"जॉर्जिया (अमेरिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: ilo:Georgia (Estado iti Estados Unidos)
छोNo edit summary
ओळ ३: ओळ ३:
| पूर्ण नाव = जॉर्जिया<br />Georgia
| पूर्ण नाव = जॉर्जिया<br />Georgia
| नाव =
| नाव =
| ध्वज = Flag of Georgia.svg
| ध्वज = Flag of Georgia (U.S. state).svg
| चिन्ह = Seal of Georgia.svg
| चिन्ह = Seal of Georgia.svg
| टोपणनाव = ''पीच स्टेट (Peach State)''
| टोपणनाव = ''पीच स्टेट (Peach State)''

०४:०६, २९ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

जॉर्जिया
Georgia
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: पीच स्टेट (Peach State)
ब्रीदवाक्य: Wisdom, Justice, Moderation
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी अटलांटा
मोठे शहर अटलांटा
क्षेत्रफळ  अमेरिकेत २४वा क्रमांक
 - एकूण १,५३,९०९ किमी² 
  - रुंदी ३७० किमी 
  - लांबी ४८० किमी 
 - % पाणी २.६
लोकसंख्या  अमेरिकेत ९वा क्रमांक
 - एकूण ९६,८७,६५३ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ५४.६/किमी² (अमेरिकेत १८वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  ५०,८६१
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश जानेवारी २, इ.स. १७८८ (४वा क्रमांक)
संक्षेप   GA
संकेतस्थळ http://www.georgia.gov

जॉर्जिया (इंग्लिश: Georgia; En-us-Georgia.ogg उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या आग्नेय भागात वसलेले जॉर्जिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने नवव्या क्रमांकाचे राज्य आहे. जॉर्जियाच्या पूर्वेला अटलांटिक महासागर असून ईशान्येला साउथ कॅरोलायना, उत्तरेला नॉर्थ कॅरोलायनाटेनेसी, दक्षिणेला फ्लोरिडा तर पश्चिमेला अलाबामा ही राज्ये आहेत. अटलांटा ही जॉर्जियाची राजधानी, सर्वात मोठे शहर व महानगर आहे.

इ.स. १७३२ साली स्थापन झालेली जॉर्जिया ही तेरा मूळ ब्रिटिश वसाहतींपैकी सर्वात शेवटची वसाहत होती. राजा जॉर्ज ह्याचे नाव ह्या वसाहतीला दिले गेले. जानेवारी २, इ.स. १७८८ रोजी अमेरिकन गणराज्यात सामील झालेले जॉर्जिया हे चौथे राज्य होते. जानेवारी २१, इ.स. १८६१ रोजी जॉर्जियाने अमेरिकन संघामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या अमेरिकन यादवी युद्धामध्ये अब्राहम लिंकनच्या नेतृत्वाखालील उत्तरेकडील संघराज्यांनी दक्षिणी राज्यांना पराभूत केले. जुलै १५, इ.स. १८७० रोजी जॉर्जियाला पुन्हा अमेरिकेत दाखल केले गेले.


मोठी शहरे

खालील पाच जॉर्जियामधील सर्वात मोठी शहरे आहेत.[१]

सर्वात मोठी शहरे
शहर लोकसंख्या
अटलांटा
४,२०,००३
ऑगस्टा
१,९५,८४४
कोलंबस
१,८९,८८५
सव्हाना
१,३६,२८६
अथेन्स
१,१५,४५२
सर्वात मोठी महानगरे
महानगर क्षेत्र लोकसंख्या
अटलांटा
५२,६८,८६०
ऑगस्टा
५,५६,८७७
सव्हाना
३,४७,६११
कोलंबस
२,९४,८६५
मेकन
२,३२,२९३


शिक्षण

गा टेकजॉर्जिया विद्यापीठ ह्या अमेरिकेमधील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांपैकी दोन विद्यापीठे जॉर्जियामध्ये स्थित आहेत.

वाहतूक

अटलांटा महानगरात स्थित असलेला हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.

गॅलरी

संदर्भ

  1. ^ . Factfinder2.census.gov http://factfinder2.census.gov. 2011-08-05 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: