्र त्या लेखांमध्ये अगोदरच चपखल वर्ग वापरले असताना वर्ग:गायक हा स्थूल वर्ग वापरायची आवश्यकता नाही. सहाय्य:वर्ग या पानावरील वर्गीकरणाच्या संकेत क्र. #२ अनुसार लेखाचे चपखल वर्गात वर्गीकरण करण्याची रीत आहे. अन्यथा सर्व गायकपर लेखांना "वर्ग:व्यक्ती" या वर्गातही भरता येईल; मात्र तसे करणे चपखल नसल्याने "वर्ग:मराठी गायक", "वर्ग:हिंदुस्तानी गायक", "वर्ग:कर्नाटक गायक" असे चपखल (आणि सूक्ष्मस्तरीय) वर्ग बनवले आहेत.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २३:५०, ९ नोव्हेंबर २०११ (UTC)

Yes. Actually, I was learning the thing and just tried few yesterday night for the 1st time. Certainly, I will do the same in new login of sangkamya. मंदार कुलकर्णी ०६:०६, १० नोव्हेंबर २०११ (UTC)

हॉट कॅट

हॉट कॅट संदर्भात एक bug report बगझिलावर submit केला आहे. त्यामध्ये काही बदल सुचवायचा असल्यास खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्यावी ही विनंती.

संतोष दहिवळ १४:३८, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)

हार्दिक अभिनंदन

आपले, प्रचालकपद मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.'विकिपीडियाच्या उत्कर्षाची शपथ' आपण सर्वांनी घेतलीच आहे.नविन टीम तयार झाली आहे.जोमाने कामास लागा.या पदास लागणारी नितीमत्ता,सुजाणता, सर्वसमावेशक वृत्ती,खिलाडूपणा,चिकाटी,धैर्य ईत्यादी आपणात सध्या असलेले गुण परम् उंचीवर नेण्याचा आपला प्रयत्न असावयास हवा एवढेच यानिमीत्त्याने सांगावेसे वाटते. पुन्हा मनःपूर्वक शुभेच्छा.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १५:०१, १२ नोव्हेंबर २०११ (UTC)

धन्यवाद.... नक्कीच प्रयत्न करीन. विकी कॉन्फेरेंस च्या निमित्ताने तुमची भेट झाली असती तर फार आनंद झाला असता....मंदार कुलकर्णी ०८:१०, १३ नोव्हेंबर २०११ (UTC)

माझ्यातर्फेही हार्दिक अभिनंदन! आणि आपल्या मराठी विकिपीडियावरील एकूणच सर्व योगदानाबद्दल धन्यवाद! -- कोल्हापुरी ०८:३६, १३ नोव्हेंबर २०११ (UTC)

मंदार, प्रचालकत्व मिळाल्याबद्दल अभिनंदन (संदर्भ)! विकिपीडिया:प्रचालक/कामे येथे प्रचालकीय कर्तव्यांची माहिती नोंदवली आहे; त्यावर नजर टाकावी. काही अडचण असल्यास, जरूर कळवावे. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:०१, १३ नोव्हेंबर २०११ (UTC)

नवनिर्वाचित प्रचालकांनी आपल्याबाबत माहिती त्यांचे सदस्यपानावर टाकावयास हवी अशी सूचना करावीशी वाटते. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ११:३५, १८ नोव्हेंबर २०११ (UTC)


भेट घेणे संभवत नाही. माझे वास्तव्य क्वचितच महाराष्ट्रात असते, आणि असले तरी शहरापासून दूर. सध्या एका मोठ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल आहे. ---J १७:०७, ३ डिसेंबर २०११ (UTC)

कोणत्या गावात आहात? कसली शस्त्रक्रिया? आता तर नक्कीच भेटायला पाहिजे. काही संपर्क नंबर? काळजी वाटली म्हणून विचारले.... मंदार


आभार

नमस्कार,

मध्यंतरी विकी संमेलन आणि मग तेथे दिलेल्या जाहीरनाम्यातील घोषणांना कार्यान्वित करण्याचा हालचालीत जसे मोबाई अ‍ॅप, विपी सी डी, मराठी फॉन्ट सुलभीकरण, मिडिया विकिसाठी मराठमोळी सर्वेक्षण पुरवणी तसेच मराठी विकीस्त्रोत सुरु करण्यासाठी भाषांतर, स्रोत साठी मुखपृष्ठ आणि सुचालन, आधारभूत साचे आदी कामात व्यस्त असल्याने इकडे फिराकण्याचे टाळले.

माझ्या माघारीच मला प्रचालक पदाची जबाबदारी आपण देऊ केलीत. माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी आपला आभारी आहे. दिलील्या जबाबदारीस मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. भविष्यातही आपल्या अशाच सहकार्याची अपेक्षा.

धन्यवाद

राहुल देशमुख ०५:५५, ४ डिसेंबर २०११ (UTC)

बॉट

भारतीय राष्ट्रपतींच्या लेखांमध्ये एडब्ल्यूबी वापरून साचा टाकताना त्यात "Her Excellency" असे सन्मानवाचक नाव लिहिले गेले आहे. मराठीत त्याला काय म्हणतात ते लिहावे. तसे अधिकॄत संदर्भ आढळत नसल्यास, तूर्तास ते पॅरामीटर-मूल्य काढून टाकावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४९, १८ डिसेंबर २०११ (UTC)

.

विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!
नमस्कार, Mvkulkarni23

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


या लेखांना वर्ग:मराठी गायक हा वर्ग:गायक चा उप-साचा असल्याने वर्ग:गायक काढत होतो. सध्या संपादन थांबवले आहे, परंतु, पुढील लेख बदलले गेले आहेत:

संपर्क

मंदार, मी कालच ईमेल केला आहे. पुढे काय कामे आहेत ते जरूर कळवा. - अभिजीत साठे १९:१८, २९ डिसेंबर २०११ (UTC)

येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५९, १ जानेवारी २०१२ (UTC)

एक नवीन सुरुवात

मंदार, मुखपृष्ठ वर नवीन वर्षात नवागतांसाठी नवीन दुवा देऊन एक नवीन सुरुवात केल्याचे पहिले. कल्पना छान आहे. काहीकाळ ह्या पानावर लक्ष ठेऊन काही सुधारणा लागल्यास कळवावे.

धन्यवाद

राहुल देशमुख १६:१३, १ जानेवारी २०१२ (UTC)

धन्यवाद राहुल. नवीन सदस्यांना मार्गदर्शन या लेखात काही सुधारणा हव्या असल्यास अवश्य सुचवाव्यात/ कराव्यात. त्याचा फायदा मराठी विकिपीडिया वर येणाऱ्या नवीन सदस्यांना नक्कीच होईल.... मंदार कुलकर्णी १६:४६, १ जानेवारी २०१२ (UTC)