"कस्तुरीमृग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ८: ओळ ८:
| चित्र_रुंदी = 280px
| चित्र_रुंदी = 280px
| regnum = [[प्राणी]]
| regnum = [[प्राणी]]
| वंश = [[कणाधारी]]
| वंश = [[कणाधारी प्राणी|कणाधारी]]
| जात = [[सस्तन]]
| जात = [[सस्तन]]
| वर्ग = [[युग्मखुरी]]<br /><small>(''Artiodactyla'')</small>
| वर्ग = [[युग्मखुरी]]<br /><small>(''Artiodactyla'')</small>

१९:५६, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

कस्तुरीमृग

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
(Artiodactyla)

कुळ: कस्तुरीमृगाद्य
(Moschidae)

ग्रे, इ.स. १८२१
जातकुळी: मोशस
(Moschus)

लिनिअस, इ.स. १७५८

कस्तुरी मृग (शास्त्रीय नाव: Moschus moschiferus मोशस मोशीफेरस ; इंग्लिश: Musk deer, मस्क डियर) हे कस्तुरीमृगाद्य कुळातील मोशस या एकमेव प्रजातीचे युग्मखुरी प्राणी आहेत. सारंगाद्य (सर्व्हिडी) कुळातील प्राण्यांपेक्षा - म्हणजे खर्‍या हरणांपेक्षा - कस्तुरी मृग अधिक पुरातन असून यांना सारंगाद्यांप्रमाणे शिंगे नसतात, तसेच स्तनाग्रांची एकच जोडी असते. तसेच यांना पित्ताशय, तसेच सुळ्यांसारखे दोन दात असतात; जे सारंगाद्यांमध्ये आढळत नाहीत. तसेच यांना कस्तुरी नावाचा तीव्र वासाचा स्राव स्रवणार्‍या कस्तुरी ग्रंथी असतात.

वैशिष्ठ्ये

कस्तुरी मृगांची लांबी अंदाजे ८० ते १०० सेमी असते,त्यांची खांद्यापर्यन्तची अंदाजे ५० सेमी असते.त्यांचे लांब टोकदार मधले खुर व मोठे पार्श्व खुर हे बर्फाळ उतारावर व निसरड्या दगडांवर जम बसवण्यासाठी विकसित झाले आहेत.

कस्तुरी ग्रंथि नरांमध्ये, पोटाच्या त्वचेखाली, जननेंद्रिय व बेंबीच्यामध्ये असते. नुकतेच स्त्रवण झाल्यावरती त्याचा वास उग्र असतो, वाळल्यावरती त्याला कस्तुरीचा सुगंध प्राप्त होतो[१].

सांस्कृतिक संदर्भ

कस्तुरीमृग हा भारतातील उत्तराखंड राज्याचा राज्यपशु आहे.

तत्त्वज्ञान व साहित्यातील संदर्भ

कस्तुरीमृग व त्याच्या नाभीजवळील ग्रंथींमध्ये आढळणारी कस्तुरी यांच्या उपमा वापरून माणूस आणि अंतस्थ परमेश्वराच्या साक्षात्काराचे प्रतिपादन भारतीय उपखंडातल्या भक्तिमार्गी साहित्यात व तत्वज्ञानात अनेक वेळा केले आहे [२].

हेही बघा

संदर्भ व नोंदी

  1. ^ प्रेटर, एस.एच. (इंग्रजी भाषेत) http://books.google.co.in/books/about/The_Book_of_Indian_Animals.html?id=8Dc2YgEACAAJ&redir_esc=y. १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ संत कबीर. (मध्ययुगीन हिंदुस्तानी भाषेत). "कस्तुरी कुंडली बसे मृग धुंडे बन माही Text " ऐसे घट घट राम हे दुनिया देखे नाही " ignored (सहाय्य); Text "" (अर्थ: ज्याप्रमाणे कस्तुरी हे बेंबीतच असते, पण कस्तुरी मृग ते सार्‍या जंगलात शोधतो, त्याचप्रमाणे देव प्रत्येकाच्या ह्रिदयात बसतो, पण लोक त्याला इतरत्र शोधतात) " ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)